काही क्षण असेही अनुभवले, जे अपेक्षा नसतांना मिळाले ती हि कार्यशाळा ८५ डोक्यांनी एकत्र येउन ८ दिवसात अनुभवली. विवेकानंद केंद्र इन्स्टीट्युट अॉफ कल्चर (VKIC) गौहाती ने आर्य विद्यापिठ माहाविद्यालयात (AVC) नव्याने योग केंद्र सुरु करण्या अगोदर मला कार्यशाळेचे संचालन करण्याची संधी दिली. त्याचेच हे काही पुरावे.
मुळातच फोटोग्राफी हा विषय ८ दिवसात कोंबण्या सारखा नसून तासंतास अनुभवण्याचा आहे. कारण सूर्यप्रकाशातील रंगछटांचा सतत बदल होत असतो तो बदल समजणे आवश्यक आहे. तेच सूर्य मावळल्या नंतर वापरात असलेले दिवे रंगछटांचे कोणते बदल दाखवतात तेही समजणे गरजेचे आहे. पण इंस्टंट कॉफीच्या वातावरणात सगळे क्षणात करण्याची धावपळ......
रोज दोन तास असे एकुण १६ तास मला मिळाले होते. ६ तास कॅमेराच्या प्रत्येक भागाची महीती संवादातुन दिल्याने प्रत्येकाचा सहभाग लाभला. माझ्या संवादात हिन्दी - इंग्रजी दोन भाषा वापरल्या होत्या, उद्देश मुद्दा नीट समजावा हाच होता.
जसे मी वीचारले होते प्रत्येकाचा ह्या कार्यशाळेत नाव नोंदवण्यात काय उद्देश असावा ? ४ प्रकारची वेगळी उत्तरे मीळाली, बाकी सगळे “माझा पण तो/ती म्हणतो/ते तोच उद्देश आहे”. सगळा प्रकार कॉपी/पेस्ट, माहाविद्यालयात आले आहेत स्वतःचा वीचार/कल्पना नाही. इमेज सेंसर ची संवेदना (सेंसीटीव्हीटी) समजवतांना गमतीशीर संवाद झाला होता, एखाद्याला टोचून बोललेलं खपत नाही पण दुसरा लक्षच देत नाही त्या दोघांची संवेदना (सेंसीटीव्हीटी)काय असणार तसाचा हा प्रकार आहे. संवेदनक्षमता ISO अंकाने मोजण्यात येते, १०० ते ६४०० अंक, १०० अंकाला जास्त प्रकाशाची आवश्यकता असते तर ६४०० अंकाला मेणबत्तीच्या मंद प्रकाशात देखील फोटो घेणे शक्य होते.
एका मुलीने वीचारले तुम्ही वाइल्ड लाइफ फोटो काढण्या करता काय करता, मी “ मी डोळे उघडे ठेवतो माणसातलेच वाइल्ड लाइफ मला दिसते जंगलात जावे लागले नाही." ही आधुनिक विषय विभागणी मी करत नाही, तुम्हाला काय वाटते, तुमच काय मत आहे? ” असे संवाद सुरू होते. फोटोग्राफी हे माध्यम एखाद्या प्रसंगाला स्थीर चीत्रात साठवते, अनुभवाने तयार फोटोग्राफर प्रसंगाचे महत्व समजुन एका चौकटीत बंदिस्त करतो. कॅमेरातुन बघतांना प्रतीमेची चौकट बनवण्याचे प्रकार कसे असावे? वगौरे वीषय हातळत असतांना, व्यावसायीक फोटोग्राफर(प्रोफेशनल)म्हणजे ज्या कामाचा पैसा मीळतो त्यालाच चांगले म्हणायचे हे बरोबर नाही अशी चर्चा झाली. जो फोटोग्राफर वीचार पुर्वक, फोटोग्राफी नियमांचे पालन करतो, कोणाच्या भावना दुखावत नाही त्यालाच मी समज असलेला (सिरीअस) फोटोग्राफर समजतो. पैसा आहे म्हणुन, मीत्राने घेतला म्हणुन कॅमरा वापरणारे हौशी (हॉबी) फोटोग्राफर असतात. फोटोग्राफीतील कॉमर्स आणि इकॉनॉमीक्सचा तोल कसा सांभाळणार, त्याचे महत्व ह्याची चर्चा झाली.
फोटो घेतांना चुका कशा टाळायच्या त्याचे ४ तासांचे प्रात्यक्षीक झाले. कार्यशाळेच्या शेवटी ६ तास काही नीवडक फोटोंची चर्चा झाली.
हा फोटो बघुन मी माझेच कौतुक करून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. नशीब माझे.
८ फेब्रुअरी २०१६ ला प्रथमच आर्य विद्यापिठ माहाविद्यालयात (AVC) फोटोग्राफी क्लबचे उत्घाटन माझ्या हस्ते झाले. पुढील भागात VKV गोलाघाटचा आगळा वेगळा अनुभव ……..














