मी माझ्या ह्या लिखाणाला नशीब हा शब्द वापरण्याचे कारण नशीब हे दैव किंवा डेस्टीनी ह्या अर्थाने वापरतो किंवा ह्या माझ्या जगण्याचा आलेख ज्यात मला आलेले / येणारे अनुभव ह्या प्रसंगांची माहिती नशीब ह्या एका शब्दाच्या शीर्षकात बसवतो. मी राहतो त्या भागात २०/१/२०११ रोजी ३४ तास वीज प्रवाह बंद झाला होता त्यामुळे टेलिफोन, पाणी व उंच इमारतीत असणार्या लिफ्ट व्यवस्था बंद झाल्या होत्या. तो प्रसंग मी नशीब ह्या शीर्षकात का बसवला हे समजवून देण्याचा हा एक प्रयत्न आहे.
वीज प्रवाहाचा वापर व वितरणाचे काही नियम व पध्दत कोणाच्या जीवाला / उपकरणांना धोका होऊ नये तसेच बिघाड झाल्यास त्याचा परिणाम वितरण व्यवस्था बाधीत होऊ नये म्हणून तयार केलेली आहे. परंतु गोंधळ माजवून आपला स्वार्थ साधणे हे एकच लक्ष असणार्या व्यक्ती स्वार्थ साधण्यात किती अनुभव संपंन्न असतात त्याचा हा एक नमुना. पुढील माहिती कदाचित थोडी कंटाळवाणी, विषयांतर वगैरे वाटण्याची शक्यता आहे पण ती समजून घेणे आवश्यक आहे. घरगुती व जीवनावश्यक विद्युत उपकरणांना वीज प्रवाह देताना स्विच, फ्यूज, एमसीबी, इएलसीबी ही साधने वापरण्याची एक सुरक्षित पध्दत आहे. अशी ही प्राथमिक पध्दत असावी हा नियम अशा प्रकारे आहे -
३ - विद्युत भारानुसार तयार केलेले गट मुख्य वीज प्रवाहाला जोडण्या करता एक जंक्शन पेटी - इएलसीबी - वीज प्रवाह.
एमसीबी - मेन सर्किट ब्रेकर - निर्धारित वीज प्रवाहापेक्षा जास्त प्रवाहाचा वापर झाल्यास एका विशिष्ट पट्टीने वीज प्रवाह खंडीत होतो, वर उभी असलेली ती पट्टी आडवी होते. बिघाड असल्यास दुरुस्ती नंतर पट्टीच्या साह्याने वीज प्रवाह पूर्ववत करता येतो.
इएलसीबी - अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर - वीज पुरवठा कंपनीतून चार तारांच्या मार्फत २२ हजार व्होल्ट दाबाचा वीज प्रवाह ट्रान्स्फॉरमरच्या साह्याने २४० व्होल्ट दाबाने घराघरातून पुरवला जातो. त्यातील तीन फेजतारा असतात व चौथी तार प्रवाह परतीची (न्युट्रल) असते. इमारतीतील ट्रान्स्फॉरमर व जमीन ह्यात वीज प्रवाह संचार नसण्याची काळजी घेतलेली असते. कोणत्याही कारणाने उपकरणा मार्फत न्युट्रल व जमीन ह्यात वीज प्रवाह संचार/गळती घडताच सुरक्षा म्हणून इएलसीबी ह्या साधनाने वीज पुरवठा बंद केला जातो. ही क्रिया अत्यंत तत्काळ घडते. गळती थांबताच प्रवाह पूर्ववत सुरू करता येतो. ह्या करता बाहेरुन तज्ञ मंडळी बोलवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असते. तुम्ही स्वत:च तज्ञ असाल तर अधिक मुलान पासुन सावध असावे.
