September 23, 2010

नशीब भाग - ६५

ह्याला नशीब म्हणा किंवा योगायोग म्हणा ते वर्ष १९९३ होते. एके दिवशी मोठ्या मुलाने त्याला गाणे शिकायचे आहे असे सांगितले. बरेच प्रश्न विचारल्या नंतर कळले की त्याच्या शाळेत श्री रमेश अभ्यंकर नावाचे गाण्याचे शिक्षक मुंबईहून आले आहेत व त्यांनी  माझ्या मुलाने गाणे शिकावे असा आग्रह केला होता. मी त्यांची भेट घेतली. आमचे गाणे शिकणे सुरु झाले त्याचे चित्रण मी केले होते ते मला आज सापडले. पाच ते सहा रागांचे सहा तासाचे चित्राण होते त्याचे नीट संपादन करून मी संकलन केलेले आहे.

श्री रमेश अभ्यंकर फार थोडा काळ मस्कतला होते. त्यांचा मुबईतील पत्ता, दूरध्वनी मला माहीत नाही. पण त्यांच्या बोलण्यातून मला कळले होते की ते विक्रोळी भागातील गोदरेज वसाहतीत राहात होते. तुम्हा वाचकांना कोणाला त्यांची माहिती असल्यास मला जरूर कळवा v.k9121@gmail.com मला व माझ्या मुलाला त्यांना हे संकलीत चित्रण गुरुदक्षीणा म्हणून द्यायचे आहे. कृपया मदत करा!                 

श्री अभ्यंकर त्यांच्या मोठ्या मुलाला त्याच्या गाण्याच्या परीक्षे करता कशी मदत करता येईल ह्याचा शोध घेत होते तेव्हां त्यांना मी हा चित्रणाचा प्रकार करून दाखवला होता. श्री अभ्यंकर गाण्याचे नोटेशन फार चांगल्या प्रकारे करुन देत होते. आमच्या एका मित्राला त्यांनी एक अवघड नाट्य गीत नोटेशन मार्फत दोन दिवसात शिकवले होते. ते नाट्यगीत गाउन त्या मित्राने मस्कत गणेश उत्सवात श्रोत्यांची दाद मिळवली होती. ज्या शाळेत श्री अभ्यंकर शिकवत होते त्या शाळेच्या मुख्यधापकांनी राष्ट्र्गीताची चाल पाश्चीमात्य संगीतात बदला म्हणून दबाव आणला होता त्याला नकार दिल्याने त्यांना शाळा सोडायला सांगितले होते असे आम्हाला ते सोडून गेल्यावर समजले होते. अर्थातच लेखी काहीतरी दुसरेच कारण लिहिले असणार हे निश्चीत. प्रथम राग हमीरचे चित्रण मी केले ते ४ भागात इथे देत आहे.