Showing posts with label नशीब भाग - ५९. Show all posts
Showing posts with label नशीब भाग - ५९. Show all posts

May 22, 2010

नशीब भाग - ५९

आदल्या रात्रीच्या डास मारणे पराक्रमाने झोप चांगली झाली. ८ वाजता उठ्न नाश्त्या करता मुलाबरोबर बाहेर पडलो. मच्छरदाणी शिवणे आवश्यक होते. सुईदोरा विकत घेतला. खिडक्यांना नेट्लॉन बसवून घेणे आवाश्यक होते. तेव्हा जाणवले मराठी सुतार सहज कामाला मिळत नाही. एका युपी भय्याला एका दुकानदारा मार्फत शोढून काढले. जाळीची फ्रेम मला खीळे न लावता स्क्रु वापरून हवी होती. त्या महाभागाने स्क्रु वापरले पण ते खिळ्या सारखे ठोकून बसवले होते. त्या सुताराने त्याच्या गावा कडची तीन चार मुले आणली होती त्यांनी ५ छोटया व चार मोठ्या लांबट खीडक्यांना दोन दीवसात जाळी बसवून दिली. १५ दिवस डास विरहीत शांत झोप मिळाली. त्या सुताराने पाउस / वादळाचा विचार केलेला नव्हता. त्याने तसा विचारा करावा ही अपेक्षा करणे माझी चूक झाली होती. वादळी वार्‍याने खिडकीची दारे अपटून काचा फूटल्या. मग जाळी काढून काचा बसवण्याचा वेगळा खर्च करावा लागला. खिडक्यांची दारे बंद करण्याची सोपी सोय शोधून काढली. तेवढा भाग त्या प्लास्टिक जाळीचा सुरीने कापला व त्यावर चिकट पट्टी लावली.

माझा मुलगा मस्कतला सीबीएस्सी शाळेत होता त्यामूळे कोणतेही "डोनेशन" प्रकार न करता लोहगाव, पुणे, एका शाळेत प्रवेश मिळवू शकला. त्या शाळेत जातांना चेकपोस्ट ओलांडून जावे लागते. २० वर्ष बाहेर राहील्याने माझ्या जवळ पूण्यातले कुठल्याच प्रकारचे ओळखपत्र नव्हते फक्त पासपोर्ट होता. मी त्या रक्षकाला माझा पासपोर्ट दाखवला त्याने तीन सिंव्हाची नीशाणी बघून कोणाला तरी फोन केला " साब सेन्ट्रल गव्हरमेन्ट का कोई बन्दा है, इस्कूल जाना जाता है, छोड दूं?" त्याने पासपोर्ट उघडून न बघता मला आत जायला परवानगी दिली. लोहगाव विमानतळा जवळ आपला वायू सेनेचा तळ आहे, तिथे ही असली सुरक्षा? अत्यंत बेजबाबदार अशीक्षित सुरुक्षा कर्मी अशा मोक्याच्या जागी अंडी उबवीत बसले आहेत.

तिकडे मस्कतला घर रिकामे केल्याने एसीच्या जागा रिकाम्या होत्या त्यातून कधी न बघीतलेले कीडे घरात भरले होते. गाडी विकली होती त्या मुळे बाहेर जायला वाहन नव्हते. त्यात ४२ अंश तापमानाची गरम हवा. म्हणून रात्री बायको व मोठा मुलगा गच्ची वर झोपायला जात होते. तेव्हा जे कीडे चावले त्याचा परिणाम आजही त्यांना त्रास देतो आहे. ती दोघे एप्रील २००२ शेवटच्या आठवड्यात पुण्याला आली. मस्कत सोडून पुण्यात येण्याची फार मोठी चुक झाली ह्याचा दर मीनीटाला आम्हाला अनुभव येण्यास सुरु झाले. पहीला धक्का येरवड्याला त्या इमारतीत माझे घर चौथ्या मजल्यावर होते, लिफ्ट नव्हती, ३ फूट रंदीचा जीना त्यात घरात वापरायचे पाणी अत्यंत दूर्मीळ झाले, ते पाणी मिळणे हे तळ मजल्याला राहणार्‍या एका हरलेल्या नगरसेवकाच्या मर्जीचे होते. पाण्याचा त्रास सुरु झाला. पिण्याचे पाणी बाटलीचे होते ते घरपोच येत होते. शेवटी ५०० लीटरची टाकी टेरेस वर कुलुपलावून बसवून घेतली. त्या जळू नगर सेवकाने पोलीस आणले, पण प्रत्यक्ष टाकी कशी बसवली आहे हे बघीतल्यावर बेकायदेशीर काहींच नव्हते. मग दुचाकीचे पेट्रोल चोरणे सुरु झाले. ब्लेड लावून सिट फाडून झाली. मी जाळी लावून माझ्या मालकीचे गराज बंद करून घेतले. मग थोडा त्रास कमी झाला. पण शत्रु वाढले.

