July 20, 2014

कॅाल सेंटर - १

काही दशका पूर्वी बँक, टेलीफोन, सरकारी कार्यालये वगैरे सेवांची माहिती मिळवण्या करता दूरध्वनी सेवा होती. परंतू त्या सेवेतील संपर्क व्यक्ती वेळेवर जागेवर असणे व थोड्या वेळात तुम्हाला हवी असलेली माहिती मिळणे हे बरेच त्रास दायक झाले होते. उपभोगत्याला माहिती सेवा सुलभ करण्या करता "कॉल सेंटर" व्यवस्था तयार करण्यात आली, असा समज करून देण्यात आला, पण खरा उद्देश संबंधीत कार्यालयातील भोंगळ कारभार व गोंधळ उपभोगत्याला समजु नये असाच असतो हे मला अनुभवाने समजले आहे.

कोणत्याही कार्यालयातील सेवे संबंधी फोन करायची वेळ आली की माझ्या डोक्याचा त्रास वाढतो. फोन जोडला जाताच सेवा निवडीच्या क्रमांकाची दाबादाबी ऐकावी लागते.  नीवड केलेल्या सेवेचा क्रमांक दाबताच संबंधीत व्यक्तीशी संपर्क साधण्यात बराच वेळ जातो.




चांगल्या अनुभवांपेक्षा चीड आणणारे प्रकार जास्त घडले. हा एक अनुभव  - "टिकोना" नावाच्या इंटरनेट सेवा संस्थेचा एक विक्रेता आवश्यक साधने घेउन माझ्या घरी आला होता. साधने जोडून ४ MbPS वेगाची सेवा कशी मिळेल ह्याचे प्रात्यक्षीक त्याने दिले. मला ती सेवा आवडली, लगेचच मी त्याला २०००रु. भाड्याचा चेक  िदला. दोन दिवसात सेवा सुरु झाली. नव्या नवतीचे दोन दिवस संपले. इंटरनेट सेवेचा लपाछपीचा खेळ सुरु झाला. दोनतीन तक्रारी नंतर एक तंत्रज्ञ झोळीभर साधने घेउन भेटीला आला. चारपाच साधने बदलत तो चाचपडत होता, एका साधनाने सेवा सुरु झाली. दोन दिवसातच येरे माझ्या मागल्या पुन्हा सेवा खंडीत झाली होती.

इंटरनेट सेवा घेतल्या पासूनचा हा चौथ आठवडा होता, तक्रार केली त्याला उत्तर होते आधी कॉल सेंटरच्या दूरध्वनी क्रमांशी संपर्क करा. पाच तासात सेवा सुरु करण्याचे आश्वासन मिळाले, व सेवा सुरु झाली. हा प्रकार त्या १० दिवसात दोन वेळा झाला. ह्या प्रकाराणात भाड्याचा पहिला महिना संपला. पुढल्या महिन्यात पुन्हा दोन वेळा सेवा बंद झाली. मी सेवा बंद करण्या करता ई-मेल पाठवली. पण एक तंत्रज्ञ घरी आला त्याने धक्काच दिला, ह्या भागात "टिकोना" सेवा घेण्याची मी चूक केल्याचे मला सांगितले. त्याच्या भेटीची, नाव, मोबाइल क्रमांक माहितीची ई-मेल मी पाठवली. नवीन तंत्रज्ञ आला, १५ दिवस बऱ्यापैकी इंटरनेट सेवा मिळाली पण लपाछपी सुरु होतीच.  असेच तीन महिने संपले. अशाच एका तक्रारीत मला वाय-फाय साधन बदलण्याचा सल्ला दिला गेला, त्या करता २००० रु प्रथम द्यावे लागले, तो प्रकार यशस्वी झाला नाही. पैसे परत मिळवण्यात महिना गेला. सगळ्या प्रकाराला कंटाळून मी टिकोनाच्या संपर्क अधिकाऱ्याला ई-मेल करून सेवा बंद करण्याचे कळवले. त्या अधिकाऱ्याने एका नवीन तंत्रज्ञाला पाठवले. त्याने बरेच प्रयत्न केले व शेवटी त्या अधिकाऱ्याला सेवा देणे शक्य नसल्याचे माझ्या समोर कळवले, सेवा बंद झाली, तसे प्रमाणपत्र त्या तंत्रज्ञाने मला दिले.

