सकाळचा नाश्ता झाला डॅनी बाहेर भटकायला म्हणून तयार झाला. बायकोने अधीच सांगुन टाकले "आम्हाला तुमचा त्रास नाही, आमची व्यवस्था आवडली नसेल तरच बाहेर हॉटेल बघा!" डॅनी - "तुझी बायको अजून पुणेरी झालेली नाही, सरळ मला तुझ्या घरात राहण्याची परवानगी देउन टाकली!" मी - "कसे सांगु? असा तुझा गोंधळ होउ नये म्हणून तीने तीचे मत स्पष्ट केले!"
आम्ही दोघे बाहेर पडलो, डॅनीने तरीही दोन हॉटेलची पाहणी केलीच. (त्याने हॉटेलच्या भाड्याचा शोध घेतला होता कारण पुणे सोडताना आम्हाला एक बंद पाकीट देउन गेला तेव्हा मला ते उमगले होते.) घरी परतलो लगेच ह्याचे डबा उघडून पीणे सुरु झाले. त्याने ऍनचा वीषय सुरु केला. मी त्यानेच सांगितलेल्या विनोदाची आठवण करुन दिली - "एक उंदीर दारूच्या बार मधून झींगत बाहेर येतो आणि ओरडतो कुठे आहे ते मांजर?" तसेच तुला बोलण्या करता पीणे आवश्यक आहे का? डॅनी - "हि सवय बोटीवरची, पण बायको सोडून गेली तेव्हा पासून सुटत नाही रे, खूप प्रयत्न केला यार अजून जमत नाही!!!!"
"विकीच्या जन्मानंतर दिपकला लंडनचा कायम राहण्याचा परवाना मिळाला, तेव्हा पासून त्या दोघांची धुसपूस सुरु झाली हे आईच्या लक्षात यायला थोडा वेळ लागला. दिपक फॅमीली गॅदरींगला मात्र एकदम आवडता होता. विनोद करत हासत खेळत सगळ्यांचा आवडता झाला होता. ऍनची डिलेव्हरी नंतरची सुटी संपली, काम सुरु झाले तीच्या सोयी करता तीला एक चार चाकी मी दिली. माझी आई ऍननच्या घरात विकी तीन महिन्याचा होता तेव्हा पासून रोज सकाळ ते संध्याकाळ तिच्या घरी होती. ऍन व विकीबद्दल प्रेम म्हणून आई दर महिन्याला काही तरी भेट वस्तू देत होती. हळूहळू दिपक काम जास्त आहे असे सांगत घरी उशिरा येत असे.
दिपकचा भाउ लंडनला उच्च शिक्षणाकरता आला काही वर्षात त्याला ही कायमचा परवाना मिळण्यात आईने व सनीने मदत केली होती. त्यानंतर बहिण सीमा लंडनला उच्च शिक्षणाकरता आली, तीचे व सनीचे मीत्र प्रेम वाढू लागले, त्या काळात त्याच्या डायव्होर्सला दोन वर्ष झालेली होती. आम्ही कोणीच सनी व सीमाच्या प्रेमाला फारसे महत्व दिले नव्हते. काही महिन्यात दिपकचे आई-वडील डिपेन्डन्ट नियमाखाली कायमचा परवाना घेउन लंडनला कायम राहण्या करता आले.
"ऍन, दिपक त्याचे आई-वडिल व माझ्या आईचे मदभेद सुरु झाले होते पण सनीला व मला समजू दिले नव्हते. असेच एकदा विकी बरोबर खेळण्या करता सनी ऍनच्या घरी गेला होता. त्याला ऍनचा लाल डोळे व रडका चेहेरा लपवण्याचा प्रयत्न लक्षात आला. ऍनला तिच्या खोलीत नेले व धमकी देवून रडण्याचे कारण विचारले होते." सासूच्या इंग्रजी बोलण्याचा अर्थ ऍनला समजल्यावर खूपच झटका बसला होता. सासूने सरळ धमकी दीली होती. "पंजाबी रिती रिवाज, जेवणाखाण्याची सवय करायला हवी, नाहितर पंजाब मधून आम्ही दुसरी चांगली मुलगी दिपक करता बघीतली आहे, भरपूर पैसा मीळणार आहे."
सनीने माझ्या आईला सगळे सांगितले, आईचा खूप मनस्ताप झाला होता. आईला पंजाबी समजत होते. आईने नच्या सासुला कोणी पंजाबी मुलगी आहे का, तिव्या भावाच्या मुलाकरता शोधत चालू आहे असे चाचपडत वीचारले. सासूने "फोटो, पगार व घर असल्याचे दाखवा १० मुली तयार आहेत. छान पैसा व सोने मिळेल." आईने शंका वीचारली "पण मुलगा डायव्होर्सी आहे?" सासू - "अहो पंजाब सोडून परदेशात जायला मुली लगेच तयार होतात!"
ऍनने तरीही जुळवून घेण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. तीला आमच्या डायव्होर्सी क्लबचे मेम्बर व्हायचे नव्हते. सासूने नेमेके तेच ऍनला एकदा बोलताना सांगितले - "डायव्होर्सी असणे तुझ्या फॅमीलीत नवीन नाही तेव्हा दिपकला मोकळे कर!" ह्या वाक्यावरून ऍन दिपक बरोबर भांडण झाले त्यात दिपकने तीला मारले ते चार वर्षाच्या विकीने बघितले तेच माझ्या आईला सांगितले. ऍन माझ्या घरि आली असताना आईने तिला कपडे काढायला सांगितले व मारहाणीच्या खूणांचे फोटो घेतले. मग आम्ही एका ब्रिटीश वकील बाईला भेटलो. तीने तर हा फार मोठा धंदा असल्याचे सांगितले - "माझ्या कडे एक केस चालू आहे एका आइने आपल्या मुलीला न सांगता एका पंजाब्याला १५ हजाराला दिले असे उघडकीला आले आहे. त्या पंजाब्याने त्या मुलीला नशेची सवय लावली, तीला पुढे करुन पैसे मिळवले होते."
"आम्हा सगळ्यांचेच डोळे खाडकन उघडले होते. फॅमीलीचा कायम परवाना मिळवण्याचा नकाशा दिपकला अशाच एका वकिलाने दिला होता. नकाशाचे पालन दिपक जेव्हा आमच्या घरात पीजी म्हणून राहिला आला तेव्हाच सुरू झाले होते. दिपकने फार छान नाटक करून आम्हाला फसवले होते. वकिल बाईच्या सांगण्याप्रमाणे एकदा ऍन विकीला घेउन घर सोडून आली. दिपक वीरूध्द एक तक्रार नोंद झाली. दोन महिन्यानंतर पुन्हा वाद झाल्यावर तेव्हा पासून ऍनने आमची डायव्होर्सी क्लबची मेम्बरशिप घेतली आहे. अधून मधून कोर्टात जावे लागते. सध्या माझ्या घरात राहते आहे." हे सांगत डॅनीने विकत घेतलेले बीअरचे सगळे डबे संपवले होते. डॅनी - "आज मी आमच्या प्रत्येक डायव्होर्सचा जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येते, प्रत्येक लग्न संबंधात आम्ही गाफील होतो, आम्ही भावना प्रेमी होतो, विरुध्द पक्षाचे उद्देश आधीच ठरलेले होते. ह्याला लग्न म्हणायचे की नफा-तोट्याचे प्रेम म्हणायचे????? डोक्याचा भुगा होतो यार!!!!!"
वाचक हो ह्याला नशीब म्हणायचे की नाण्याच्या चार बाजू न समजण्याचा प्रकार मानायचे .........


