हवा, पाणी, ध्वनी, वगैरे विविध प्रकारांचे वातावरणातील प्रदूषण आणि त्यांच्या परिणामांची चर्चा आंतर्राष्ट्रीय स्तरावर सतत होत आहे. प्रदूषण प्रक्रिया घडण्याची कारणे समजून घेताना विचारांचेच प्रदूषण किंवा विचार प्रक्रियेतील गोंधळ हेच मुख्य कारण आहे असेच माझे मत झाले आहे. सुरळीत वाहतुकीला चिखलाचे रस्ते योग्य नाहीत म्हणून डांबरी रस्ते तयार झाले परंतू त्या रस्त्याच्या कडेला जर चिखल साठणार असेल तर मुळात रस्ते बनवण्याच्या विचार प्रक्रियेतील प्रदूषण कारण आहे. एकदा रस्ते दुरूस्ती चालू होती दोन कामगार गरम डांबर - खडीचे मिश्रण रस्त्यावर टाकत होते, दुचाकीला बाजूने जायला जागा असताना एका टग्याने दुचाकी त्या मिश्रणावरून वेगाने नेली, ते गरम मिश्रण त्या कामगारांच्या व माझ्या अंगावर उडाले, मी अोरडलो “ए नालायक” तो टग्या थांबला व अोरडला “ये थेरड्या कोणाला नालायक बोलतो?” मी “ तू नालायक नाहीना, मग थांबला का? मीच नालायक मला हे का जमले नाही!!” असो! हा सगळा प्रकार विचार प्रदूषणाचा की नाही ?????
प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून विचार प्रदूषित होण्याची प्रक्रिया सुरू होते. बाळ जन्माला आल्या नंतर बाळाला आईचे दूध मिळणे / न मिळणे, त्या दुधाचा दर्जा, दूध पाजण्याचे वेळापत्रक, शी / सू चे वेळापत्रक ह्या सगळ्याचे नियोजन बाळाची आई ज्या प्रमाणात करू शकेल त्या प्रमाणात बाळाच्या विचारांचा गोंधळ होणे अवलंबून आहे. बाळाला आईचे दूध न मिळाल्यास शारीरिक, मानसिक व वैचारिक गोंधळ सुरू होतात. (का, कसे, कोणता आधार ही प्रश्न- उत्तरे वाचकाच्या संवेदनशीलतेशी संबंधीत आहे).
बाळाला दूध पाजण्याचे वेळापत्रक, शी / सू चे वेळापत्रक जर काही कारणांनी पाळले गेले नसेल तर ते बाळ रडून आईचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते. हे वेळापत्रक असेच अनिश्चित राहिले तर त्रास देऊन लक्ष वेधणे व काम करून घेण्याच्या प्रक्रियेला म्हणजेच विचार प्रदूषणाला सुरुवात होते. अशा प्रदूषित व्यक्ती दैनंिदन जीवनात अडथळे आणून स्वार्थ साधण्यात मग्न आहेत, पुढारी / नेते झाले आहेत.
चिमुकले बाळ चालते बोलते झाल्यावर घरातील इतर मंडळी व शेजारी त्या बाळाच्या विचार प्रदूषणाला कळत न कळत मदत करतात. दोन्ही अजोळचे आजी-आजोबा आपापल्या विचारांनी, वागण्या बोलण्याने गोंधळ घालण्यात मदत करतात. लहान वयात नवीन शब्द, हावभाव बक्षीस देऊन करून घेण्याने पुढे मोबदल्या वीना अभ्यास अथवा काम न करण्याच्या प्रदूषणाला सुरुवात होते. बालवाडीतील प्रवेशाच्या सहा महिन्यात बाळा-बाळीला शाळेतील शिक्षक - िशक्षीका आपल्या पालका पेक्षा जास्त सज्ञानी वाटतात.
प्राथमिक शाळेत विचार प्रदूषणाचे विषय बदलतात. जात-पात, वर्णभेद, वर्गभेद, गरीब-श्रीमंत, मंदबुद्धी, अती हुशार, धर्मभेद वगैरे विचार प्रदूषणाला सुरुवात होते. काही शाळकरी त्यांच्या िशक्षक वर्गाला देव समजतात तर अतीहूषार व पैशाचा माज असणारे शाळकरी त्यांच्या िशक्षक वर्गाला अज्ञानी िकंवा गरजू ठरवतात, हा विचार प्रदूषणाचाच परिणाम आहे!!!
माध्यमिक शाळेत गुणांची टक्केवारी, प्रमाणपत्रे जमा करण्याला ज्ञान मिळवण्यापेक्षा जास्त महत्त्व देण्याचे विचार प्रदूषण सुरू होते. मुलगा - मुलगी किंवा स्त्री-पुरूष ह्यातील शारीरिक फरक लक्षात आल्याने विचार प्रक्रियेत गोंधळ घडतात, ह्या गोंधळांचा परिणाम बाल वयातील विचार प्रदूषणाशी संबंधीत असतो. ह्या वयात झालेल्या विचार प्रदूषणाचे परिणाम तारुण्यात जास्त महत्त्वाचे ठरतात. प्रदूषित तरुण स्त्री जातीला उपभोगाचे साधन समजतात तर प्रदूषित परंतु थोडेफार संस्कारित तरुण आई, बहीण, बायको वगैरे नाते संबंधातील स्त्री जातीवर मालकी हक्क दाखवतात. काही तरुण मात्र सतत गोंधळलेले दिसतात. तरुणींचे विचार प्रदूषण वेगळ्या प्रकाराने होते. काही तरुणी परावलंबी होतात, तर काही तरुणी स्वप्न रंगवण्यात मग्न असतात, तर काही तरुणींना मिळालेल्या शरीर सौष्ठवाचा / संपत्तीचा माज असतो असे मी अनुभवतो आहे.
वीचारप्रदूषीत व्यक्ती शैक्षणिक, वाणिज्य, आरोग्य, बँक, समाज कार्य, कायदा / सुरक्षा, राजकारण अशा विविध क्षेत्रात जेव्हा प्रवेश मिळवतात तेव्हा त्या प्रत्येक क्षेत्रातून कोणते गोंधळ घडतात अथवा आजवर घडले आहेत त्याचे परिणाम काय होतात हे सांगायला ही जागा तोकडी आहे. वीचारप्रदूषीत व्यक्तीला विचार प्रदूषण मान्य नसल्याचे मी अनुभवले आहे. हो ती संख्या रोज वाढते आहे!!!!!!!!
विचार प्रदूषणाने व्यक्तीला, कुटुंबाला, गावाला, शहराला, प्रदेशाला व देशाला संबंधीत प्रत्येक व्यवस्था विस्कळीत होते, आपल्या देशात हे घडले व घडते आहे. विस्कळीत व्यवस्थांनी विस्कळीत झालेल्या देशात परकीयांना गोंधळ घालण्याचे आमंत्रणच आहे, हेच सत्य आहे !!!!!!!
वाचकहो विचार प्रदूषण हा महत्त्वाचा विषय असल्याचे मान्य असल्यास आपण एकजुट होणे शक्य आहे का ????
मी हजर आहे संपर्क करा v.k9121@gmail.com

