November 26, 2014

डॅनी डंकन १

मी इमेल खाते वाचायला म्हणून उघडले, वाचत असताना डॅनी डंकन ह्या नावाने माझे लक्ष वेधले. "मी डॅनी डंकन ....." असे विषय विभागात लिहिले होते. मी त्या मेलला स्पॅम म्हणून टाकणार होतो. खात्री करण्या करता मेल उघडली, मजकुर वाचताना फोटो दिसला आणि माझी ट्यूब पेटली. १९७१ - ७३ ला मी डॅनी बरोबर सांताक्रुझला पेईंग गेस्ट पध्दतीने एका जागेत राहात होतो. आम्ही दोघांनी नोकऱ्या बदलल्या, ती जागा सोडली. त्या काळात मोबाइल, मेल प्रकार नसल्याने एकमेकाचे संपर्क कायम ठेवणे शक्य नव्हते. मी त्या मेलला उत्तर पाठवले, त्याची विचारपुस केली फोन नंबर राहण्याचा पत्ता कळवला.

घटना तंतोतंत सत्य आहेत पण पात्र, नावे व जागा बदललेल्या आहेत. 

असेच काही दिवस गेले मी त्या मेलला वीसरलो होतो. एका रात्री डॅनीने फोन केला होता.  तो काही महत्वाच्या कामाकरता पुण्याला येणार होता. तो चांगल्या हॉटेलच्या शोधात होता. त्याने सरळ पुण्याच्या लोहगाव एअरपोर्टला उतरल्यावर आधी माझ्या घरी येण्याचे ठरले, नंतर दुसऱ्या दिवशी हॉटेलचा शोध घेण्याचे ठरले होते. दहा दिवसाने डॅनीचा मेसेज, एका तासात जेट एअरच्या 9W618 च्या विमानाने तो पुण्याला पोहचणार होता. ठरल्या प्रमाणे आम्ही भेटलो. घरी परतताना एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली, कोणी ओळखीचा चेहरा दिसला होता, खात्री करतो म्हणत तो खाली उतरला व गाडीच्या मागे गेला. मी त्याला आरशातून बघण्याचा प्रयत्न केला दिसला नाही. थोड्या वेळाने त्याने गाडीचे मागचे दार उघडले एक काळी पीशवी आत टाकली व शेजारी येउन बसला. मी डब्यांचा आवाज ऐकला होता " अरे तुझा मेसेज येताच मी तयारी केली होती." त्यानी मला डिवचण्याचा प्रयत्न केला "शंका, भटाकडे लिंबू पाणी नाहितर ताक पिण्यापेक्षा आपणच सोय केलेली बरी !" 

"डॅनी ह्या भटाला अजून ओळखले नाहीस? लिंबू पाणी, ताक हातात असले तरिही मित्राची सोय पण पाळणार!"  डॅनी अंघोळ आटपून ताजातवाना झाला होता. टेबलवर मी त्याची तयारी केली होती. त्याने लगेच बीअरचा डबा उघडला व गटागटा अर्धा संपवला. मला जेवणा अगोदर मसाला ताकाची सवय, पहिलाच घोट संपवत डॅनीला बोलते केले.

वर्ष १९७४ला डॅनी बोटीवर कामाला लागला व सतत फिरती सुरू झाली होती. एका प्रवासात पॅटशी (पॅट्रिशीया) ओळख झाली, सहा महिन्याच्या सुटीत लग्न झाले. ती लिव्हरपुलच्या एका कंपनीत कामाला होती. हा नेहमीप्रमाणे सहा महिन्याच्या प्रवासाला गेला. सहा महिन्याच्या सुट्टीला परत आला असताना पॅटने गोड भेट दिली होती, पहिला मुलगा सनी, दोन वर्षानी गोड ऍनाचे आगमन झाले होते. दोन्ही मुलांना सांभाळण्यात मदतीला डॅनीची आई लिव्हरपुला आली होती. डॅनीचे सहा महिन्याचे प्रवास सुरळीत चालू होते. एका सुट्टीला डॅनी आला होता तेव्हां पॅट तीच्या एका सहकाऱ्या बरोबर ५वर्षाच्या सनीला व ३वर्षाच्या ऍनाला मागे ठेवून निघून गेली.......काही दिवस डॅनीचा दारूत दु:ख विसरण्याचा प्रयत्न झाला होता, पण आईने त्याला सावरले. बोटीच्या एंजीनचा अनुभव असलेल्या डॅनीने लंडनच्या एका उपनगरात गॅरेज सुरु केले तेच सनी आज व्यवस्थीत सांभाळतो आहे.

मी - "सनीची बायको मुलं कशी आहेत?" डॅनी - "सनीचे पहिले लग्न मोडले. मग बरीच वर्ष त्याने लग्न केले नही. पण गेली १० वर्ष एका डायव्होर्सी बरोबर असतो. तीच्या पहिल्या लग्नाची दोन मुलं आहेत. वीथ गॉडज ग्रेस अजून सगळे ठीक आहे."

