टेकसर्व्ह कंपनिची नोकरी मिळण्याचा आनंद की डोकेदुखी ??? ........
टेकसर्व्ह कंपनिला एका विभागात फार तातडीने एका तंत्रज्ञाची आवश्यकता होती. टेकसर्व्हने माझ्या मुलाला मुलाखतीला बोलवले होते. मुलाखत स्काइप माध्यमातून सायटेक अधिकाऱ्या बरोबर झाली. मुलाखतीत कामाची महिती सांगितली गेली व त्यात येणाऱ्या अडचणींना दूर करण्या करता परदेशात प्रशिक्षण दिले जाईल असे सांगत असताना मुलाने आलेल्या अडचणीचा एक नमुना वीचारला होता. त्या अडचणीचे समाधान त्याने काही मिनीटात त्या अधिकाऱ्याला करुन दिले. मुलाच्या शिक्षणाची, प्रमाण पत्राची वीचारपुस न करता त्याच क्षणाला त्याची नोकरी सुरु झाली असे सायटेक अधिकाऱ्याने सांगितले. त्या नंतर टेकसर्व्हने नोकरीवर घेण्याची प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण केली. माझा मुलगा पदवीधर नसल्याने ४५,०००/ रुपये पगार ठरला पण टेकसर्व्हच्या इतर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता, सायटेकने नीवड केल्याने सगळे चुप झाले होते.
मुलाने त्या विभागाचे काम सुरु करण्या अगोदर सायटेकचे दोन अधिकारी दिवसाला ५ ते ६ वेळा फोन करून बैठका घेत होते. पण मुलाने काम सुरु केल्या नंतर महिन्याभरातच वातावरण नीवळले होते, आठवड्याला एक बैठक होत होती. सायटेकचे ते दोन अधिकारी मुलाशी फोनने रोज संपर्कात होते. काही महिन्यातच त्याला "घर बसल्या कामाची" सुविधा मिळाली. चांगल्या कामाचा ५ पैकी ३ दर्जा मीळला पण त्याबरोबरीने पगार वाढ अथवा अधिक भत्ता मीळाला नाही कारण ते देण्याचे अधिकार टेकसर्व्हच्या हातात होते.
पहिले वर्ष संपले पागार वाढ झाली. सायटेकचे अधिकारी परदेशी कंपन्यांच्या प्रक्रिया बैठकीत मुलाला आग्रहाने सहभागी करत होते. अशाच एका जागतिक कंपनीच्या बैठकीत सहभागी होण्या करता सायटेकने टेकसर्व्हला न कळवता एका रात्री फोन केला. बैठकीत वादावादी चालली होती. मुलगा घरातूनच बोलत होता त्याने हेडफोन काढून संगणकाचा आवाज वाढवला मी ते ऐकत होतो. त्या जागतीक कंपनीच्या सर्व्हर संगणकात १५ महिने व्यत्यय होता. प्रत्येक संबंधित अधिकाऱ्याने एकमेकाला महिन्याला दोन असे इमेल केले होते. पण संगणक दुरुस्त झालेला नव्हता. त्या घोळात मुलाचा संबंध नसताना त्याला सहभागी केले होते. त्या बैठकीत त्या जागतीक कंपनीच्या मालकाने नियमा प्रमाणे सायटेकला २ मिलियन डॉलरचा दंड मागीतला. ती बोलणी चालू असताना मुलाने सर्व्हर संगणकात कसा बीघाड सुरु झाला ते शोधुन काढले व कसे दुरुस्त होईल ते पण शोधले होते. तशी मेल मुलाने सायटेक अधिकाऱ्याला पाठवली.
माझी उत्सुकता वाढली होती. सायटेक धिकाऱ्याने माझ्या मुलाला बैठकीत संगणकाचा तो बिघाड कसा दुरूस्त होईल असे मुद्दामच वीचारले होते. मुळात जागतीक कंपनीच्या एका मदतनीसानेच सर्व्हर संगणकात काही महत्वाच्या माहितीत बदल करत असताना बीघाड झाल्याची १५ महिन्या पूर्वी एक मेल त्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्याला पाठवली होती. पण मागच्या मेल न वाचताच इतरांनी मेल वर मेल करण्यात वेळ घालवला होता. मुलाने १५ महिन्या पूर्वीची ती माहिती सर्व्हर संगणकातून वेगळी केली, त्या फाईलचे नाव बदलले व संगणक सुरु करताना आवश्यक बदल केले, तो सर्व्हर संगणक व्यवस्थीत सुरू झाला होता.
ह्या घटनेचा फायदा त्या जागतीक कंपानीला झाला होता. सायटेकचा २ मिलियन डॉलरचा दंड वाचला होता पण माझ्या मुलाला मोबदल्यात फल्त कोरडे धन्यवाद मिळाले होते ........... समाधान मानायला एक चांगले घडले, मुलाने
"एक अचूक निदान व दूरुस्ती तज्ञ म्हणून सायटेक कंपनीत नाव मिळवले होते" ..........
वाचक हो तुमचे सहकारी कसे आहेत ते समजून घ्या. तुमचे सहकारी नोकरी जपण्या करता काय काय युक्त्या वापरतात त्याचे निरीक्षण करा. अहो सायटेकच्या एका मदतनीसाने नोकरी टिकवण्या करता मॅनेजरला एक कोरी चारचाकी मिळवून दिली होती. स्वत: न वापरता त्याचे हप्ते दोन वर्ष तो भरत होता. मदतनीसाचे लग्न झाल्यावर त्याच्या बायकोला प्रकार समजला तीने गुंड बोलावून ती गाडी मॅनेजरच्या हातातून सोडवण्यात यश मिळवले होते.........
पुढील भागात मुलाचा राजीनामा............