दोन दिवसाने टिकोनाची साधने नेण्याकरता माणूस आला, त्याने साधने घेतल्याचे पत्र मला दिले. मी ६ महिने १२०००रुपये देउन छळ सहन केला होता..... पुढल्याच महिन्यात "टिकोना कॉल सेंटर" मधून त्रास सुरु झाला, मी ४०००रुपये देणे आहे लवकर पैसे भरा वगैरे..... असले फोन येणे सुरु झाले, मी दर वेळेला सगळा घटना क्रम सांगत होतो. अशाच एका फोनला माझ्या मुलाने उत्तर दिले, पैसे देणे नसून संपर्क अधिकाऱ्याला विचारा आम्ही सेवा कधीच बंद केली आहे व मुलाने फोन बंद केला. काही क्षणात पुन्हा फोन आला ह्या वेळेस व्यक्ती दूसरी होती. माझ्या मुलाने त्या व्यक्तीला त्या आधी झालेले संभाषण सांगितले व त्या पहिल्या व्यक्तीचे नाव सांगून फोन बंद केला. काही क्षणात त्या पहिल्या व्यक्तीने फोन करून शिवीगाळ सुरु केली. माझ्या मुलाने ते संभाषण ध्वनी मुद्रीत केले. ती ध्वनी फित आम्ही "टिकोना" संपर्क अधिकाऱ्याला ई-मेल द्वारे पाठवली त्यातच सरळ धमकी दिली, "पुन्हा असा फोन आल्यास तुमच्या कॉल सेंटरचा पत्ता आम्हाला माहित आहे तीथे येउन त्या शिव्या देणाऱ्या व्यक्तीला ठोकून काढू." अशी ही न टिकणारी "टिकोना" सेवा आणि असे हे "कॉल सेंटर" !!!!!!

माझ्या मुलाने तीन चार नावाजलेल्या " कॉल सेंटरांचा" चार महिने ते २ वर्ष कामाचा अनुभव मीळवलेला आहे. त्याच्या बरोबर मी पण रोज एक बाप म्हणुन अनुभव घेत होतो. त्याचे इंग्रजी चांगले असल्याने एका मानव संसाधन पुरवणाऱ्या संस्थेत चार महिने भाषा प्रशिक्षणाचे काम त्याने केले होते.  त्या संस्थेचा मानव संसाधनाची आवश्यकता असणाऱ्या "कॉल सेंटर" अधिकारी वर्गाशी साठ-गाठ होती.  "कॉल सेंटर" नवीन "प्रोसेस" मीळवताना एक बजेट तयार करतात.  त्या प्रोसेसला पूर्ण वेळ काम करणारे आवश्यक असतील त्याच्या पाच पट जास्त उमेदवार बोलवतात, त्यातले १/३ तीन महिन्याच्या प्रशिक्षणाकरता निवडले जातात. त्या निवड प्रक्रियेचा सगळा खर्च "प्रोसेस" मागणीदार देतो. प्रत्येक निवड झालेल्या व्यक्तीच्या मोबदल्यात एक रक्कम मानव संसाधन पुरवणाऱ्या संस्थेतला दिली जाते.  तीन महिन्याच्या प्रशिक्षणातून काही कारणे दाखवून गळती सुरु होते, परत निवड प्रक्रिया सुरु होते.  ह्या सगळ्या प्रक्रियेत गोंधळ होण्याच्या घटना पण आहेत कारण तेच तेच उमेदवार निरनीराळ्या निवड प्रक्रियेत भाग घेतांना आढळतात.

पुढील भागात चार "कॉल सेंटरचे " अनुभव .............