Showing posts with label ध्वनी मुद्रण. Show all posts
Showing posts with label ध्वनी मुद्रण. Show all posts

November 22, 2014

अंकित पट्टी ध्वनी मुद्रण

मी एकूण ३६ पूर्ण गाण्यांच्या अंकित ध्वनी पट्ट्या (डिजिटल ट्रॅक्स) तयार केल्या होत्या, त्यापैकी काही ट्रॅक मुद्रणाचे नमूने इथे दिले आहेत. प्रत्येक वाद्याची, गायकाची एक एक ध्वनी पट्टी होती. गरजेनुसार त्या पट्टीला संपादन व आवाजाचे परिणाम साधले होते. मुद्रणाच्या जागेची कोणतीही खास व्यवस्था न वापरता साध्या राहत्या घरातील जागेत हे मुद्रण केले आहे. दोन मायक्रोफोन, मोटू इंटरफेस, चार हेडफोन, सोनी डिव्हिकॅम, ऍपल मॅक संगणक ही साधने वापरली होती. हे एक तंत्र आहे, ह्याचा उपयोग, साधने व आवश्यक महिती शिकण्या करता संपर्क करा. v.k9121@gmail.com

गाणे पहिले - जय जय योगीवरा कृपाळा -
गायक - राजेश दातार
संगीत - मुकुंद पाटणकर


गाणे दुसरे - सदगुरु राया -
गायक - ज्ञानदा परांजपे
संगीत - सुरेश देवळे



गाणे तिसरे - राम कृष्ण हरी गोविंद -
गायक - राजेश दातार
संगीत - मुकुंद पाटणकर



गाणे चौथे - त्रिपुरी पौर्णिमा जयंती तिथी -
गायक - मुकुंद मराठे
संगीत - मुकुंद पाटणकर



गाणे पाचवे - योग ज्ञानी मंत्र ज्ञानी -
गायक - शरद सुतवणे
संगीत - मुकुंद पाटणकर



गाणे साहवे - भवतारक या तुझ्या पादुका -
गायक - महेंद्र टोके
संगीत - सुरेश देवळे



गाणे सातवे - निरंजना दयाघना
गायक - महेंद्र टोके
संगीत - सुरेश देवळे


ह्या भक्तीगीतांच्या प्रकल्प निर्मात्याला मी वर्ष २००३ ला  ऑडीओ-व्हिडीओ तबकडी करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण संबधीत समाधीस्थानांची परवानगी न घेताच चित्रीकरणाला गेल्याने त्या संस्थांनी आवश्यक सहयोग देण्याचे नाकारले होते. मग फक्त गाण्यांची तबकडी करण्याचे ठरले. त्या काळात मी भारतात व पुण्यात तसा नवीन होतो, अजून कोणत्याही गटात मी नव्हतो. त्या निर्मात्याला मला फसवण्याची संडी मिळाली होती. त्या काळात एका गाण्याला त्याला १० ते १५ हजार मोजावे लागणार होते. मला फक्त एका गाण्याचे १ हजार  मिळणार होते. एकूण ३६ गाणी मी मुद्रीत केली होती. पण निर्मात्याने पुणेरी असण्याचा झटका मला दिला होता. सुरूवातीला फक्त २० गाण्यांचेच २० हजार  दिले मग पुढल्या ५ महिन्यात हप्त्याने १० हजार दिले. ६ हजार अक्कल खाती जमा करावे लागले. मी त्याला गाण्यांच्या मुळ डिजिटल ट्रॅक्स कधीच दिल्या नाहीत. फक्त तयार झालेले स्टिरिओ ट्रॅक्स दिले होते.

त्या निर्मात्याने मला न सांगता काही नावाजलेल्या मुद्रण संस्थांच्या हातात ती गाणी दिल्याने त्यांनी काटछाट करून माझी गाणी बदलली, माझे ध्वनीमुद्रक म्हणून नाव वगळले. त्या तबकडी प्रकाशन सोहळ्याला मला बोलावले नव्हते पण संगीतकार कै. पाटणकरांनी मला हजर राहण्याचे सांगितले होते. त्या सभेत निर्मात्याचे कौतूक झाल्यावर मी त्याने केलेल्या फसवणूकीची कल्पना त्या सभेत ओरडून सगळ्यांना ऐकवली. मग माझे नाव माझ्या काही गाण्यांचा ध्वनीमुद्रक म्हणून दाखल केले, तसे नव्याने प्रसिध्द केले गेले.

सावधान - संगीत क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांची फसवणुक करणारा फार मोठा वर्ग मोठ्या दिमाखात मिरवतो आहे !!!!