माझी बायको हात कोरडे करत टेबला जवळ केव्हा येउन बसली आम्हा दोघांना कळलेच नाही. तिने ऍना विषयी प्रश्न विचारल्यावर आमच्या लक्षात आले. डॅनीचा दुसरा डबा संपला होता, तिसऱ्याला हात लावताना बायकोने जेवण तयार असल्याचे सांगितले. तळलेले मासे पाहून डॅनीने वीचारले "भटा तू बाहेर खातोस हे माहित होते पण घरात शिजवतो हे कसे?" मी -"अरे, बायको मुळची भटीण नाही, तीला बाहेरच्या किचन मधल्या स्वच्छतेची नेहमीच शंका असते, म्हणून सगळे घरात सुरु केले! अरे ही तर मीठ साखर सुध्दा धुते!" बायको -"नसते वीनोद नको, मीठाचे पाणी भाजीत लवकर मिसळते व साखरेचा पाक थंड दुधात, कॉफित लवकर विरघळतो म्हणून तसे मी वापरते!" डॅनी -"काय सुपीक डोके आहे!"  मी - " डॅनी तू भटाच्या घरात आहेस, काय समजलास?" 

असो, जेवण संपताच बायको व मी ऍना कशी असेल हे समजण्या करता पुढे सरसावलो.......  डॅनीने बीअरचा तिसरा डबा तोंडाला लावला, डबा खाली ठेवताना त्याच्या डोळ्यात भरलेले पाणी चमकले होते. ऍनावर माझ्या आईचे खूप प्रेम आहे. आईने तिला भारतिय जास्त व कमी ब्रीटीश असे वाढवले आहे. ८ वर्षा पूर्वी तीने एका भारतिय पंजाब्यासी लग्न केले, तीचा ५ वर्षाचा स्मार्ट विकी मुलगा आहे. पण गेली दोन वर्ष तीची डायव्होर्स केस चालू आहे." डॅनीने डोळे पुसले, पटकन तिसऱ्या बीअरचा डबा संपवला व चौथ्याला हात घातला होता.

बायको व मी एकाच वेळी "तुझ्या फॅमिलीत डायव्होर्स घेणे जन्मसिध्द हक्क असल्या सारखे काय चालवले आहे?" डॅनी - "तसे नाही मीत्रा, पण ती पत्रिका कि काय ते बनवावे असे वाटते आहे. अरे माझ्या आईचा पण पहिल्या लग्नात माझ्या जन्मा आधी डायव्होर्स झाला होता !!!!" हे सगळेच धक्कादायक होते.

मी डॅनीला त्याची झोपायची सोय केलेली दाखवली. पण रात्री त्यानेच ऍनाचा विषय पुन्हा सुरु केला. "एकदा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरताना हा पंजाबी दिपक मल्होत्रा माझ्या आईशी बोलायला पुढे आला होता तिथून ओळख वाढत गेली. मग एका भेटीत त्याने पीजीची जागा मीळवण्यात मदत मागीतली. आईने त्याला चक्क आमच्या घरीच जागा दिली. कारण आईला तो खुप प्रेमळ वाटला होता. प्रत्येक कामात मदतीला पुढे येत होता. माझ्या गॅरेजच्या कामात हिशेब सांभाळत होता. तेव्हा तो सीएच्या परिक्षा देत होता.

"एकदा परीक्षेचे पैसे आईनेच दिले कारण भारतातून त्याचे पैसे वेळेवर आले नव्हते. असेच काही महिने उलटले. एके दिवशी ऍनाने दिपकशी लग्न करायची ईच्छ आईला बोलून दाखवली. आम्हा सगळ्यांनाच त्यात आनंद झाला, कारण दिपकचे सीएचे काम चांगले होते चांगला पगार मिळत होता. काही हजार पौंड खर्च करून ऍनाचे लग्न चर्चच्या पध्दतीत झाले. सगळा खर्च मी केला. दिपकचे आई-वडिल वगैरे नातेवाईक आले होते. मग  पंजाबला जाउन पुन्हा पंजाबी हिन्दू पध्दतीने लग्न करण्याचे ठरले. आईने जाण्या-येण्याचा आमचा खर्च मला करायला सांगितला, तो पण मी केला. पण त्या लग्नात ऍनाला मिळालेल्या सगळ्या भेट वस्तू दिपकच्या आजीने माझ्या आई कडून मागून घेतल्या होत्या. आईने पण त्या वस्तू देउन टाकल्या होत्या."

आम्हा दोघांना डॅनीच्या वेदना समजत होत्या. रात्र झाली होती, डॅनीचा थकवा जाणवत होता, त्याने बीअरचे तीन डबे संपवले होते. पण ऍनाच्या डायव्होर्सची वेळ का आली हे समजून घेणे महत्वाचे झाले होते..........