कृपया एक आवश्यक नोंद - ह्या सगळ्या माहितीचा खटाटोप शाळेत योग्य कौशल वर्ग का असावेत. ते नसल्याने काय घडते आणि मुला-मुलींना ह्या वयातच कौशल्याची आवड, आत्मविश्र्वास वाढण्यास मदत देण्या ऐवजी काय मीळते ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. संबंधीतांचा अपमान करण्याचा प्रयत्न नाही. पण ज्यांनी ठरवुन अपमान केला त्या व्यक्तीला ही चपराक आहे.
हे शेवटचे दोन फोटो. विषय दिव्याचा उयोग दाखवणे असावा, मी असे समजलो म्हणुन एक फ्लॅश न वापरता व दुसरा फ्लॅश वापरून. कोणता फोटो सुसंगत व कोणता विषयाला सोडून हे ज्याने जसे समजावे तसे समजावे, स्वातंत्र्य आहे. फोटो बघुन त्या कुचकट मुख्याध्यापकाने संधीचा फायदा घेतला - एका नावाजलेल्या फोटॉग्राफर ने हे फोटो काढावे. ह्या पेक्षा मी मोबाइलने चांगले फोटो काढतो. मी - मग का नाही गेलात, मला दोष देण्याची संधी शोधत होता
मग समजले हे फोटो सोलर दिवे पुरवणारी संस्था २०१६ च्या कॅलेंडर करता छापणार होती. एका संध्या काळी त्या संस्थेच्या एका कार्यकर्तीचा मला फोन - तुम्ही चांगले फोटो काढता असे कळले हेते पण तुमच्या पेक्षा राजस्थानच्या खेड्यातले चांगले फोटो काढतात ते मी २०१५ च्या कॅलेंडर करता छापले आहेत. मी - हे फोटो काढल्या नंतर सांगण्याने तुम्ही कॅलेंडर क्षेत्रातल्या नवशीक्या आहात हे समजले. असो मी ओमान एअरच्या १९९६ कॅलेंडर करता १०० फोटो काढले होते, विषय ठरला होता, बांधणी ठरली होती. असो तुम्ही ज्याचे कौतुक करीत आहात ते कॅलेंडर PDF ने पाठवा. हे सगळे त्या अधिकारी दिदी च्या निरोपाने घडवले होते. म्हणुनच शरीरा पेक्षा मोठ्या खुर्चीत बसुन डोलणारे आणि पायजमा, चपला, खादीचे कपडे, शबनम पीशवी गळ्यात, असे जीथे असते तीथे मी नेहमी दोन हाताचे अंतर ठेवुन असतो. २०१५ च्या कॅलेंडरचे ते हे फोटो -
हे सगळे फोटो म्हणजे एक वीनोद आहे. खालच्या फोटोतला ३ वॉटचा इतका बारका दिवा ५ फुटा वर ठेवुन त्या महिलांना काय मदत करणार?

हा फोटो कॅलेंडरवर छापला आहे. कार्यकर्तीला हे समजणे महत्वाचे नाही. पण त्या फोटोग्राफला चुक समजणे महत्वाचे आहे. विषय काय, काय दाखवता आहात.

हा फोटो कॅलेंडरवर छापला आहे. कार्यकर्तीला हे समजणे महत्वाचे नाही. पण त्या फोटोग्राफला चुक समजणे महत्वाचे आहे. विषय काय, काय दाखवता आहात.
माझ्या ह्या फोटोत भजनाच्या कार्यक्रमात दिव्याचा उपयोग विषयाला सुसंगत आहे का हो तुमच काय मत आहे?
विषय, उद्देश आणि अपेक्षीत काय हे न समजणे फार घातक ठरते - कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे - ह्या ओळीचा अर्थ नव्याने समजला.
