नशीब भाग - ७२

२००५ पासून मी इराणी विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचे तसेच मराठी हिंदीचे संवाद सराव वर्ग सुरू केले होते. दिवसभरात त्यांना जमेल त्या वेळेत ते येत होते. वर्ग वैयक्तिक होते त्यामुळे पूर्ण दिवस मी घरात होतो. इराणी विद्यार्थ्यी १० ते ४५ वयोगटातले होते. १० ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेत शिकवल्या जाणार्‍या विषयांचे फारसीत रुपांतर करून त्यांना इंग्रजी शब्दांचे अर्थ समजून घेण्यात मदत करत होतो. प्रत्येकाजवळ डिक्शनरी प्रकार होता पण त्याचा उपयोग करून वाक्याचा अर्थ फारसी भाषेत फार वेगळा तयार होत असे. त्यात १८ ते ४५ ह्या गटातील विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी व इंग्रजीतील संवाद कसे असावे व त्याचा अर्थ फारसी भाषेत काय असतो ह्याचाच अभ्यास जास्त होता. रिक्षावाला, भाजीवाला, दुकानदार, शिक्षक व इतर भाषिक तरुण तरुणींचे ते संवाद होते.

इराणी व भारतीय शाळा कॉलेजातील भाषा शिकवण्याच्या पद्धतीमुळे हा विचित्र प्रकार घडत होता व घडतो आहे. असे मी सहज समजू शकलो. कारण मी स्वत: इराण मध्ये तीन महिन्यात त्यांच्याशी संवाद करू शकलो होतो. चुका होत असत पण वाक्यातील भावना व उद्देश समजून मग वाक्य रचनांचा व शब्दांचा अर्थ मी नीट समजू शकलो होतो, त्यातील उपहास, राग, आनंद, दु:ख, हे समजू शकलो. माझी भाषा शिकवण्याची हीच पध्दत मी माझ्या ह्या भाषा वर्गातून वापरत होतो. ह्या १८ ते ४५ वयोगटात काही पोस्ट ग्रॅज्युएशन तर काही निवडलेल्या विषयातील डॉक्टरेट मिळवण्याच्या तयारी करता आले होते.

इराणी व्यक्तीला लहान पणा पासून खोट्या आदराची भाषा व वागणूक शिकवली जाते. पालक लहान मुला-मुलींना "चॅष्म" म्हणायला शिकवतात. चॅष्म चा अर्थ डोळा/डोळे असा आहे. पण हा शब्द प्रत्येक आज्ञा डोळे बंद करून मान्य असण्याची कबुली देण्या करता वापरण्याची पध्दत आहे. म्हणूनच लखनवी भाषेतून तसाच आदरयुक्त प्रकार वापरात आहे, "आपकी बात सर आखो पर" म्हणायची पध्दत आहे. हे चॅष्म म्हणणे खोटे वाटण्याचे व असण्याचे कारण किती लहान / मोठी मुले मुली तुमच्या आज्ञा डोळे बंद करून मान्य करतात, तुम्हाला तरी हे मान्य आहे का? हा शब्द समोरच्याला फक्त दिलासा देण्या करता असतो. बर्‍याच प्रसंगात उपहासाने वापरला जातो.

बाले कुर्बान = जी हुजुर = जी मालीक हा त्याचा अर्थ, पण बर्‍याच प्रसंगात उपहास असतो किंवा लाच देण्याकरता वापरला जातो. तसाच प्रकार "दास्ते शोमा दर्द ना कोने" सरळ अर्थ मदत केल्यास "तुमचे हात दुखू नये असे मना पासून वाटते." आभार मानण्याचा एक प्रकार, पण ह्यातला उपहास, अविश्वास दाखवणे जास्त असते. हे अर्थ मला समजायला लागल्यापासून मी "शिकम ए शोमा दर्द ना कोने = तुमचे पोट दुख नये" असे चांगले जेवण झाल्यावर किंवा माझ्या यशाने तुमच्या पोटात दुखू नये, असे मी विनोदाने म्हणतो. "फिक्र शोमा दर्द ना कोने = तुमच्या डोक्याला त्रास करून घेऊ नका" वगैरे विनोद म्हणून वापरतो. "ना दिदे, ताजे बे दोरान उमादे = न बघितलेला / बघितलेली, आत्ताच नव्याने कळायला लागले आहे, ही त्या मागची भावना असते." पण "ना दिदे" एवढाच  शब्द वापरला जातो. हा शब्द, प्रथमच शहरी वातावरणात आलेले, प्रथमच दुचाकी / चार चाकी घेणारे, फ्लॅट घेणारे, लायकी नसताना पदवी मिळवलेले, प्रथम परदेश भेट / परदेशात वास्तव्याला आलेले वगैरे. अहो ही यादी खूप मोठी होऊ शकते.

