July 13, 2016

असामात असा मी ५

एक आवश्यक सुचना - ह्या सगळ्या माहितीचा खटाटोप शाळेत योग्य कौशल वर्ग का असावेत. ते नसल्याने काय घडते आणि मुला-मुलींना ह्या वयातच कौशल्याची आवड, आत्मविश्र्वास वाढण्यास मदत देण्या ऐवजी काय मीळते ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. संबंधीतांचा अपमान करण्याचा प्रयत्न नाही. पण ज्यांनी ठरवुन अपमान केला त्या व्यक्तींना ही चपराक आहे. 

असामी असा मी २ मधले डिसेंबर २०१५ ला सुरू केलेले स्पीकरचे काम रंग, जाळी वगैरे सगळे फेब्रुअरी २०१६ ला पुर्ण झाले.  त्यातला एक खोका पत्र्याच्या सभा मंडपात ११ फुटा वर बसवला. वापरात असलेले लाकडी स्टेज मंडपाच्या शेवटाला नेल्यास, खोक्याची दिशा सहज बदलण्याची व्यवस्था मी केली. खोका वर चढल्यावर एकाच खोक्यातुन ११फुट उंच, ४५ फुट रूंद आणि १७०फुट लांब मंडपातच नव्हे तर पार मैदानात स्वच्छ आवाज पोहचत होता. आता बाकीच्या तीन खोक्यांचा काय उपयोग ? पण दुसरा खोका मंटपाच्या शेवटाला बसवला. उगीच आवाज न वाढवता सगळीकडे समप्रमाणात आवाज देण्याची मी सोय करून दीली. उरलेली दोन खोकी जरूर भासेल तशी वापरायला सुटीच ठेवली.    





काम क्रमांक ४ LCD प्रोजेक्टर व  त्याचा पडदा बसवण्याचे काम. ते हे असे केले. सगळे व्यवस्थीत बसवल्यावर चाचणी करता साहेबाला (कुचकट मुख्याध्यापक) बोलावायला काही घोळकर गेले. साहेब पचकला खरं म्हणजे खुप दिवस माझ्या मनात हे असे असावे असे होते पण काम करणारा मीळत नव्हता, अता मना सारखे झाले.  घोळकरांना अरे काही बीघाड झाला तर काय करावे लागेल ते नीट समजुन घ्या.  हे म्हणजे खारे दाणे खातांना एखादा कुजकट दाणा चावला गेल्यावर जे घडते तसे माझे झाले होते. 
 


















मुळात त्या सभागृहाचा चालक साहेबाचा अनेकातला एक ढवळाढवळ करणारा चमचा होता. त्याला तो प्रोजेक्टर रोज ने-आण, जुळणी करण्याचा कंटाळा होता म्हणुन त्यानी मला वीचारले होते असे काही करणे शक्य आहे का आणि मी ते करू शकतो का? त्याला चमचा फिरवण्यात यश मिळाले होते. साहबाचे हेच ते ह्युमन इंजीनीरींग होते. थोडक्यात चमचे बनवणे, फोडा आणि राज्य करा प्रकार होता…. पडदा वर टांगण्याची व्यवस्था तयार करतांना एक चांगला लोहार लाभला, मला जे काही अपेक्षीत होते ते समजुन घेऊन त्याने दोन छान ब्रॅकेट बनवुन दिले.     

त्या शाळेतुन बाहेर पडण्याची एक चांगली संधीं मीळाली. टिंगराइ गावातील केंद्राच्या शाळेतील सभागृहाची ध्वनी योजना व ध्वनी परावर्तनाचा त्रास कमी करण्याचे काम केंद्राने सांगितले. ते सभागृह असे होते. 



   
सर्व प्रथम ध्वनी व्यवस्थेचे काम सुरू केले. सभागृहाच्या आत ६ लांबट स्पीकरची खोकी मी मागीतली होती पण कोणी तरी डोके चालवुन चारच खोकी मागवली आणि दोन भोंगे सभा गृहाच्या बाहेर बसवण्याचे ठरले.  मी त्या शाळेच्या जुन्या अॅम्लीफायरला ६ चॅनलचा एक ऑडीओ मीक्सर जोडला, २ लांबट माइक, १ गूजनेक व तीन जुने माइक जोडण्याची व्यवस्था केली. शाळेतील परिक्षा सुरू झाल्या, मला मदनीस मीळणे अवघड झाले. मदनीस जे माझ्या बरोबर काम करून कामे शिकणार आणि जबाबदारीने माझ्या नंतर त्या कामांची जबाबदारी सांभाळणार असा मुख्य उद्देश होता. 

पण २९ जानेवारी २०१६ मला केंद्राचा संस्कृती वीभाग, गौवहातीला बोलावले गेले. त्या इमारतीला २२ वर्ष पुर्ण झाली त्या कार्यक्रमाचे व्हिडीओ - फोटो काम मला करायचे होते.   ते पुढील भागात .. .. ..