पुण्यात चार भिंतीत राहून कंटाळालो होतो. सहज माहाजाल चाळत असताना ऑगस्ट २०१५ ला कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक दिसले, माहिती चाळत होतो. आसाम, अरुणाचल प्रदेशातील विवेकानंद केंद्रा चे पान चाळत होतो. त्या व्यवस्थापनाला ( info@vkspv.org ) - कौशल्य विकास (स्कील डेव्हलपमेन्ट) आणि व्यासपीठ व्यवस्था (स्टेज मॅनेजमेन्ट) प्रशिक्षणाची माझी कल्पना ८ ऑगस्टला मी कळवली.
कौशल्य विकास (स्कील डेव्हलपमेन्ट) - घरगुती साधनांचे कार्य, योग्य वापर आणि दुरूस्ती. शिवणकाम, शिवणयंत्र दुरूस्ती. घरातील पाणी वीतरण व्यवस्था.
प्राथमीक व्यावसाय कौशल्ये - लाकुड-लोखंड-प्लास्टीक-दगड वापरातुन घरगुती फर्नीचर व्यवस्था. घरगुती वीज वीतरण व्यवस्था. पाणी वीतरण, पाणी पंप, पाण्याच्या टाकीचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्था, फ्लशटाकी दुरूस्ती व इतर बरेच काही.
व्यासपीठ व्यवस्था (स्टेज मॅनेजमेन्ट) - व्यासपीठ व्यवस्थापन, व्यासपीठ संचालन. व्हिडीओ, फोटो, ध्वनी नीयंत्रण, प्रकाश योजना, प्रेक्षक व्यवस्थापन, वगैरे.
ह्या सगळ्या कौशल्यांचा माझा ५० वर्षात मीळवलेला अनुभव मी देण्याचा प्रयत्न केला, करतो आहे. विवेकानंद केंद्र माध्यमातून ते शक्य होउ शकेल म्हणुन २५ ऑगस्टला संबंधीतांशी चर्चा झाली. सप्टेंबर ४, २०१५ माझा पुढचा प्रवास निश्चीत झाला.
PNR:8739167598, TRAIN:12151, DOJ:07-10-15, 3A, LTT-HWH,Dep:N.A.,
VINAYAK RANADE, B2 60, Fare:1230,SC:45.6+PG CHGS
PNR:6745737841, TRAIN:15959, DOJ:09-10-15, SL, HWH-DBRG, Dep:N.A.,
VINAYAK RANADE, S1 44, Fare:370,SC:22.8+PG CHGS
७ अकटोबर २०१५ ला दुपारी २.३० पुणे सोडले. सहाच्या सुमारास लोकमान्य टिळक स्थानकाला (कूर्ला) एकटाच पोहोचलो. रात्री ८.३५ ला समरसता एक्सप्रेसने प्रवास सुरू झाला. एक सिन्धी, दुसरा गुजराती, तीसरे पीता-पुत्र हरीयाणाचे असे सह प्रवासी बरेच बोलके होते, विषय - ज्योतसे ज्योत - सुरू होते. प्रवासात भरपुर चहा, बीस्कीटे, फळे खाल्ली. सह प्रवासी रायपूर, राजनांदगाव स्थानकावर उतरले. ९ अक्टोबर सकाळी ८.२५ ला हवडा स्थानकाला गाडी पोहोचली. स्थानकावर नासीकचे श्री नीखील नानल माझ्या मदतीला आले होते. आम्ही दोघे बंगाल प्रांत कार्यालयात गेलो. हे कै. एकनाथजी रानडे ह्यांचे कलकत्त्यातील घर होते असे मला समजले. तो परिसर मला असा दिसला.
९ अक्टोबर संध्याकाळी ५.३५ ला दिब्रुगड, आसामच्या कामरुप गाडीत बसलो. झोपण्याची जागा राखीव असल्याने काळजी फारशी नव्हती. त्याच डब्यात दिमापूरच्या एका संस्थेचे २५ खेळाडू होते, बराच गोंधळ घालत होते. ते सगळे दिमापूर स्थानकाला दुसऱ्या दिवशी रात्री १० ला उतरणार होते. मधल्याकाळात कमी अंतराचे प्रवासी ये - जा, चढ - उतर चालु होती.
८ झोपण्याच्या आरक्षीत बाकांवर दिवसा हक्काने - सरकुन घ्या - सांगणारे चढलेले होते. माझ्या बाकावर असेच दोघे, एक पुरूष एक तरूणी, हक्काने येऊन बसले. मी माझे पसरलेले पाय जवळ घेतले ती बया चक्क माझ्या पायावर मांडी ठेवून बसली, मी पण माझे पाय तसेच ठेवले. तीने अंग विक्षेप करत लांब केस मोकळे सोडले होते, मी झोपेचे सोंग करीत सगळे बघत होतो, कारण बघे बनणे सोपे, सुरक्षीत असते, असे मी अनुभवाने शिकलो आहे.
