June 15, 2016

असामात असा मी ४

कृपया एक आवश्यक नोंद - ह्या सगळ्या माहितीचा खटाटोप शाळेत योग्य कौशल वर्ग का असावेत. ते नसल्याने काय घडते आणि मुला-मुलींना ह्या वयातच कौशल्याची आवड, आत्मविश्र्वास वाढण्यास मदत देण्या ऐवजी काय मीळते ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. संबंधीतांचा अपमान करण्याचा प्रयत्न नाही. पण ज्यांनी ठरवुन अपमान केला त्या व्यक्तींना ही चपराक आहे.
        त्या अनुभवी शिक्षकाने व इतरांनी मीळून कार्यक्रमात जो घोळ घातला तो असा - ४० फुट रूंद, ३० फुट आत स्टेज करता फक्त १ हॅलोजन २००० वॉट्स, २ मर्क्युरी दिवे ४०० वॉट्स स्टेज पासुन ११ फुटावर लावलेले होते. त्यातला एक मर्क्यीरी दिवा काही कारणानी बंद होता. स्टेजवर मुद्दाम अंधार असावा अशी काळजी घेतली गेली होती. पण प्रेक्षकांनावर धोकादायक उघडे टांगते ४ मर्क्यीरी दिवे लावुन भरपुर उजेड केला होता. प्रत्येक नाच सुरू झाला कि ३० सेकंद हवेत तोंडावर धुर सोडला जात होता, तो धुर नाच संपेपर्यंत सगळे स्टेज धुरकट ठेवत होता. ध्वनी योजना सवयी नुसार भाड्याने आणली होती, त्याचा तो चालक समस्त प्रेक्षवर्ग बहीरे आहेत असे गृहित धरून आवाजाशी खेळत होता. ५०० वॉट्सचे चार स्पीकर खुर्चीत बसलेल्या प्रेक्षकांच्या डोक्याच्या उंचीवर होते. प्रेक्ष त्या आवाजाने त्रासले होते. त्या अनुभवी शिक्षका शीवाय ध्वनी व्यवस्थापकाने कुणाचे ऐकायचे नाही असे ठरवले होते. ११ तारखे प्रमाणेच १२ तारखेला मी रक्तदोशी स्वयंसेवक दुपारी २ ते रात्री ९ पर्यंत चहा, पाणी, नाश्त्या वीना कॅमेरे घेउन मदनीसा वीना उभा होतो. 
       मुलांनी माझी तक्रार करावी म्हणुन शिक्षक वर्गाने मुलांन ध्वनी योजना, प्रकाश योजना मायक्रोफोन संबंधीत शंका घेउन मुद्दाम माझ्या कडे पाठवले होते. मी मुलांचे शंका समाधान करतांना स्पष्ट केले ह्या सगळ्या व्यवस्थांची जबाबदारी त्या अत्यंत अनुभवी शिक्षकाची आहे, तो शंका समाधान करेल. शिक्षकांना अपेक्षीत होते ते साधता आले नाही.
        स्टेज वर लावलेले बॅनरस असे लावले होते की दिव्यांच्या प्रकाशाने चमकत होते, प्रेक्षकांना त्यात काय लीहीलेले होते ते काहीही दिसत नव्हते, समजत नव्हते. मग लावण्याचा उद्देश काय हेता? अर्थातच बॅनर लावल्याची नोंद असावी एवढेच महत्व…..








वार्षीक खेळांचे मी फोटो घेत असतांना मुख्याध्यपकाच्या त्या आवडत्या व्यावसायिक प्रेस फोटॉग्राफर बरोबर ओळख झाली, मग संवाद झाले.  “अंकल तुम्ही कसे फोटो घेतले मी बघु शकतो का?” त्याच्या निकॉन कॅमेराला १८ - ५५ चे लेन्स होते माझ्या निकॉनला १८ - १०५ चे लेन्स होते. त्याला हे वरील तीन फोटो आवडले होते. अंकल तुम्ही इथे केव्हां आला, वगैरे झाले आणि त्याला राहवले नाही शेवटी त्याने वीचारले “तुम्ही ह्या फोटो करता काय सेटींग वापरले? माझे अॅक्शन फोटो नेहमी हललेले, ब्लर दिसतात, असे का?


         
            मी “अशा प्रकाशात नेहमी ISO २००० अथवा जास्त, अॅपरचर प्रॉयरीटी आणि ११ अॅपरचरने चांगले डि.ओ.एफ मीळते, त्या मुळे मला शटरस्पीड १/८०० ते १/२००० सेकंद मीळतो. अॅक्शन चुकणे शक्यच नाही. तुम्ही प्रेस वाले उन्हात ISO १०० आणि सावलीत ४००, मॅनुअल, ५.६ ते ८ अॅपरचर आणि शटर स्पीड १/६० ते १/१२५ किंवा १/२५०  सेंकद वापरता.” त्याने तोंडा वर हात ठेवुन माझ्याकडे आश्र्चर्याने बघत तसेच असल्याचे कबुल केले. 
           “अंकल माझ्या कॅमेरात फक्त ४००ISO आहे, तुम्ही २००० कसे सेट केले?” त्याला त्याच्याच कॅमेरात ६४०० ISO आहे हे मी दाखवले. “अंकल खरं खरं सांगतो पैसे होते म्हणुन कॅमेरा घेतला. अनुभवी लोकांनी थोडेफार सेटींग शिकवले. माझे फोटो लोकांना आवडतात म्हणुन ओळखीने प्रेस फोटोग्राफरचा बील्ला मिळवला. कधीही फोटोग्राफी शिकलो नाही. दोन वेळची रोजी-रोटी अजुन मिळते आहे.       
            वाचक हो, आम्ही भारतिय नकळत प्रोफेशनल ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ उत्तम, दर्जेदार असा लावतो. कोणाला व्यवसायीक, धंदेवाईक म्हणतांना अपमानकारक समजतो. प्रोफेशन चा शब्दकोशातला अर्थ व्यावसाय अथवा धंदा हाच आहे.  मी एकारांती रानडे म्हणुन प्रोफेशनचा खरा अर्थ चक्क पोटापाण्या करता “पुड्या बांधणारा व्यावसायिक अथवा धंदेवाईक” असाच रोज अनुभवतो आहे. काय समजायचे ते समजुन घ्या वीचार स्वातंत्र्य आहे. म्हणुन मी प्रोफेशनल नाही, होणे शक्य नाही.
            पुढील भागात त्या शाळेतले अजुन काहीं अनुभव.. .. .. ..