बजाज कंपनीत १५० सीसीची पलसर विकत घ्यायला गेलो होतो, २००३ ला ५८,०००० रोख भरले, आवश्यक कागद पत्रे दिली होती पण दोन दिवसाने गाडी घेण्यास गेलो तर राशन कार्ड व लॅन्ड्लाइन बील नसल्याने दुचाकी मिळणार नाही असे कळले. तोड्फोडीची भाषा करताच संध्याकाळी गाडी हातात आली, व्वा क्या बात है, जय माहाराष्ट्र. पुन्हा असा वाद नको म्हणून राशन कार्ड घ्यायला गेलो रांगेत इभेराहून आर्ज भरला. आतल्या बाईने मोठ्या साहेबाला भेटा म्हणून सांगितले. तेवढ्यात एक एजंट समोर आला "१५० रुपये द्या, साहेब घर पोच राशन कार्ड, लई सिम्पल बघा!" मी कायदेशीर जाण्याचा प्रयत्न केला. साहेबाला भेटलो " हा तुमचा पासपोर्ट जाली आहे. वीज बील तुमच्या नावाचे नाही, सगळे जाली आहे, बेकायदेशीर आहे. कोर्टात जा आफेडेवीट बनवून आणा मगच मीळेल." "साहेब सगळे कायदेशीर असताना का नाकारता, काही मार्ग नाही का?" मला साहेबाला तपासायचे होते. "५०० रुपये लागतील" साहेब बोलता झाला. बरय साहेब पैसे बाहेर मुला कडे आहेत घेउन येतो म्हणत मी बाहेर पडलो. १५० रुपये एजंटला दीले दोन दिवसात राशन कार्ड घरात आले. असाच प्रकार काहीसा वीज बीलावरील बील्डरचे नाव बदलताना घडला तिथे मात्र काही हजाराचा मामला होता. मग पालीकेतील आणी घराचे मालकी हक्क रजीस्टार दफ्तरी असेच काहीसे घडले. पदाचा सदुपयोग करण्याचे हे प्रशिक्षण ह्याना कोण कुठे केव्हा कसे देते हा संशोधनाचा विषय झालेला असून सरकार ह्याला आभ्यासक्रमात सामील करण्याचा विचार करते आहे असे ऐकीवात आहे.

मी त्या घरात राहयला येण्या आधी वर्षभर घर रिकामे होते. त्यामूळे वीज बील १५० रुपयाच्या वर नव्हते. ते बील एका ओळखीच्या माणसाने वेळेवर भरले होते तशा पावत्या माझ्या जवळ होत्या. पण राहीला आलो त्या महीन्याचे बील ४५,००० रुपये आले होते. बील भरायला गेलो होतो त्या कार्यालयात पोलीस बंदोबस्त होता. बरीच दगड्फेक झाली होती. भयंकर गर्दी झाली होती. झोपडीत राहणारे लोक ३० हजाराचे बील कसे झाले म्हणत भांडत उभे होते. चार दिवस रोज चक्कर मारल्यावर मुख्य अभियंताची भेट झाली. माझ्या सगळ्या पावत्या पासपोर्ट ची भारतात येण्याची तारीख बघून झाल्यावर चुक लक्षात आली व ४५,००० चे बील ३५० रुपये झाले होते. मला पुण्यात व्यावसाय करणे सोपे असण्याचे आश्वासन हीतचिंतक बहिणीने दिले होते. मोक्याच्या जागी त्यांचे दुकान होते. मी माझा मुलगा व आमची आधुनीक साधने हे छान जुळणार असे वाटू लागले. काही साधने मी त्या दुकानात आणून ठेवली होती. साधने बघून बरीच कामे वाढली पण पैसे येईनात. काही घटना घडल्या व आमचे त्रास सुरु झाले.