एका इराणी तरुणाने सीमाच गाठली. चक्क मुलीला कसे पटवू, घरकामाला येणार्‍या बाईला मुलीला . . . .वगैरे विचारणे सुरू केले. मी पण तितक्याच साध्या शब्दात त्याला समज दिली. इराण मध्ये तू जसे इशारो इशारे मे मिळवले असशील तसेच परदेशात कुठेही गेलास तरी जमेल. पण हा पठ्ठ्या, कोणते शब्द वापरणे योग्य वगैरे विचारत होता. शेवटी काही दिवसांनी त्यानेच कबुली दिली, सगळेच फार सोपे झाले होते. एवढेच नाही तर तो नव्याने येणार्‍या तरुणांना मार्गदर्शन करू लागला होता. पुण्यात ह्या तरुणांना मदत करणार्‍या बर्‍याच तरुणी तुम्हाला दिसतील. पैसा फेको तमाशा देखो ! ! !  अहो इराणी तरुणी, बायका ह्या प्रकारात मागे नाहीत.

चाळिशीच्या एका बाईने तिचा नवरा व १५ वर्षाची मुलगी ह्यांच्या मदतीने जेवणाचे डबे पुरवण्याचा व्यवसाय व इतर???? सुरू केला आहे. तिचा, नवर्‍याचा व मुलीचा विद्यार्थी परवाना असूनही हे कुटुंब महिन्याला तिन लाख रुपये कमाई करते आहे. ३० हजाराच्या भाड्याच्या जागेत आहेत. शेजार्‍यांनी ह्या बाबत तक्रार केल्यावर पोलिसांनी त्यांच्या वर हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे सांगून दोन लाखाने खिसा गरम करून घेतला आहे.

दुसरी एक चाळिशीची तेहरानला घर असलेली बाई तिचा एक मुलगा एक मुलगी बरोबर घेऊन पुण्यात राहिला आली. हे इराणी तरुण मुला-मुलींनी सक्तीच्या लष्करात भरती होऊ नये म्हणून भारतात येतात. हा सगळा फार मोठा पैशाचा व्यवहार दोन्ही देशात सुरू आहे. भारतात येऊन राहण्याचे परवाने मिळवून देण्यात दोन्ही देशातील सरकारी अधिकारी व शिक्षण संस्था गुंतलेले आहेत. तर ही बाई माझ्याकडे इंग्रजी, मराठी, हिंदी संवाद शिकायला आली व मुलांना शाळेतील विषय समजून द्यायचे होते. बाई परफॉर्मिंग आर्ट्स विषयात डॉक्टरेट घेणार होती. चुकून माझ्या बरोबर धर्म, संस्कृती वाद सुरू झाला तिचे अर्धवट ज्ञान उघडे पडले. बाहेर इतर इराण्यान बरोबर तिची भारतातील परिस्थीती बाबतीत चुकीची माहिती पसरवणे सुरू होते. हे मला व माझ्या बायकोला समजायला फारसा वेळ लागला नाही. सहा महिने प्रयत्न करूनही तिला कोणी गाईड मिळाला नाही. कारण पुण्यात फारसी व ह्या इराण्यांचे इंग्रजी समजणारे गाईड सापडणे अशक्यच आहे.

काही इराणी विद्यार्थी परवाना असलेले पुण्यात शाळा कॉलेजात प्रवेश व राहती जागा मिळवून देण्याचे व फसवण्याचे फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय व कार्यालय उघडून बसले आहेत. हा व्यवहार डॉलर वापरून त्यांच्या देशातून घडतो. मग भारतात आल्यावर हवाला माध्यमातून पैशाची देवाण घेवाण होते.



त्याच काळात मोठ्या मुलाने माझ्याशी भांडून एक २८ वर्षाची जुन्या मॉडेलची यामाहा RZ 250 CC ची  दुचाकी घेतली त्यावर बरेच अपघात घडले. शेवटी एका रिक्शाने धडक दिल्यावर मुलाने त्या दुचाकीची ही अवस्था केली. दुरुस्तीत भरपूर पैसा खर्च केला, आजही त्या दुचाकीवर पैसा खर्च होत आहे, अजूनही काम पूर्ण झालेले नाही.

0 प्रतिसाद: