Showing posts with label माझी व देशाची प्रगती. Show all posts
Showing posts with label माझी व देशाची प्रगती. Show all posts

June 27, 2014

माझी व देशाची प्रगती

प्रगती= प्राथमिकतेतील गती, असा मी तयार केलेला अर्थ आहे.

लाहन बाळाची प्रथमिकता बोबडे बोलण्यातून ते हात न धरता चालण्याची असते. हि प्राथमिकता ज्या गतीने साध्य होते ती त्या बाळाची प्रगती असते. ह्या प्रगतीचे स्वरूप वयोपरत्वे बदलत जाते. हेच माझ्याही प्रगतीत घडले, पण संथ गतीने माझ्या प्रगतीचे आधार व मुल्यांकन बदलू लागले. सर्व प्रथम आहाराचा एकच आधार (रेफरन्स) होता ज्याने शारिरीक / मानसिक प्रगतीच्या गतीचा वेग बदलू लागला. जसे शालेय शिक्षण सुरु झाले तसे प्रगतीचे मापदंड बदलले कारण आधारांचे प्रमाण वाढले. शिक्षणातील विषय, त्या विषयांची आवश्यक साधने, शिक्षक व त्यांची पात्रता हे सगळे आधार सांभाळत मी प्रगतीची एक पातळी गाठली. ह्या प्रगतीचा माझ्या उदरनीर्वाहाशी संबंध असतो ह्याची जाणीव मला दिली गेली व मी स्विकारली. मी मिळवलेल्या शिक्षणाची किंमत किती असावी हे ठवरणारे आधार सतत बदलू लागले. तसल्या प्रगतीची धडपड आजही कायम आहे.

माझ्या प्रगतीचा पुढचा टप्पा सुरु झाला. इथे माझ्या आवश्यक गरजा, पालकांच्या अपेक्षा, मला मीळणारा पैसा वगैरे आधारांवर माझ्या प्रगतीचे मोजमाप सुरू झाले. हे सगळे आधार सतत बदलाणारे होते म्हणून माझी प्रगतीची गती केवीलवाणी होती तरीही संथ का होइना प्रगती होते आहे असा फरक जाणवत होता. प्रगतीचा पुढचा टप्पा दोनाचे चार हात करण्याचा होता. चार हात प्रगतीचे आधार व त्याचे परिणाम समजणे फार अवघड झाले. त्या गोंधळात दोनाचे चार हात झाले, त्याचे पण मोजमाप अवघड झाले. चारा चे आठ हात झाले आणि सगळेच आधार समजून घेण्यात आयुष्य गेले. आज माझ्या प्रगतीचे मुल्यांकन करताना माझ्या नीवडलेल्या प्राथमिकताच चुकलेल्या असाव्यात असे जाणवते आहे.

देश, प्रदेश, गाव, समाज, एक कुटूंब मग प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीचे मोजमाप करताना कोणते आधार व कोणत्या प्राथमिकता असाव्यात हे ठरले तर मुल्यांकन करणे सोपे होणार. पण ते आधार व प्राथमिकता ह्यांचे घोळ मुद्दाम घडवले गेले असेच दिसते आहे. देशाच्या प्रगतीचा आराखडा / मुल्यमापन करताना आवश्यक आधारांची नीवड मुळातच सरकारने करणे आवश्यक होते. पण हजारो वर्षाच्या गुलामीतून स्वातंत्र्य मिळाल्याचा भास नीर्माण केला गेला. घोळ घालता येतील अशा आधारांची नीवड करण्यात आली त्यावर आधारीत प्रगतीचे मुल्यांकन करण्याची सवय लावली गेली.

देश, प्रदेश, गाव, समाज, एक कुटूंब मग प्रत्येक व्यक्तीची प्रगती झाली आहे असे दाखवण्याचा प्रयत्न भरपूर केला गेला त्या प्रकाशित दाखल्यांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक झाले आहे. दाखला १- शिक्षणातील प्रगतीचे आधार व पाठ्यक्रम परदेशीय आधारनुसार ठरवले गेलेले आहेत त्यामूळे प्रमाणपत्रांचे आवास्तव महत्व वाढले आहे. प्रमाणपत्र मीळवण्यातले गोंधळ वाढले आहेत. २- मिळालेले शिक्षण प्रत्यक्ष कामात असंबध्द ठरते आहे. ३- सोयी सुवीधा पुरवण्यात शिकलेल्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने गोंधळ घातलेला आहे. ४- तंत्रज्ञाचे ज्ञान मिळाल्याचा देखावा करून चुकीची तांत्रिक साधने बाजारात विकायला आणली आहेत. ५- वैद्यकीय सुवीधा व अौषधांचे प्रकार आवास्तव वाढवून त्यात नवीन भ्रष्ट व्यवस्थांचे व्यवहार रोज उघडे होत आहेत.  यादी मोठी आहे.......

अज्ञानाचा फायदा घेण्यात प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली आहे ..... ह्याचा अनुभव मी रोज मिळवतो आहे .... तुम्हाला ही प्रगती मान्य आहे का???