कृपया एक आवश्यक नोंद - ह्या सगळ्या माहितीचा खटाटोप शाळेत योग्य कौशल वर्ग का असावेत. ते नसल्याने काय घडते आणि मुला-मुलींना ह्या वयातच कौशल्याची आवड, आत्मविश्र्वास वाढण्यास मदत देण्या ऐवजी काय मीळते ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. संबंधीतांचा अपमान करण्याचा प्रयत्न नाही. पण ज्यांनी ठरवुन अपमान केला त्या व्यक्तीला ही चपराक आहे.
त्या शाळेतील सकाळची प्रार्थना व त्याला जोडुन असणारे कार्यक्रम त्या करता आवश्यक ध्वनी प्रक्षेपण व्यवस्था व त्याचे आवश्यक बदल हे काम क्रमांक १ ने सुरूवात झाली. प्रथम मायक्रोफोन कसा वापरायचा, ह्याचे प्रात्यक्षीक रोज १० दिवस झाल्यावर थोडा फरक जाणवला. त्या शाळेत कै. भुपेन हजारीका स्मृती दिनाच्या ह्या कार्यक्रमात शाळेचे ६ मायक्रोफोन असूनही ही व्यवस्था होती. एक कारण योग्य माहितीचा अभाव. दुसरे कारण काम करण्यात आळस. तीसरे कारण वार्षीक कार्यक्रमांच्या यादित अजुन एक नोंद असावी हाच उद्देश, तेवढेच त्याचे महत्व होते.
लाकडी व्यासपीठावर पादत्राणांचा आवाज होणारच. तो आवाज होउ नये म्हणून माईकला असलेले स्वीच कसे वापरावे, बोलणे सुरू करण्या अधी ऑन आहे का खात्री करा, बोलणे संपल्यावर स्वीच बंद करण्याची सवय करणे, हे अगदी आवश्यक होते. मायक्रोफोन वर फुंकण्याने आतला पडदा खराब होतो हे मायक्रोफोन उघडुन दाखवले, समजावले पण अजुनही फारसा बदल झालेला नाही. मायक्रोफोनच्या बाहेरील भागावर टीचकी मारणे दाखवले तरीही फुंकणे थांबलेले नाही.
ती ध्वनी क्षेपण यंत्रणा चालवणारा चालक १० वेगळ्या कामाकरता जात असल्याने बाकीचे अती उत्साही घोळकर त्या ध्वनी यंत्रणेतून आवाज काढत होते, पण शब्द काना पर्यंत नेण्यात असमर्थ होते. सुपीक डोक्यांनी ६० - ७० हजाराची ध्वनी योजना चुकीची ठरवुन प्रत्येक महत्वाच्या कार्यक्रमात भाड्याने ध्वनी व्यवस्था वापरण्याची सवय लावली होती. हे थांबावे म्हणुन एका गटाला मी योग्य, आवश्यक प्रशिक्षण देण्याचे ठरले.
प्रशिक्षण असे होते - विद्युत शक्ती व प्रकार. वीज मोजमापन - व्होल्ट, अॅम्प, वॉट. सुटेभाग - रेझीस्टर, कपॅसीटर, ट्रान्सफॉरमर, वगैरे. मायक्रोफोन, केबल व प्रकार, स्पीकरचे प्रकार, मोजमापन, प्री अॅम्प, मीक्सर, पॉवर अॅम्प, जुळणी वगैरे. तसेच प्रत्यक्ष ध्वनीक्षेपण जुळणी व व्यवस्थापन.
काही कर्मचारी, तो थेरडा म्हणणारा शिक्षक व ६ प्रमाणपत्रार्थी असा तो गट होता. प्रमाणपत्रार्थी का तर प्रशिक्षण सुरू होण्याअधीच पहिली शंका सर प्रमाणपत्र मीळेल का ? आजकाल वीद्यार्थी फक्त शब्द कोशात शोधला तरच सापडतो. अहो वीद्येचे माहेर घर असलेले पुणे आता फक्त वीद्या नाव असलेल्या महिलेचेच उरले आहे. ते माहेर पण मुली बरोबर उरलेले आयुष्य जगायला कॅनडाला जाण्याच्या तयारीला लागले आहे. असे अनुभवतो आहे.
असो, सहाच दिवसात प्रशिक्षण गटाला गळती लागली. कर्मचारी व तो शिक्षक गटातून गळले. पुढे काही कारणांनी प्रशिक्षण बंद झाले. ह्याचे मुख्य कारण मला वगळून प्रशिक्षणाची चुकीची माहिती दीली गेली होती. प्रशिक्षणाची वेळ एकच तास होती, इतर वेळात प्रार्थना सभागृहाचे व्यासपीठ, प्रकाश योजना व ध्वनी व्यवस्थेचे नवीनीकरण अत्यंत धीम्या गतीने सुरू होते, कारण इतर मदतनीसांची गैरहजेरी, त्यांची कामाची समज, तसेच काम लांबवणे व वीसरून जाणे फार सहज घडत होते. नवीनीकरणाचे काम मात्र मी सुरू ठेवले होते. शाळेने एक बौंड्री मायक्रोफोन व दोन नवीन स्टॅन्ड वीकत घेतले.