असो, २०१५ वर्ष संपले, शालेय शिक्षण वर्षाचा शेवट जवळ आला. खेळ, सांस्कृतीक कार्यक्रमांच्या सरावात सगळे धावपळ करीत होते. जमेल तसे स्वतःचे महत्व वाढवण्यात मग्न हेते. मी मात्र जवळ गेलो नाही, कारण मला वीरोध करण्याचे प्रकार दिसत होते. कार्यक्रमाची तारीख जवळ आली, त्या मुख्याध्यापकाने केंद्राचे मुख्य काम पुढे करून निर्णय घेण्याचे काम उप मुख्याध्यापकावर ढकलले. त्याने उप पातळीला न्याय देत काम सांभाळण्याचे प्रयत्न केले.
कार्यक्रम व व्यासपीठ व्यवस्था समीतीत मला बोलवणे आले - महत्व देतो असे दाखवुन बोलावणे, नंतर बसा न म्हणता ताटकळत उभे ठेवण्याचा तो एक प्रकार होता. मला हा अनुभव अपेक्षीत होता कारण कडबोळ्याने माझे हसे करण्याचे सगळे प्रकार पूर्वतयारीने ठरवलेले होते. नमुना १ - मंडपाची व्यवस्था आपले एक अनुभवी शिक्षक सांभाळणार आहेत, त्यांना काही अडचण आल्यास रानडे मदत करतील, हे ऐकल्यावर तीथे जमलेले सगळे हसले. नमुना २ - प्रकाश, ध्वनी योजना आपले अनुभवी शिक्षक सांभाळणार आहेत, त्यांना काही अडचण आल्यास रानडे मदत करतील. नमुना ३ - एका महिला शिक्षीकेने वीचारले, रानडे सर तुमचे काय मत आहे फिरते रंगीत दिवे व धुर वापरावे की नाही ……. तो अनुभवी शिक्षक हसला ….. काही चींता करू नका मी सगळे ठरवलेले आहे.
प्रत्यक्षात कौशल वीकास कार्यक्रमात व्यासपीठ व्यवस्थापन, व्यवस्थेचे खास प्रशिक्षण मी तयार केलेले आहे. पण त्या शाळेतल्या त्या अनुभवी शिक्षकाला कार्यक्रमात घोळ घालण्याचा दांडगा अनुभव होता. हे त्याने सिध्द करून दाखवले. ११ व १२ तारखेला सांस्कृतीक कार्यक्रम आहेत एवढेच मी समजलो होतो. पण कार्यक्रमाचे स्वरूप, वेळ, क्रम मला कोणी सांगीतलेला नाव्हता. ११ तारखेला कार्यक्रम सुरू होणार तसे मी फोटो - व्हिडीओ करणार हे २० मीनीटे आधी व्यासपीठावरुन सांगण्यात आले, माझी धावपळ सुरु झाली. ११ तारखेला कार्यक्रमाची तोंड ओळख असणार आणि १२ तारखेला मुख्य कार्यक्रम असे त्या अनोळखी आसामी भाषेला ऐकतांना समजण्याचा प्रयत्न केला. कारण कार्यक्रमाची यादी किंवा आमंत्रण पत्र मला न दाखवण्याचा कट होता हे नंतर स्वैपाक्याशी बोलतांना समजले. पण इतर शिक्षकांना आमंत्रण पत्र मीळाले होते किंवा कार्यक्रमाची यादी समजली होत.
११ तारखेला कार्यक्रम सुरू होणार तसे मी फोटो - व्हिडीओ करणार हे २० मीनीटे आधी व्यासपीठावरुन सांगण्यात आले, पण यादी, क्रम, वेळ काहींच समजले नाही. माझी धावपळ सुरु झाली. ११ तारखेला कार्यक्रमाची तोंड ओळख असणार आणि १२ तारखेला मुख्य कार्यक्रम असे त्या अनोळखी आसामी भाषेला ऐकतांना मी समजण्याचा प्रयत्न केला. कारण कार्यक्रमाची यादी किंवा आमंत्रण पत्र मला न दाखवण्याचा कट होता हे नंतर स्वैपाक्याशी बोलतांना समजले. इतर शिक्षकांना आमंत्रण पत्र मीळाले होते किंवा रोज चर्चा घडत होती.