हे सगळे समजले असेल असे समजून वितरण व्यवस्थेची माहिती समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. वर सांगितलेल्या पध्दतीचे एक घर म्हणजे वितरण व्यवस्थेतील एक उपकरण असे मानल्यास अशा घरांची एक इमारत असते. अशा इमारतीचा ट्रान्स्फॉरमर - स्वीच - फ्यूज - वीज पुरवठा हे चित्रात दिसते आहे, नेहमी असा प्रकार असावा हा नियम आहे. हा नियम प्रत्येक इमारती करता पाळला जातो असे नाटक वीज पुरवठा कंपनी व अधिकारी मोठ्या दिमाखाने हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे अशा थाटात सादर करतात. हे नाटक म्हणतो ह्याचे कारण प्रत्यक्षात अशा कामाचे पैसे घेऊन देखील ते केलेले नसते. २०/१/२०११ रोजी दुपारी दोन वाजल्या पासून पुढे ३४ तास वीज प्रवाह बंद ह्या नाटकाचे सादरीकरण मी राहतो त्या इमारतीतील व इतर चार इमारतीच्या संबंधित अधिकार्यांनी हाता वर हात ठेवून तोंडसुख घेत बघितले. प्रत्यक्षात हे दुरुस्तीचे काम तीन तासात आटोपणारे असते अशी कबुली दुरुस्ती कामगारांनीच दिली होती.
मी राहतो ह्या सोसायटीत सुमारे ५०० फ्लॅट्स आहेत. अशाच धरतीच्या शेजारच्या प्लॉट मध्ये असलेल्या तीन सोसायटीचा वीज पुरवठा ह्या एकाच वितरण पेटीतून दिलेला आहे. वितरण पेटीत तांब्याचे/अलुमिनियमचे बस बार असतात त्यावर फ्यूज अथवा स्विचच्या साह्याने प्रत्येक इमारतीचा तार संच जोडलेला असावा हा नियम आहे. पण नियमांना न वापरण्याचा निर्लज्जपणा वितरण कंपनीने केलेला होता व शक्य असेल तिथे असेच करण्याचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात आमच्या प्रत्येक सोसायटीच्या चार तारांच्या फेजचा एक संच एकाच ठिकाणी एकाच नटबोल्टवर बसवलेला आम्ही सगळ्यांनी बघितला. जोडलेल्या एकाही तारसंचावर कोणत्या एमारती करता आहे ह्याची नोंदपट्टी लावलेली नव्हती. कोणत्या इमारतीमुळे मुख्य पुरवठा तार संचातील कोणता तार संच जळला होता हे शोधण्या करता २० तास उलटून गेल्यावर २१ तारखेला ११ वाजता वीज वितरण कामगारांचा एक गट वितरण पेटीच्या आजूबाजूला जमला होता. एकाही कामगाराने अथवा अधिकार्याने गणवेश चढवला नव्हता. त्यांचे नाव/हुद्दा दर्शक पट्टी लावलेली नव्हती. बिघाड दर्शक साधन वापरण्या करता १० हजार रकमेचे हास्तांतर झाले व फक्त सांगण्यात आले की मुख्यतार संचातील एक तार जळली आहे एवढेच सांगून ती मंडळी गेली. कोणत्या तार संचामुळे हे घडले हे शोधण्याचे कर्तव्य????? कोणाला विचारणार?? नशीब आम्हा रहिवाशांचे अजून नाहीतर काय???????
मग जळलेल्या तार संच दुरुस्तीची २० हजाराची रक्कम हस्तांतरित झाली. दुपारचे तीन वाजले तरी अजून काहीच हालचाल दिसली नाही. काही वेळाने तार संच दुरुस्तीचा एक सहा कामगारांचा गट आला. विजेच्या खांबा पासून येणारा तार संच त्या वितरण पेटीतून वेगळा केला गेला. जळलेल्या भागा पासून थोडा भाग जास्त कापण्यात आला. त्या कापलेल्या भागात दोन तीन जागेत जाड रबरात मोठाले छेद झाले होते. इतर इमारतीतून गोळा झालेल्या अधिकार्यांची चर्चा सुरू झाली. हा प्रसंग का झाला असवा ह्याची कारणे शोध सुरू होता.
योगायोग बघा, ओमान केबलचा व्हिडिओ बनवताना आरमर्ड केबल कशी तयार होते, अपेक्षीत वीज रोधक (इन्श्युलेशन) दर्जाचे परीक्षण कसे होते ह्या सगळ्याचा अनुभव मी चित्रित केलेला होता. त्याचा अभ्यास मी केला होता. त्यामुळे कारणे शोध चर्चेत मी तोंड उघडताच सगळे गप्प झाले व माझे कौतुक झाले. केबल उत्पादन चालू असताना २२ हजार वीज दाबाच्या केबलचे परीक्षण ६० हजार वीज दाबाच्या फ्लॅश टेस्टने होते. स्पार्क आला तर तो मध्य भाग धरून १ मीटरचा भाग कापून टाकण्यात येतो. आता हा परीक्षणाचा प्रकार किती कंपन्या प्रत्यक्षात लक्षपूर्वक करतात हा विषय वादाचा आहे.