उभ्याने बोलत असताना मायक्रोफोन वक्त्याच्या तोंडात गेल्या सारखे दिसू नये म्हणून वायरलेस कॉलर मायक्रोफोन रेडीओ ऍन्टेनाच्या दांडीवर चढवला.
व्यासपीठाची चमकणारी मागची बाजू गडद रंगाच्या पडद्यांनी झाकली. रंगीत दिवे बदलून एकरंगी १२ सीएफएल ३५ वॉटचे दीवे वापरले. व्यासपीठावरील व्यक्ती प्रत्यक्षात, तसेच फोटो - व्हिडीओतून स्पष्ट दिसु लागल्या.
काम क्रमांक ३. त्या नंतर एका महत्वाच्या कामात मी हात घातला. प्रत्येकी ३५० वॉट असा दोन चॅनलचा अॅम्प्लीफायर व त्याला जोडणारे ४०० वॉटचे ५० कीलो वजनाचे दोन स्पीकरचे नवीनीकरण. ती वेळ दूर्गा पुजे नंतरच्या बिहु नावाच्या महत्वाच्या उत्सवाची होती. शाळेतल्याच मोजक्या लोकांनी मीळुन एक खरीदार उभा केला व शाळेचा अॅम्प्लीफायर त्याला जोडणारे दोन स्पीकर विकायला काढले.
त्या शाळेतील सकाळची प्रार्थना व त्याला जोडुन असणारे कार्यक्रम त्या करता आवश्यक ध्वनी प्रक्षेपण व्यवस्था व त्याचे आवश्यक बदल हे काम क्रमांक १ ने सुरूवात झाली. प्रथम मायक्रोफोन कसा वापरायचा, ह्याचे प्रात्यक्षीक रोज १० दिवस झाल्यावर थोडा फरक जाणवला. त्या शाळेत कै. भुपेन हजारीका स्मृती दिनाच्या ह्या कार्यक्रमात शाळेचे ६ मायक्रोफोन असूनही ही व्यवस्था होती. एक कारण योग्य माहितीचा अभाव. दुसरे कारण काम करण्यात आळस. तीसरे कारण वार्षीक कार्यक्रमांच्या यादित अजुन एक नोंद असावी हाच उद्देश, तेवढेच त्याचे महत्व होते.
लाकडी व्यासपीठावर पादत्राणांचा आवाज होणारच. तो आवाज होउ नये म्हणून माईकला असलेले स्वीच कसे वापरावे, बोलणे सुरू करण्या अधी ऑन आहे का खात्री करा, बोलणे संपल्यावर स्वीच बंद करण्याची सवय करणे, हे अगदी आवश्यक होते. मायक्रोफोन वर फुंकण्याने आतला पडदा खराब होतो हे मायक्रोफोन उघडुन दाखवले, समजावले पण अजुनही फारसा बदल झालेला नाही. मायक्रोफोनच्या बाहेरील भागावर टीचकी मारणे दाखवले तरीही फुंकणे थांबलेले नाही.
ती ध्वनी क्षेपण यंत्रणा चालवणारा चालक १० वेगळ्या कामाकरता जात असल्याने बाकीचे अती उत्साही घोळकर त्या ध्वनी यंत्रणेतून आवाज काढत होते, पण शब्द काना पर्यंत नेण्यात असमर्थ होते. सुपीक डोक्यांनी ६० - ७० हजाराची ध्वनी योजना चुकीची ठरवुन प्रत्येक महत्वाच्या कार्यक्रमात भाड्याने ध्वनी व्यवस्था वापरण्याची सवय लावली होती. हे थांबावे म्हणुन एका गटाला मी योग्य, आवश्यक प्रशिक्षण देण्याचे ठरले.
प्रशिक्षण असे होते - विद्युत शक्ती व प्रकार. वीज मोजमापन - व्होल्ट, अॅम्प, वॉट. सुटेभाग - रेझीस्टर, कपॅसीटर, ट्रान्सफॉरमर, वगैरे. मायक्रोफोन, केबल व प्रकार, स्पीकरचे प्रकार, मोजमापन, प्री अॅम्प, मीक्सर, पॉवर अॅम्प, जुळणी वगैरे. तसेच प्रत्यक्ष ध्वनीक्षेपण जुळणी व व्यवस्थापन.