११ तारखेला प्राथमिक विभागाचा कार्यक्रम, प्रमुख पाहूण्याला बघीतल्यावर मी हादरलो. मुख्याध्यापकाचे ४० मीनीटाचे स्वागत भाषण (वर्गाच्या एकातासाची सवय न मोडता), पाहुण्याचे भाषण माहाविद्यालयाचा प्राचार्य म्हणुन ७० मीनीटे कसे बसे मुद्रीत केले. मला मदनीस दीलेला नव्हता म्हणुन ह्या वयात मी थेरड्याने (वय वर्ष ६८) दोन जीने वर खाली धावत जाउन कॅमराची पॉवर बॅंक, निकॉनची बॅटरी घेउन आलो. प्राथमिक विभागाचे काही कार्यक्रम हुकले. तरीही चहा, पाणी नाश्ता न करता सतत ७ तास नुसता उभा होतो, कोणताही मोबदला मीळण्याची अपेक्षा न बाळगता. ह्याला मी खाज असणे अथवा रक्त दोष समजतो.
१२ तारखेला माध्यमिक विभागाचे दुपारी २ ते रात्री ९ एकापाठोपाठ कार्यक्रमांचे मुद्रण सुरू होते. ११ तारखेला घडले त्याचीच पुनरावृत्ती फक्त वयोगट बदलले होते. ११-१२ तारखेचे एकुण ७०० फोटो, तसेच ११ तासांचा व्हिडीओ १३ तारखेला शाळेच्या हार्ड डिस्क मध्ये भरून दीला. माझ्या जवळ असलेले सगळे कार्यक्रम पुसून टाकले, पुढच्या कार्यक्रमाकरता सवयीप्रमाणे कॅमरा तयार ठेवले होते. १३ तारखेला रात्री मुख्याध्यापकाने फोटो व्हिडीओची मागणी केली. मी “२२ जीबी माहिती तुमच्या मदतनीसाला दिली आहे, तो तुम्हाला हवे ते देईल.”
मुख्याध्यापकाने कुत्सीत हसत “बापरे मला तो सगळा कचरा बघावा लागणार का? हे माहित होते म्हणुनच मी नेहमीच्या एका व्यावसायीकाला (प्रोफेशनल) महत्वाचे फोटो काढायला बोलावले होते. चार फोटो वर्तमान पत्रात छापुन आले की फोटोचे महत्व संपले.” मी “व्वा व्वा, क्या बात है सर, हे माहित असते तर ह्या वयात दोन जीने खाली उतरून हा कचरा तयार केला नसता.” त्या मुख्याध्यापकाच्या वीधानाला दुजोरा देत एका पुणेरी दिदीने वाद घालण्याचा प्रयत्न केला. मी पण पुणेरीच, मी पण माझा मुद्दा सोडला नाही. “मुळात ह्या वयात मुलांच्या कला गुणांना प्रोत्साहन मिळावे, एक व्यासपीठ मिळावे हा अशा कार्यक्रमांचा उद्देश आहे, महत्व आहे. मुला-मुलींनी, पालकांनी मेहनत केली, पैसा खर्च केला, त्याचे मी चित्रीकरण केले. ह्या सगळ्याला ह्या जबादार व्यक्तीने कचरा ठरवावे, फारच बेजबाबदार व्यक्ती आहे.” शिक्षण क्षेत्रात मुला-मुलींचा सर्वांगीण विकास वगैरे मोठी भाषणे ठोकायची आणि प्रत्यक्षात असल्या बेजबाबदार व्यक्ती घोळ घालण्यात मग्न आहेत. केंद्रात असे शिक्षक व इतर घोळकर मंडळी जमलेली आहेत असे ऐकले होते. आता पुरावा मीळण्याची ती सुरूवात होती.
त्या अनुभवी शिक्षकाने व इतरांनी मीळून कार्यक्रमात कसा घोळ घातला ते सगळे प्रकार पुढील भागात