मी कानाला ब्लू ठूथ लावून प्रथमेष लघाटेने म्हटलेले - जेव्हां तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा - ऐकण्यात मग्न होतो. पुरूषाच्या बोलण्यातून त्या बये विषयी जरा कुतहूल वाढले होते. तो फोन वरून त्याच्या मीत्राला सांगत होता - तुम्हारा माल साथमे लाया हूँ, रुमपर भेजू या आप ले जाओगे — तीच्या मांडीचा माझ्या वर परिणाम न झाल्याने ती जागेवरून उठली व समोर येऊन बसली. त्या पुरूषाने मझ्या बरोबर संवाद साधला तशी ती बया तीथून उठून गेली, परत दिसली नाही.
तो पुरूष जीतकी असंबध्द माहिती देत होता तीतक्याच प्रमाणात तो - फेकू - असल्याचे जाणवले होते. आसाम पोलीस हेर खात्याचा अधिकारी, एका बहुराष्ट्रिय औषध कंपनीचा आसाम क्षेत्र संचालक, अहो गाडीत चढतांना - उतरतांना भल्या मोठ्या ४ पिशव्या, किमतीच्या लेबला सकट असलेली ४ मोठी पारीतोषीके उचलायला एक ही मदनीस नव्हता, म्हणे संचालक, तो उत्तर प्रदेशचा एक भैय्या होता —— तुमच काय मत आहे ? — हे वीचारणारा मी कोण ? — वपूंची धमाल …….
असो, आसामची राजधानी गौहाती नंतर असलेले दिमापूर स्थानक सोडतांना समोरच्या बाकावरील प्रवाशाचा मोबाईल बाहेरून चोरट्याने खेचलेला हताश होत बघीतला. झोपेने घेरले होते, डोळे बंद झाले होते. माझे सामान उचलुन चोर पळतो आहे, मी त्याचे चित्रीकरण करतो आहे, अशा स्वप्न फितीतून जागा झालो, सगळे सामान जागेवर होते. पाहटे ४ ची वेळ होती पण सगळीकडे उजेड होता, लांबच लांब चहाचे बगीचे दिसत होते. रेल्वेला चीकटून डांबरी सडक होती, त्यात असलेले खड्डे पुण्यातल्या रस्त्यांचीच उजळणी होती.
६ च्या सुमारास गाडी नवीन दिब्रुगड स्थानकात थांबली. माझे अवजड सामान कसेबसे खेचत बाहेर आलो, बाहेर विवेकानंद केंद्र अरूणाचल प्रदेश ट्रस्ट चा कार्यकर्ता मला कार्यालयात नेण्या करता आला होता. तो दिवस ११ अक्टोबर २०१५ होता. वि.के.अ.प्र. चे कार्यालय अफाट ब्रम्हपुत्रा नदीच्या काठावर आहे. एक दिवस कार्यालयात काढला. १२ अक्टोबर मी विवेकानंद केंद्र विद्यालय दिब्रुगड ला पोहचलो. ह्या शाळेचे मुख्याध्यापक मला जे काम देतील ते मी करायचे असे ठरले.
त्या रात्रीचे जेवण कसेबसे गीळले होते. पण मध्य रात्री पीत्ताचा झटका बसला. जेवलेले सगळे बाहेर पडले होते. कसेबसे सावरत भिंतीचा आधार घेत गादीवर आडवा झालो. दोनच तासात भुकेने काजवे चमकु लागले. थोडे कीसमीस, दोन खजुर, तूपा बरोबर एक केळं पोटात गेल्यावर झोपेने केव्हां घेरले समजले नाही.
पुढील चार दिवसात तब्येत फारच बीघडली. पण कीसमीस, खजुर, तूप, केळी आणि भरपुर दूधाचा वापर करून बराचसा बरा झालो, तोल जाणे बंद झाले. पण बोचरी थंडी सुरू झाली, दिवसा गादी, ब्लँकेट, कपडे, गरम कपडे ओले असावे इतके थंड होते. गुढग्यापासून खालचे दोन्ही पाय दूखणे सुरू झाले. धड चालता येत नव्हते.
ह्या सगळ्याचा परिणाम वाईट झाला. तो असा की - हा थेरडा काय कामाचा, आम्हाला काय शिकवणार वगैरे - - मला कळेल - समजेल असे मोठ्याने बोलणे सुरू झाले होते. हे प्रत्यक्षात असे घडले - शाळेचा एक गट एका स्पर्धेला जाणार होता, त्याचा फोटो दैनीका करता घेण्याचे मला सांगीतले. (असे फोटो घेण्याचा माझा ५० वर्षाचा अनुभव त्यात २५ वर्षाचा परदेशातील अनुभव.) मी सवयी प्रमाणे त्या गटाला सुचना करीत असतांना शाळेतील संस्कृत विषय शिक्षक हसत काहीतरी बोलून गेला, मला भाषा समजली नाही पण इतरांच्या कुजबूजीचा अर्थ सावध करणारा ठरला. वरील वाक्याची सुरवात अशी झाली होती. तो शिक्षक त्या शाळेचा जाणकार (घोळकर) फोटोग्राफर होता. लगेच त्याने दोन फोटो घेतले आणि त्या गटाला दाखवले, (डीजीटल कॉमेरा) माझे काढलेले फोटो त्या गटाला आवडले होते. त्या शिक्षकाने घेतलेले नेमके चुकले होते…….
पण…. आजारपण झटकुन मी काम सुरू केले …… पुढील भागात ती कामे काय होती ……….