वीज प्रवाहाचा वापर व वितरणाचे काही नियम व पध्दत कोणाच्या जीवाला / उपकरणांना धोका होऊ नये तसेच बिघाड झाल्यास त्याचा परिणाम वितरण व्यवस्था बाधीत होऊ नये म्हणून तयार केलेली आहे. परंतु गोंधळ माजवून आपला स्वार्थ साधणे हे एकच लक्ष असणार्या व्यक्ती स्वार्थ साधण्यात किती अनुभव संपंन्न असतात त्याचा हा एक नमुना. पुढील माहिती कदाचित थोडी कंटाळवाणी, विषयांतर वगैरे वाटण्याची शक्यता आहे पण ती समजून घेणे आवश्यक आहे. घरगुती व जीवनावश्यक विद्युत उपकरणांना वीज प्रवाह देताना स्विच, फ्यूज, एमसीबी, इएलसीबी ही साधने वापरण्याची एक सुरक्षित पध्दत आहे. अशी ही प्राथमिक पध्दत असावी हा नियम अशा प्रकारे आहे -
१ - उपकरणाचा प्लग - सॉकेट - स्वीच - वीज प्रवाह.
२ - एका घरातील प्रत्येक खोलीतील उपकरणाच्या विद्युत भारानुसार गट विभागणी करणे. त्या प्रत्येक गटाला भारवाहक तारांची जोडणी करणे, त्या भार क्षमतेच्या तार संच व प्रत्येक गटाच्या विद्युत भारा प्रमाणे सॉकेट - स्वीच - एमसीबी - वीज प्रवाह असणे. (६ अॅम्पीयर - टीव्ही, दिवे, पंखे वगैरे एक गट. १३/१५ अॅम्पीयर - सर्व प्रकारचे आव्हन, ग्राइंडर, वीजेचे तवे, टोस्टर वगैरे दुसरा गट)
३ - विद्युत भारानुसार तयार केलेले गट मुख्य वीज प्रवाहाला जोडण्या करता एक जंक्शन पेटी - इएलसीबी - वीज प्रवाह.
एमसीबी - मेन सर्किट ब्रेकर - निर्धारित वीज प्रवाहापेक्षा जास्त प्रवाहाचा वापर झाल्यास एका विशिष्ट पट्टीने वीज प्रवाह खंडीत होतो, वर उभी असलेली ती पट्टी आडवी होते. बिघाड असल्यास दुरुस्ती नंतर पट्टीच्या साह्याने वीज प्रवाह पूर्ववत करता येतो.
इएलसीबी - अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर - वीज पुरवठा कंपनीतून चार तारांच्या मार्फत २२ हजार व्होल्ट दाबाचा वीज प्रवाह ट्रान्स्फॉरमरच्या साह्याने २४० व्होल्ट दाबाने घराघरातून पुरवला जातो. त्यातील तीन फेजतारा असतात व चौथी तार प्रवाह परतीची (न्युट्रल) असते. इमारतीतील ट्रान्स्फॉरमर व जमीन ह्यात वीज प्रवाह संचार नसण्याची काळजी घेतलेली असते. कोणत्याही कारणाने उपकरणा मार्फत न्युट्रल व जमीन ह्यात वीज प्रवाह संचार/गळती घडताच सुरक्षा म्हणून इएलसीबी ह्या साधनाने वीज पुरवठा बंद केला जातो. ही क्रिया अत्यंत तत्काळ घडते. गळती थांबताच प्रवाह पूर्ववत सुरू करता येतो. ह्या करता बाहेरुन तज्ञ मंडळी बोलवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असते. तुम्ही स्वत:च तज्ञ असाल तर अधिक मुलान पासुन सावध असावे.
