April 6, 2015

मानवी जंगल ३

भाग २ चे मालक, नेते आणि सल्लागार कसे घडतात ते वाचलेच असेल. ह्या भागात नियंत्रक, कार्यकर्ते आणि पोटभरु असे दिसले, अनुभवले. शब्दांच्या छोट्या स्वरुपाचे पेव फुटल्याने मी मुद्दाम तसे स्वरुप देत आहे. 

"मा रा मा स" चा अर्थ - भक्षक मालक, राजकारणी व मार्गदर्शक अथवा सल्लागार ही तिकडी.
'नि का पो' चा अर्थ - नियंत्रक, कार्यकरते व पोटभरू.

'मारामास' ही तिकडी कोणते ही काम करण्यास नियंत्रक मदतनीसाची मदत घेते. शक्य असेल तसे मदतनीसाला जवळ करते नाहितर दूर ढकलते. मदतनीस जमात तयार करण्याकरता ह्या तिकडीने प्रथम शिक्षण संस्थांचे हक्क हातात घेतले. ह्या संस्था अशाच व्यक्तीला चालवायला दिल्या जातात कि जी व्यक्ती ह्या तिकडीची गुलामी इमाने इतबारे स्विकारू शकते, न स्विकारल्यास समाजात त्या व्यक्तीची बदनामी केली जाते. मग शिक्षण संस्थांचे पाठ्यक्रम वेळोवेळी असेच तयार केले जातात जेणे करून शिकवलेले मनूष्यबळ ह्या तिकडीच्या मदतीला न कळत धाव घेते. शिक्षण संस्थांचे पाठ्यक्रम परदेशातून ठरवलेले असतात असे मान्य करण्यास फार थोडे विचारवंत मान्य करतील ह्याची मला खात्री आहे. पण हे खरे आहे, माझा विश्वास आहे, तुम्हाला पटायला वेळ लागेल.

'मा रा मा स'- तिकडीच्या संघटीत शैक्षणीक पाठ्यक्रमात आरोग्य, शारिरीक - मानसिक - गावाची / शहराची स्वच्छता ह्या विषयांना फारसे महत्व नसते. कारण ह्या विभागांचे सगळे कंत्राट घेण्यात ह्या 'मा रा मा स' तिकडीचेच कंत्राटदार नीवडलेले असतात. मिळालेल्या माहिती नुसार इंग्रजी राजवटीत मदतनिसांचे आरक्षीत व खूले असे सोयीस्कर दोन गट तयार केलेले होते. तथाकथीत स्वातंत्र्यानंतर तेच गट 'मा रा मा स' तिकडीने सोयी नुसार वाढवले. 'तिकडी'ने परिक्षा पध्दतीला व प्रमाणपत्राला अवास्तव महत्व दिलेले असल्याने परिक्षेत सोयिस्कर गुण मिळवण्याचे / मिळवून देण्याचे मार्ग व व्यावसाय फोफावले आहेत. 

नियंत्रक जमातीत सिइअो, डायरेक्टर, मॅनेजर अशी पदे नीर्माण करून मालक मंडळी असे पदाधिकारी पुढे ढकलून कामगारांना दूर ठेवतात. नेते मंडळी असे पदाधिकारी दाखवून जनतेला दूर ठेवतात तर सल्लागार मंडळी असे पदाधिकारी वापरून तक्रार करणारे घोळात अडकवण्याचे नकाशे तयार करतात. शेवटी ह्मांच्या कर्माची फळ ह्यांनी जन्माला घातलेल्यांना भोगावी लागतात. माणूसकीने  वागणारे नियंत्रक मात्र त्रास सहन करीत जबाबदारी सांभाळत सेवा नीवृत्त होतात.





कार्यकर्त्यांचे दोन प्रकार रोज अनुभवतो आहे. एका प्रकारात जाबाबदारीने मन लावून काम करणारे आहेत तर दुसरा प्रकार हाणामारी तोडफोड प्रकारात शक्ती प्रर्दशनात पैसा व नाव कमवतांना दिसतात, ह्यांचीच संख्या वाढते आहे. नीरनीराळ्या व्यावसायातून असले कार्यकरते वावरतांना दिसतात, त्यांचे शक्ती प्रदर्शन देवळा पासून ते थेट जेल पर्यंत आनंदात चालू असते.




पोटभरू जमातीची भूक फक्त अन्नाची नसते, पैसा, अधिकार, जमीन, बंगला, वगैरे माहान आर्दशांची असते. हि भूक भागवण्या करता ही जमात सगळे आयुष्य खर्च करते. ह्या जमातीला नाती महत्वाची नसतात, समाज, धर्म, देश हा वीचार मागासलेला असतो. पण काही पोटभरु वेगळेच जन्माला येतात, नाती जपणे, समाज, धर्म, देश स्वाभिमानाची भूक घेउन जन्माला येतात, बरेच नाहक भूकेले बळी जातात. 

आज मात्र,  हे कलियुग आहे असेच घडणार, ह्या युगात असेच असणार कादाचीत माणूसकी हा प्रकार एखादा विनोद गणला जाईल.......