नोकरी मिळणे, नाव मिळणे, पगार मिळणे किंवा बायको मिळणे, सुख मिळणे हे सगळे तुलनात्मक असते. मिळणाऱ्या सुखाचे संधर्भ / आधार काय असावेत ह्याचा विचार करणे हे व्यक्तीशी संबंधित असते. माझ्या मुलाला नोकरी मिळाली, नाव मिळाले पण केलेल्या कामाचा आवश्यक मोबदला कधीच मीळाला नाही.
एका कंपनीच्या सुटे भागांच्या शाखा जगभर पसरल्या होत्या. त्या प्रक्रियेचे काही हजार सर्व्हर संगणक कार्यरत होते, त्या पैकी काही संगणक नव्याने बदलेले होते. सायटेकचा तो तंत्रज्ञ एक सर्व्हर संगणक कार्यरत करण्या करता २० ते ३५ तास वेळ घेत होता. मुलाने ते काम ४ तासात केले होते. सायटेकने मुलाचे कौतूक केले पण त्या जागतीक कंपनी कडून २५ तासच्याच हिशेबाने पैसे वसूल केले. मुलाला त्याचा मोबदला मिळाच नाही. पण टेकसर्व्हला मोबदला मिळाला व मुलाच्या वरच्या अधिकाऱ्याला बढती मीळाली. मी व मुलाने डोक्यावर थपडा मारून आमच्या फुटक्या नशिबाचे कौतुक केले होते. मुलागा ह्या घटनेने सावध झाला होता. नव्याने काम करण्याची पध्दत शोधली, जेणे करून मनस्ताप घेण्या पेक्षा देता येणे सुलभ झाले.
टेकसर्व्हच्या अधिकाऱ्याने इतर तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याचा दबाव माझ्या मुलावर वाढवला. मुलाने घडलेल्या घटनांची माहिती एकत्र केली व कंपनीच्या मानव संसाधन विभागाला पाठवतांना पगारा व्यतिरीक्त मोबदल्याची मागणी केली तीच माहिती सायटेकला पण कळवली. सायटेकने मुलाला व टेकसर्व्ह कंपनीला करारातील माहिती गुप्ततेच्या अटीचा समज दिला. टेकसर्व्हच्या अधिकाऱ्याने सायटकला अंधारात ठेवून एक नवीन विभाग सुरु केला होता. मुलाच्या सायटेक माहिती तंत्राच्या अनुभवाच्या जोरावर नवीन विभागाचे काम मिळवण्याचा तो प्रयत्न सुरु झाला होता. माझ्या मुलाने हा घोळ उघडकीस आणल्याने नवीन विभागाचे काम थांबावे लागले.
टेकसर्व्हने मुलाला त्रास देण्या करता एक नवीन योजना आखली. असे लक्षात आले की हि योजना MBA झालेल्या एका सुपीक डोक्याची होती. भारतातील सिसटेक नावाच्या कंपनीला अनुभवी IT तंत्रज्ञाची आवश्यकता होती. टेकसर्व्हने सिसटेक बरोबर केलेल्या करारा प्रमाणे माझ्या मुलाला मुलाखतीला पाठवले. मुलाखत सिसटेकच्या मुख्य मानव संसाधन अधिकाऱ्या बरोबर होती. मुलाने अनुभवाची यादी दिली. त्या अधिकाऱ्याने धक्कादायक माहिती दिली.
"सिसटेकने गेली दोन वर्ष प्रयत्न केला पण इतका अनुभवी उमेदवार मिळालेला नव्हता. ह्या आधी अर्ज का भरला नाही?" मुलाने १० वेळ अर्ज केल्याचे सांगितले. अधिकाऱ्याने लगेच संगणकावर माहिती शोधली. सहा महिन्यापूर्वीचा अर्ज तिथे होता. मुलाने खुलासा केला, पदविधर नसल्याने मदतनीसाने बाजूला केला असावा. त्या अधिकाऱ्याने मुलाची माफी मागीतली. परदेशी कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन करून स्काईप माध्यमाची तांत्रीक मुलाखत निश्चीत केली. मुलाखत झाली, त्या परदेशी अधिकाऱ्याने मानव संसाधन अधिकाऱ्याला चांगला उमेदवार मिळाल्याने धन्यवाद दिले, निवड झाल्याचे कळवले.
मुलाने पगार काय असेल असे विचारताच ज्याची भिती होतीच तेच ऐकावे लागले. काम सिसटेकचे असेल पण पगार सायटेक देणार. म्हणजेच सायटेक देत होता त्याच पगारावर नवीन कामाचा भार सांभाळावा लागणार. एक आठवडा झाला तरी मुलाने सिसटेकला उत्तर दिले नव्हते. मधल्या काळात मुलाने सिसटेक त्या कामाचा पगार इतर उमेदवारांना किती देणार होता हे शोधून काढले. त्या कामाचे "पॅकेज" २० ते ३० लाख वर्षाचे होते. खरा प्रकार उघड झाला. सायटेक मुलाला १० लाखाचे "वर्षाचे पॅकेज" देत होता ह्या नवीन कामातून सायटेकला काही न करता २० लाखाचा फायदा होणार होता. मुलाने हा सगळा प्रकार सिसटेक व सायटेक च्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवला व असलेल्या कामात सुखी असल्याचे सायटेक अधिकाऱ्याला कळवले. मुलाने झालेला प्रकार त्याच्या सहकाऱ्यांना सांगितला. सायटेकचा अधिकारी वर्ग संतापला होता, त्यांचा त्रास देण्याचा प्रकार सार्वजनीक झाला होता.
सिसटेक वर परदेशी कंपनीचा दबाव वाढला होता, निवड केलेला उमेदवार कधी कामाला सुरुवात करणार? लवकर निर्णय मागितला. सिसटेकने मुलाला घरी फोन केला. सायटेक देत होते त्याच्या दुप्पट पगार देणार असल्याचे कबुल केले. खास बनवलेल्या दुव्यावर इमेलने नवीन अर्ज एका तासात करायला सांगितले. मुलाने वेळेवर लगेच नविन अर्ज दिलेल्या दुव्यावर पाठवला. दोन तासाने त्याची नीवड झाल्याचे इमेलने कळवण्यात आले. सिसटेकने दिलेला तो दूवा गायब झाला होता.
सायटेकच्या काम सोडण्याच्या नियमाप्रमाणे दोन महिन्याचा काळ अवश्यक होता, तरच पाच वर्ष कामाचे सगळे फायदे मिळणार होते, मान्य नसल्यास मिळणारे सगळे फायदे नाकारले जातील, नोकरीचे प्रमाण पत्र मिळणार नाही उलट न सांगता नोकरीतून पळाला असे घोषीत केले जाईल असे सायटेकच्या मानव संसाधन विभागातून समजले.
वाचक हो सावधान! भारतात कामगार विषयक कायदे, कंपनी कायदे फक्त धंदेवाल्यांच्या सोयी करताच बनवलेले असावेत असे सिध्द होते. सामान्य माणसाला कंपनी विरुध्द कोर्ट कचेरी करणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. नवीन नोकरी शोधताना, सही करताना सावध व्हा, कागदावर लिहिलेल्या काळ्या अक्षरांचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा ....... शेवटी जे मिळाले ते नशीबाने मिळाले ???? ............


