अर्थ माझा शब्दांचा
मी माझ्या कुवतीनुसार गेल्या ५५ वर्षात जे अनुभवले, त्यांमुळे मला उमजलेले शब्दांचे अर्थ, शब्दकोशातील अर्थ कोमेजलेली वाटतात.
अर्थ = शब्दांची समज, अर्थकारणात
अर्थकारण = सगळ्या खटाटोपाचे कारण अर्थ, पैसा गीळण्याची कला
सुख = दुसर्या्स छळण्याचे, दूसर्यां नी माझ्याकडून पळवले, मी अजून चाचपडतो आहे
शांती = समजली तर नाहीतर दुर्मिळ प्रकार, नावाच्या व्यक्ती अशांत व अशांतता देणार्या होत्या
लेखक = बरेचसे लेखनिक, कॉपी-पेस्ट प्रावीण्य मिळवलेले
कायदा = तुम्ही काय काय केव्हा कुठे आणि किती देणार ह्याची यादी
नियम = कोणीही स्वतः:चे हित शोधण्या करिता केलेला खटाटोप
स्वयंसेवक = बरेचसे स्वकेंद्रित स्वहित शोधणारे
इंग्रजी शब्दांचे माझे अर्थ -
अंडरस्टॅन्ड = मोठ्यासमोर लहानाने झुकणे, ह्या शब्दाचा हक्क बापाला मुलांशी बोलताना असतो, मुलाला नाही. तसेच बॉसला इतर कर्मच्यार्यां शी बोलताना असतो. एकतर्फी वापराचा शब्द.
ऑथर = जबाबदारी पूर्वक लिखाण करणारा
रायीटर = कॉपी-पेस्ट प्रावीण्य मिळवलेला सांगकाम्या
युअर्स फेथफुली = लांगुलचालन, विश्वास घातकी (पत्राचा शेवट विथ रीगार्डस सुयोग्य आहे)
सो सॉ... री = मनातून आनंद तोंडावर खेद. (अहो खरंच खेद दर्शविण्यासाठी सांगा " क्षमस्व, दु:खात सहभागी....")
एज्युकेटेड = शिकवलेला, शिकलेला नाही. (बरेचसे, प्रमाणित गळाकांपू, खिसेकापू)
लर्नेड = अनुभवाने शिकलेला
टेक्नॉलॉजी = तर्कशुद्ध तंत्रज्ञान मांडणी (technique logically told)
टेक्निशियन = तंत्र कार्यक्षमतेने वापरणार (efficient technique user)
डिग्री होल्डर / ग्रॅज्युएट = एक दर्जा मिळवलेला (डोकं असल्याची पावती नव्हे)
मास्टर = एखाद्या विषयातील प्रभुत्व मिळवलेला
डॉक्टर = एखाद्या विषयाची अभ्यासपूर्वक नावीन्याने सिद्धता सांगणारा
इराणी / फारसी भाषेतून घडलेले विनोद -
सर्मा खोरदाम = सर्दी झाली. (मी शब्दशः अर्थ केला - खोरदाम = मी खाल्ले, मी मित्राला विचारले - सकाळी
नाश्ता नाही केलास? सर्दी का खाल्ली?)
फेदार सूख्ते = जळला तुझा बाप (माझ्या मित्राने त्याच्या मुलाला झापले असताना - "फेदार सूख्ते, बेशरम घरी येऊन हजेरी घेतो..." मी सहज विचारले - "तो तुझा सावत्र मुलगा आहे का ?"
पीच = वळण आणि पीच मोहरे = नट बोल्ट एका इराणी मित्राने मला विचारले "रस्त्याने १२० किमी ने जाताना पीच दिसला तर काय करशील? "मी" खाली उतरून बघेन माझ्या उपयोगाचा असल्यास उचलून वळण घेऊन मार्गी लागेन"
इराणी / फारसी भाषेची अधिक माहिती हवी असल्यास...... संपर्क स्काईप आयडी – skillsvk