कॉलसेंटर २ चाच हा एक वेगळा प्रकार आहे.
Business process outsourcing (BPO) is the contracting of a specific business task..... बाहेरून व्यावसाय प्रक्रिया (BPO), कंपनीतील कमी महत्वाच्या कामांची प्रक्रिया कंपनी बाहेरच्या ठेकेदाराकडून करून घेण्याची हि एक पध्दत आहे.........
Information technology outsourcing or ITO is a company's outsourcing of computer or Internet related work........बाहेरून माहिती प्रसारण तंत्रज्ञानाचा उपयोग (ITO), कंपनीला आवश्यक असणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाची संगणक व्यवस्था कंपनी बाहेरील संस्थे कडून कार्यरत ठेवण्याची ही पध्दत आहे. ह्या दोन्ही पध्दतींची वास्तवता मला माझ्या मोठ्या मुलाकडून जशी समजली ती इथे देण्याचा प्रयत्न करतो आहे ..........
माहिती प्रसारण तंत्रज्ञानातील संगणक जोडणी (नेटवर्क) जसजशी सुलभ होत गेली तसे संगणकात साठवलेल्या माहितीचे नियंत्रण करण्याच्या तंत्रज्ञानात संशोधन वाढले. एका जागेत असलेल्या संगणकातील साठवलेल्या माहितीचे नियंत्रण जगभरात जीथे इंटरनेट व्यवस्था असेल तिथून ते नियंत्रण करणे शक्य झाले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग प्रथम व्यावसायात सुरू होतो. पण काही चलाख व्यावसायीकांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून बेहिशेबी मालमत्ता तसेच आप्तेष्टांना मदत करण्याचे खेळ चालवले आहेत, ते थोडक्यात असे घडते.....
एखादी कंपनी शेअर धारकांना तसेच सरकारी कर चुकवण्या करता विवीध विभाग व जमल्यास वेगवेगळ्या नावाच्या सेवा कंपन्या तयार करते. कंपनीचा एकंदर व्यवहार वाढतो तेव्हा खर्चाचा घोळ, खरेदी / वीक्री हिशेबांचा घोळ, गोदामातील वस्तुंचा घोळ वाढतो मग BPO / ITO सारखे मध्यस्त त्या घोळाचा त्रास कमी करण्या करता कामाला जुंपले जातात. पुढील माहिती करता वापरलेल्या कंपन्यांची नावे अथवा घटना अस्तीत्वात असलेल्या कोणत्याही कंपनीशी संबंधित नाही. फक्त मुद्दा समजणे सुलभ होण्या करता वापर केला आहे......
काही दशकापूर्वी भारतातून परदेशात गेलेल्या संगणक क्षेत्रातील तंत्रज्ञांनी परदेशात त्या काळात "घर बसल्या काम" करणे स्वीकारले व त्याचा फायदा उचलायला सुरवात केली. ह्या व्यवस्थेला बऱ्या पैकी मान्यता मीळवली आणि मग त्या देशातील कर प्रणाली व इतर त्रास कमी करण्यात देशाबाहेरून कंपनीचे काम करवून घेण्यात मान्यता मिळवली. त्या मूळ कंपनीचे बरेच जास्तीचे खर्च वाचले. माझे असे लक्षात आले आहे कि कंपनीला ग्राहकांच्या व शेअर धारकांच्या तक्रारी पासून दूर राहण्या करता मध्यस्तता करणाऱ्या BPO / ITO कंपन्या तयार केल्या गेल्या. एका परदेशीय BPO / ITO कंपनीने (मी नाव दिले सायटेक) त्यांचा खर्च व त्रास कमी करण्याकरता एका भारतिय BPO / ITO ठेकेदाराला ठेका दिला (सोयी करता नाव टेकसर्व्ह).
प्रथम सायटेक BPO कंपनी प्रत्यक्षात काय करते हे समजणे आवश्यक आहे..... एका जगभरात पसरलेल्या कंपनीच्या संपर्क अधिकाऱ्याने त्याच्याच नातेवाईकाच्या नावाने सायटेक कंपनी सुरु करून त्या जागतिक कंपनीच्या एका प्रक्रियेचा ठेका मिळवला. त्या जागतिक कंपनिचा ह्या सेवेमुळे त्रास व खर्च बराचसा कमी झाला म्हणून त्या कंपनीने बरेच विभागांचे काम सायटेकला दिले. सायटेक कंपनीला मनुश्यबळ वाढवावे लागले. ते मनुष्य बळ परदेशात शिकणाऱ्या भारतियांना कमी पगारावर ठेवण्यातून सायटेकने उभे केले. सायटेक मधील सुपीक डोक्याच्या धंदेवाईक भारतियांनी भारतात टेकसर्व्ह BPO कंपनी सुरु केली. सायटेकने ओव्हरसिज सर्व्हिसेस नावाचा विभाग तयार केला. एक मुख्य अधिकारी व दोन तंत्रज्ञ मदतनीस त्या विभागात होते.
