लग्न हा नशिबाचाच एक भाग आहे असे माझे ठाम मत होण्याचे कारण १८ नोव्हेंबर २०१० ला सुखसमाधानाने पार पडलेले माझ्या मोठ्या मुलाचे लग्न, नशीब आम्हा सगळ्यांचेच, शतश: प्रणाम त्या विघ्नहर्त्याला. वर्ष २००८ मुलाने आम्हा दोघांना (आईबाबा) मुलगी पाहण्याला सुरुवात करा म्हणून एकदाचा होकार दिला. आम्ही मुलाच्या पत्रिकेसोबत आवश्यक असणारी माहिती असलेले पत्रक तयार केले. नवीन कोणत्याही वस्तूची योग्यता व निवड करताना त्या वस्तूच्या स्पेसिफिकेशनचा अभ्यास करण्याची सवय आम्हाला आहे म्हणून जन्म-लग्न पत्रिकेच्या गणिताचे महत्त्व मला व मुलाचा चांगलेच पटलेले आहे. हे महत्त्व पटण्याचे अजून एक कारण म्हणजे माझ्या पत्रिकेतील ग्रहांच्या गणिताची उत्तरे सिध्द करणारे प्रसंग, जे मी नशीब भाग एक पासून लिहितो आहे. पण आम्ही पत्रिकेच्या गणिताचा फायदा लूटणार्या बाजारापासून जाणीवपूर्वक दूर आहोत.
विवाह संस्थांनी मांडलेल्या बाजारात मी मुलाचे नाव नोंदवण्याची पहिली पायरी म्हणून महाजालावरील एका प्रसिध्द विवाह संस्थेच्या प्रश्नावलीची उत्तरे देऊन मुलाचे नाव मोफत नोंदवले. प्रत्यक्षात हा मोफत नोंदणी प्रकार म्हणजे दुकानाच्या बाहेर उभे राहून काचेच्या पलीकडे ठेवलेल्या मालाचे निरीक्षण करणे असाच आहे. काचेतून दिसणार्या मालाची योग्यता, सत्यता समजण्या करता मात्र मर्यादित मुदती करता मर्यादित मालाची ठरलेली रोख रक्कम द्यावी लागते. हा प्रकार नाटक सिनेमाचे तिकीट खरेदीकरण्या सारखाच आहे. अनुभव असावा म्हणून मी एक प्रायोगिक नाटकाचे तिकिट विकत घेतले. आता प्रायोगिक म्हटले म्हणजे जो मिळेल तो अनुभव समजून गुपचुप बसा नाही तर थकेस्तोवर बोंबला. माझे तसेच काहीसे झाले. मी ९ स्थळांचे ९०० रुपये देण्याचे कबूल करताच रोख रक्कम घेण्याकरता एक तरुण घरी आला. दिलेल्या रकमेची रीतसर पावती देऊन गेला. मी निवडलेल्या स्थळांचे यादी क्रमांक संस्थेच्या एका अनुभवी (?) कार्यकर्तीला कळवले.
१० दिवसात ईमेल व टेलिफोन पाठवण्याचे आश्वासन तिने मला दिले होते म्हणून मी त्या संस्थेच्या कार्यालयात १२ व्या दिवशी फोन केला. फोन उचलणार्या तरुणीने ९०० रुपये घेऊन माहिती आम्ही देत नाही आसे सांगून फोन बंद केला. मी पुन्हा फोन केला. एका पुरुषाने फोन घेतला, त्या अनुभवी (?) कार्यकर्तीचे नाव सांगून मी ती रीतसर पावती वाचून दाखवली. पण ती अनुभवी (?) कार्यकर्ती चार दिवस सुट्टीवर असल्याने तो माझी मदत करू शकला नाही. पाच दिवसाने अनुभवी (?) कार्यकर्तीचा फोन आला तिने ईमेल पत्ते व फोन क्रमांक मला ईमेलने कळवले आहेत असे सांगितले. ९ ईमेल पैकी ६ ईमेलचे पत्ते व फोन क्रमांक चुकीचे होते. तीन फोन क्रमांकांचे त्या स्थळांचे पालक मी त्यांना का फोन केला म्हणून भडकले होते कारण त्या मुलींची लग्न झालेली होती. अनुभवी (?) कार्यकर्तीला हे कळवल्यावर दोष तिचा नसून स्थळांचा होता त्यांनीच वेळेवर लग्न झाल्याचे कळवले नव्हते असे सांगण्यात आले. शेवटी प्रायोगिक नाटकाची मुदत संपल्याने मी हरलो हे मान्य केले.
पण संस्थेच्या मुख्य कार्यालयाला झालेला प्रकार कळवला. त्या अधिकार्याने मला एक ग्रिर्हाइक बनवण्याचा प्रयत्न केला. १५,००० रुपये दिल्यास तीन महिन्यात मुलाचे लग्न जुळवून देण्यास मदत करण्याचे (?) आश्वासन पण दिले. पण लग्न हमखास होईल असे ठोस आश्वासन मला हवे असे म्हणताच शस्त्रक्रिया करण्या अगोदर जश्या अटी मान्य कराव्या लागतात तशाच अटी मला मान्य कराव्या लागतील व प्रत्यक्षात लग्न होणार की नाही हे त्या मुलाचे नशीब असे व्यावसायिक उत्तर मला मिळाले. मी सावध झालो त्या संस्थेचा मी ग्रिर्हाइक होणार नाही असे ठोस उत्तर त्या अधिकार्याला देऊन मोकळा झालो.