काही कर्मचारी, तो थेरडा म्हणणारा शिक्षक व ६ प्रमाणपत्रार्थी असा तो गट होता. प्रमाणपत्रार्थी का तर प्रशिक्षण सुरू होण्याअधीच पहिली शंका सर प्रमाणपत्र मीळेल का ? आजकाल वीद्यार्थी फक्त शब्द कोशात शोधला तरच सापडतो. अहो वीद्येचे माहेर घर असलेले पुणे आता फक्त वीद्या नाव असलेल्या महिलेचेच उरले आहे. ते माहेर पण मुली बरोबर उरलेले आयुष्य जगायला कॅनडाला जाण्याच्या तयारीला लागले आहे. असे अनुभवतो आहे.
असो, सहाच दिवसात प्रशिक्षण गटाला गळती लागली. कर्मचारी व तो शिक्षक गटातून गळले. पुढे काही कारणांनी प्रशिक्षण बंद झाले. ह्याचे मुख्य कारण मला वगळून प्रशिक्षणाची चुकीची माहिती दीली गेली होती. प्रशिक्षणाची वेळ एकच तास होती, इतर वेळात प्रार्थना सभागृहाचे व्यासपीठ, प्रकाश योजना व ध्वनी व्यवस्थेचे नवीनीकरण अत्यंत धीम्या गतीने सुरू होते, कारण इतर मदतनीसांची गैरहजेरी, त्यांची कामाची समज, तसेच काम लांबवणे व वीसरून जाणे फार सहज घडत होते. नवीनीकरणाचे काम मात्र मी सुरू ठेवले होते. शाळेने एक बौंड्री मायक्रोफोन व दोन नवीन स्टॅन्ड वीकत घेतले.
उभ्याने बोलत असताना मायक्रोफोन वक्त्याच्या तोंडात गेल्या सारखे दिसू नये म्हणून वायरलेस कॉलर मायक्रोफोन रेडीओ ऍन्टेनाच्या दांडीवर चढवला.
व्यासपीठाची चमकणारी मागची बाजू गडद रंगाच्या पडद्यांनी झाकली. रंगीत दिवे बदलून एकरंगी १२ सीएफएल ३५ वॉटचे दीवे वापरले. व्यासपीठावरील व्यक्ती प्रत्यक्षात, तसेच फोटो - व्हिडीओतून स्पष्ट दिसु लागल्या.
व्यासपीठाच्या उजव्या बाजूच्या रिकाम्या खांबाचा उपयोग केला, ध्वनी व्यवस्थेची सगळी जुळणी त्या खांबात बसवली. वायरलेस रीसीव्हर बसवला. त्या व्यवस्था चालकाला लेखी व प्रात्यक्षीकाचे योग्य प्रशिक्षण दिले. ह्या नवीनीकरणाचा मला तर फायदा झालाच पण शंकाग्रसतांची तोंडे बंद झाली. काही हित चिंतकांनी स्तुती केली. हे काम क्र. २ होते.
जुन्या साधनांची विकण्याची किंमत ३० हजार रुपये तर नवीन पध्दत व साधने ८० हजाराला विकत घ्यावी लागणार होती. माझ्या पध्दीने त्या जुन्या साधनांचे नवीनीकरण १० हजारात होणार हे ठरल्याने ते खरीदार माझ्या वीरूध्द झाले. मी सल्ला दीलेल्या प्रत्येक कामात विरोध सुरु झाला होता.
१५ इंचाचे २००वॉट्सचे दोन वुफर, एक ट्वीटर व एक क्रॉसओव्हर असा संच एका खोक्यात होता. मी ते सगळे वेगळे केले. सुताराला नवीन खोकी तयार करण्यात मदत केली. दोन अतीरिक्त ट्वीटर व क्रॉसओव्हर वीकत घेतले. जुन्या दोन खोक्यांतील ४ स्पीकर वापरून नवीन चार खोकी तयार झाली.
एका दुपारी शाळा सुटल्यावर स्पीकरचा एक खोका चाचणी करता खाली नेला. जुळणी झाली. मी मोबाइलच्या साह्ह्याने प्रथमेष लघाटेचे गाणे - आयो कहांसे घन श्याम - सुरू केले. तो स्वच्छ दणदणीत आवाज ऐकत शाळेत असणारे सगळे एकत्र जमले. एकाच खोक्याच्या स्वच्छ आवाजाचे सगळ्यांनाच आच्श्रर्य होते. खोके बनवणारा सुतार एका वेगळ्याच आनंदात होता. पण मुख्याध्यापक - रानडे तुम्हाला इंजीनीअरींग चांगले कळते पण ह्युमन इंजीनीअरींग समजलेले नाही - मी त्याचे उत्तर लगेचच फेकले - माणसे केव्हांही, जसे जमेल तसा धोका देतात हे चांगले समजल्यानेच ह्युमन इंजीनीअरींग पासुन मी दोन हात दूर असतो. तो धोका तीथेच काही दिवसातच अनुभवला …..
पुढील भागात ……