Showing posts with label असामात असा मी ६. Show all posts
Showing posts with label असामात असा मी ६. Show all posts

August 21, 2016

असामात असा मी ६

एक आवश्यक सुचना - ह्या सगळ्या माहितीचा खटाटोप शाळेत योग्य कौशल वर्ग का असावेत. ते नसल्याने काय घडते आणि मुला-मुलींना ह्या वयातच कौशल्याची आवड, आत्मविश्र्वास वाढण्यास मदत देण्या ऐवजी काय मीळते ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. संबंधीतांचा अपमान करण्याचा प्रयत्न नाही. पण ज्यांनी ठरवुन अपमान केला त्या व्यक्तींना ही चपराक आहे.        
              मला गौहातीला कार्यक्रमाच्या एक दिवस अधी ३० तारखेला बोलावण्यात आले होते. २९ ला रात्री १०ला आयुष्यात प्रथम गौहातीच्या रेल्वे स्थानकावर पाय टेकले.  मला गौहातीला भाग ३ च्याच अधीकारी दिदीने बोलावले होते. मी केव्हा पोहचणार हे त्या दिदीला (PNR) १० दिवस आधीच कळवले होते. माझे सामान जास्त होते मला मदतीची अावश्यकता होती. त्याचे उत्तर दिदीने मला पाठवले होते, रेल्वे स्थानकावर कार्यकर्ता मदतीला येइल असे कळवले होते. पण १५ मीनीटे स्थानकावर थांबलो तरी कोणी आले नाही म्हणुन दिदीला फोन केला. इतक्या रात्री कोणाला पाठवणार आधी का कळवले नाही?  त्या रिक्षावाल्याला फोन द्या, पत्ता सांगते. त्याने १०० रुपये घेतले, ५०० मीटर अंतरावर असलेल्या पत्त्यावर नेले. हा पत्ता मला कळवणे सहज शक्य होते. असो, असते एखाद्याची कामाची पद्धत असे मी समजलो.

        
सकाळी तयार झालो, गळ्यात दोन्ही कॅमेरा अढकवले, इमारतीत निरीक्षण सुरु केले. इतर कार्यकर्त्यांशी ओळख करुन घेतली. सभागृहातुन बोलावणे आले, प्रकाश व्यवस्था कशी असावी ते दाखवा. व्हिडीओ करता प्रकाश फार कमी होता. व्यासपीठावर पांढरे चमकणारे कापड वापरले होते त्याने व्हिडीओ फोटो करता प्रकाश कमी केला जात होता, चेहेरे काळपट दिसत होते, मुळात प्रसंगाचे महत्व कमी करणारे होते. थोडक्यात ते सभागृह ऑडीटोरियमच्या लायकीचे नव्हते तर वस्तुसंग्रालयाला योग्य होते.  असो १००० वॉटचे दोन हॅलोजन दिवे व्यासपीठाच्या दोन्ही टोकाला असावे, २००० रूपये भाड्याने सहज मिळतील असे मी सांगितले.  पण व्यवस्थापकाने ३६ वॉटचे ६ एलइडी दिवे ३० हजार रूपयाला लावण्याचे ठरवलेले होते.

  
              
           टेबल आणि लेक्टर्न ला पांढरा कपडा लावल्याने फ्लॅशचा प्रकाश कमी केला जात होता, चेहरे फोटोत काळपट दिसत होते. उपाय मागे दिसणारा तपकीरी गडद रंगाने काम झाले असते. हे लक्षात आणुन दिल्या नंतर देखील बदल झाला नाही.  साळुद पणा दाखवत सुचना वीचारण्याचे ढोंग केले होते.

           फोटोत दाखवलेली पीवळी फ्रेम बसवुन त्यावर ते ६ LED दिवे बसवल्यास व्यासपीठावर प्रकाश जास्त मीळेल हे सुचवुन देखील आज सप्टेंबर २०१६ ला बदल झालेला नाही. 
         “ रानडे तुम्ही व्यवस्थापकाचा अपमान केला आहे, ते २५ वर्ष जुने आपले कार्यकर्ते आहेत, कसे बोलावे तुम्हाला कळत नाही,  त्या अधिकारी दिदीने मला समज दिला. मी लगेचच स्पष्ट बोललो त्याने सांगीतले तुम्ही मान्य केले. केंद्रात अहंकारी नाहीत असा माझा समज होता, पण प्रत्यक्षात तसे नाही हे समजले. त्याने मला काय असावे असे वीचरले होते, ते कसे असावे हेच मी सांगितले होते. ह्या पुढे कोणताही सल्ला देणार नाही, अपेक्षा करु नका.      
               त्या कामाची हि छोटी झलक        

   

  



ह्या वयात मी शीकलो, ऑडिटोरिअम आणि संग्रहालयातला फार मोठा फरक समजण्याची हि गफलत लोकांचा अहंकार दुखावते.

             त्याच इमारतीत मी ८ दिवस होतो. आर्य विद्यापीठ माहामविद्यालयाने मला ८ दिवसाच्या फोटोग्राफी कार्यशाळेच्या संचालना करता आमंत्रीत केले होते. त्या अवीस्मरणीय अनुभवांचे चित्रण पुढील भागात ……