मुलाचे लग्न कर्तव्य करणे हे माझे कर्तव्य होते म्हणून मी पुन्हा एका विवाह संस्थेला भेट दिली. ७०० रुपये दिल्यास दर महिन्याला नोंद होणार्या मुलींची यादी घरच्या पत्त्यावर मिळणार, त्यातून निवड करून संस्थेत येऊन पूर्ण माहिती मिळू शकण्याची व्यवस्था होती. मी मुलाचे नाव नोंदवले त्याच्या पुढल्या महिन्यात स्थळांची यादी मिळाली. मला स्थळ शोधावे लागले नाही. पाच दिवसात १० स्थळांचे फोन झाले. थोड्या फार फरकाने प्रश्नोत्तरे एकाच पद्धतीची होती. प्रश्नांचा क्रम मात्र बदलत होता. १० स्थळांचे पालक फक्त बोलत होते. एकाही मुलीचा आवाज मी ऐकलाच नाही. प्रश्नांचे नमुने - मुलगा नोकरीला कुठे आहे, घरात किती माणसे आहेत, कोणत्या शाळेत होता, डिग्री कोठून किती साली घेतली, मुलाचा जन्म इराण मध्ये झाला ते कसे, आई हिंदू नाही म्हणजे तुम्ही मांसाहारी आहात का, तुमचे घर आहे की भाड्याच्या घरात राहता, तुमची चारचाकी आहे का, मुलगा शिकलेला नाही तर त्याला एवढा ५०,००० पगार कसा, मुलगा परदेशात जाणार आहे का - असे काहीसे प्रश्न होते.
मी पहिल्या दोन स्थळांच्या प्रश्नांची उत्तरे शांतपणे देण्याचा प्रयत्न केला पण प्रश्नांची खोच व पुणेरी शहाणपणा लक्षात आल्यावर मी उत्तरे देण्याची पध्दत बदलली. जोश्यांच्या क्लासचा विद्यार्थी (व.पू.काळे लिखित) होतो अशा थाटात प्रश्न विचारणे सुरू केले. साध्या सरळ प्रश्नांची उत्तरे तितकीच सरळ होती. पण शिक्षणाचा प्रश्न आला की - पालक विचारत होते म्हणून मी पण विचारत होतो - तुम्हाला शिकवलेला असणे व शिकलेला असणे ह्यातला फरक समजतो का, तुम्ही तुमचे लग्न ठरले तेव्हा किती शिकवलेले होता, तुमची मुलगी किती शिकवलेली आहे, माझा मुलगा शिकलेला आहे (अभ्यासक्रमातून शिकवलेल्या विषयांच्या प्रश्नांची उत्तरे दिली की प्रमाणपत्र मिळतात. पण शिकलेला/ली मीठ्भाकरी कशी मिळवावी, हितसंबंध कसे पाळावेत / टिकवावेत, कठिण प्रसंगांचे आकलन करणे व समाधान शोधणे हे शिकलेला/ली असण्याचे लक्षण. शिकवलेल्यांची संख्या शिकलेल्यांपेक्षा जास्त आहे.) मांसाहाराचा प्रश्न आला की - तुम्हाला हसतहसत दिलेली खोटी समाधानकारक उत्तरे अपेक्षीत आहेत का असा माझा प्रश्न होता. पगार, गाडी, घर हे प्रश्न आले की - असे मुलाचे स्थळ आमच्या शेजारच्या दुकानात काल होते आज शिल्लक आहे का विचारून सांगतो - असेच माझे उत्तर होते.
असो, पुढल्या महिन्यात पाच स्थळांचे फोन आले. शेवटी पाच महिन्यानंतर फोन येणे बंद झाले. माझ्या मुलाचे स्थळ आता शिळे झाले होते. मग मी स्थळांचे फोन शोधून काढले, फोन केले. एका मुलीला चिपळूण सोडून दूर जायचे नव्हते. दुसरीला नागपूर शहर सोडायचे नव्हते. तिसरीने चांगलाच धक्का दिला होता. आईच्या शेजारी उभी असताना मला ऐकू येत असेल ह्याची परवा न करत चक्क मुलगी घरात आल्यावर फोन करेल असे सांग म्हणताना मी ऐकले होते. ज्याच्या गळ्यात हि बया पडेल त्याला देवाने तारावे ही माझी मनापासून प्रार्थना. शेवटी ह्या विवाह संस्थेतील मुलाच्या स्थळाची एक वर्षाची मुदत संपली.

मी व मुलगा श्री व्याघ्रेश्वराच्या (असूद, दापोली) अभिषेकाला गेलो असताना श्री जितेंद्र रानड्यांच्या शुभमंगल विवाह संस्थेची मला आठवण झाली. तिथे १००० रुपये मी भरले. त्यांच्या मासिकात मुलाची माहिती प्रसिध्द झाली. मजकूर वाचून एका मुलीच्या आईने मला फोन केला. फार सरळ प्रश्नोत्तर प्रकार झाला. संध्याकाळी मुलगी ईमेल पाठवेल असे कळले. ईमेल देवाण घेवाण झाली. तीन दिवसात माझ्या घरी ती मंडळी आली. महिन्यात सगळे धागे दोरे विणले गेले. लग्नाची बोलणी प्रकारात - सही कुठे करायची ते सांगा आणि मुलगी आमच्या घरी पाठवा. इतका साधा लग्न प्रकार मला, माझ्या मुलाला व माझ्या बायकोला अपेक्षित होता. पण १४ ते २० नोव्हेंबर असा लांब पल्ल्याचा (आधुनिक मॅनेजमेंट भाषेतील हॉरिझॉन्टल पसरलेला प्रोजेक्ट) अनपेक्षित सोहळा अतिशय आनंदी वातावरणात साजरा झाला त्याचा हा पुरावा. फोटो धाकट्या मुलाने व बायकोने निकॉन पी ९० ह्या कॅमेऱ्याने काढले आहेत.