सायटेक नवीन प्रोजेक्टच्या खर्चाचा अंदाज देतांना दर तासाच्या हिशोबाने ४०० डॉलर प्रमाणे महिन्याचे ९६,००० डॉलर मोजत होते. मुख्य अधिकारी तासाला १०० डॉलर प्रमाणे महिन्याला २४,००० डॉलर पगार घेत होता. ते दोघे मदतनीस प्रत्येकी तासाला ७० डॉलर प्रमाणे महिन्याला १६,८०० डॉलर पगार घेत होते. इथे दिलेली आकडेवारी एक सरासरी आहे, काही कंपन्याची कमी तर काही कंपन्याची आकडेवारी डोक सुन्न करणारी होती.
सायटेक नवीन प्रोजेक्टच्या खर्चाचा अंदाज देतांना दर तासाच्या हिशोबाने ४०० डॉलर प्रमाणे महिन्याचे ९६,००० डॉलर मोजत होते. मुख्य अधिकारी तासाला १०० डॉलर प्रमाणे महिन्याला २४,००० डॉलर पगार घेत होता. ते दोघे मदतनीस प्रत्येकी तासाला ७० डॉलर प्रमाणे महिन्याला १६,८०० डॉलर पगार घेत होते. इथे दिलेली आकडेवारी एक सरासरी आहे, काही कंपन्याची कमी तर काही कंपन्याची आकडेवारी डोक सुन्न करणारी होती.
कामाचा ताण वाढल्यावर सायटेकने १०० डॉलर दर तासाच्या हिशेबाने भारताच्या टेकसर्व्ह कंपनीला ठेका दिला होता. त्या १०० डॉलरची विभागणी ऑफीस चालवण्याचा खर्च, ५ अधिकारी व त्यांचे १० मदतनीसात झाली होती. सायटेकचे ते दोघे मदतनीस टेकसर्व्हचे नियंत्रण अधिकारी झाले. ते दोघे फक्त कामाची जबाबदारी घेत होते. काम करण्याची वेळ, कार्यालयाची जागा, सुट्ट्या, पगार वगैरे जबाबदारी टेकसर्व्हची होती. सुरुवातीच्या काळात टेकसर्व्हच्या मराठी अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाने सायटेकचा विश्वास वाढला. (इथे प्रांतवाद हा मुद्दा नसून वास्तवता जास्त आहे) काम जसे वाढले तसे टेकसर्व्हच्या मालकाने कंपनी एका तमीळीयनला वीकून मोठा फायदा मिळवला. नवीन तमीळीयन मालकाने एक एक मराठी अधिकाऱ्याला त्रास देउन नोकरीतून बाहेर केले.
त्रास देण्याचा हा एक प्रकार - एका मराठी अधिकाऱ्याला दोन परप्रांती मदतनीस दिले होते. (इथे प्रांतवाद हा मुद्दा नसून वास्तवता जास्त आहे).....त्यातला एक तामीळी तर एक पंजाबी होता. ह्या मदतनीसांना कामाचा बराचसा अनुभव मिळाल्यावर पंजाबी मदतनीसला मॅनेजर बनवले गेले त्याला १० मदतनीस दिले. तर मराठी अधिकाऱ्याला एक तामीळी मदतनीस देउन परदेशात एक व्यावसाय संपर्क शाखा काढण्या करता पाठवले. काही महिन्यानंतर चार तामीळी मदतनीस त्या शाखेत पाठवण्यात आले. प्रथम पाठवलेला तामीळी मदतनीस त्या नवीन चार मदतनीसांचा मॅनेजर झाला. थोड्याच दिवसात मराठी अधिकाऱ्याचे महत्व कमी झाले व त्याला भारतात कमी पगारावर एका सामान्य विभागाचा मॅनेजर केले. शेवटी कंटाळून त्या मराठी अधिकाऱ्याने नोकरी सोडली.
माझा मुलगा टेकसर्व्ह कंपनीत तासाला ५ डॉलरच्या हिशेबाने (५x६०x८x३०) महिन्याला ७२,००० रुपये पगारावर एक तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. तेच काम करणारा सायटेकचा तंत्रज्ञ (७०x६०x८x३०) महिन्याला १००८००० रुपये पगार घेत होता.....
भारतातील तंत्रज्ञाला मिळणारा मोबदला, सुखसोयी मिळवण्यात होणारा खर्च ह्याची तुलना परदेशी तंत्रज्ञाचा मोबदला व सुख सोयींशी करताना मन सुन्न होते. मग जे मिळते त्यात समाधान मानावे हाच एक मार्ग असतो. उन्हात दिवसभर काम करून १२० रुपये मिळवण्या पेक्षा वातानुकुलीत जागेत दिवसभर बसण्याचे २४०० रुपये मिळणे चांगले असे तत्वज्ञानाचे बोल ऐकावे लागतात.......पण मोबदल्यातील भयंकर तफावत कमी करण्याचा न्याय कसा मिळेल हा महत्वाचा मुद्दा कसा सुटणार ????? ..........
माझ्या मुलाची नीवड ...... राजीनामा पुढील भागात.......