हे सगळे समजले असेल असे समजून वितरण व्यवस्थेची माहिती समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. वर सांगितलेल्या पध्दतीचे एक घर म्हणजे वितरण व्यवस्थेतील एक उपकरण असे मानल्यास अशा घरांची एक इमारत असते. अशा इमारतीचा ट्रान्स्फॉरमर - स्वीच - फ्यूज - वीज पुरवठा हे चित्रात दिसते आहे, नेहमी असा प्रकार असावा हा नियम आहे. हा नियम प्रत्येक इमारती करता पाळला जातो असे नाटक वीज पुरवठा कंपनी व अधिकारी मोठ्या दिमाखाने हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे अशा थाटात सादर करतात. हे नाटक म्हणतो ह्याचे कारण प्रत्यक्षात अशा कामाचे पैसे घेऊन देखील ते केलेले नसते. २०/१/२०११ रोजी दुपारी दोन वाजल्या पासून पुढे ३४ तास वीज प्रवाह बंद ह्या नाटकाचे सादरीकरण मी राहतो त्या इमारतीतील व इतर चार इमारतीच्या संबंधित अधिकार्यांनी हाता वर हात ठेवून तोंडसुख घेत बघितले. प्रत्यक्षात हे दुरुस्तीचे काम तीन तासात आटोपणारे असते अशी कबुली दुरुस्ती कामगारांनीच दिली होती.मी राहतो ह्या सोसायटीत सुमारे ५०० फ्लॅट्स आहेत. अशाच धरतीच्या शेजारच्या प्लॉट मध्ये असलेल्या तीन सोसायटीचा वीज पुरवठा ह्या एकाच वितरण पेटीतून दिलेला आहे. वितरण पेटीत तांब्याचे/अलुमिनियमचे बस बार असतात त्यावर फ्यूज अथवा स्विचच्या साह्याने प्रत्येक इमारतीचा तार संच जोडलेला असावा हा नियम आहे. पण नियमांना न वापरण्याचा निर्लज्जपणा वितरण कंपनीने केलेला होता व शक्य असेल तिथे असेच करण्याचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात आमच्या प्रत्येक सोसायटीच्या चार तारांच्या फेजचा एक संच एकाच ठिकाणी एकाच नटबोल्टवर बसवलेला आम्ही सगळ्यांनी बघितला. जोडलेल्या एकाही तारसंचावर कोणत्या एमारती करता आहे ह्याची नोंदपट्टी लावलेली नव्हती. कोणत्या इमारतीमुळे मुख्य पुरवठा तार संचातील कोणता तार संच जळला होता हे शोधण्या करता २० तास उलटून गेल्यावर २१ तारखेला ११ वाजता वीज वितरण कामगारांचा एक गट वितरण पेटीच्या आजूबाजूला जमला होता. एकाही कामगाराने अथवा अधिकार्याने गणवेश चढवला नव्हता. त्यांचे नाव/हुद्दा दर्शक पट्टी लावलेली नव्हती. बिघाड दर्शक साधन वापरण्या करता १० हजार रकमेचे हास्तांतर झाले व फक्त सांगण्यात आले की मुख्यतार संचातील एक तार जळली आहे एवढेच सांगून ती मंडळी गेली. कोणत्या तार संचामुळे हे घडले हे शोधण्याचे कर्तव्य????? कोणाला विचारणार?? नशीब आम्हा रहिवाशांचे अजून नाहीतर काय???????
मग जळलेल्या तार संच दुरुस्तीची २० हजाराची रक्कम हस्तांतरित झाली. दुपारचे तीन वाजले तरी अजून काहीच हालचाल दिसली नाही. काही वेळाने तार संच दुरुस्तीचा एक सहा कामगारांचा गट आला. विजेच्या खांबा पासून येणारा तार संच त्या वितरण पेटीतून वेगळा केला गेला. जळलेल्या भागा पासून थोडा भाग जास्त कापण्यात आला. त्या कापलेल्या भागात दोन तीन जागेत जाड रबरात मोठाले छेद झाले होते. इतर इमारतीतून गोळा झालेल्या अधिकार्यांची चर्चा सुरू झाली. हा प्रसंग का झाला असवा ह्याची कारणे शोध सुरू होता.
योगायोग बघा, ओमान केबलचा व्हिडिओ बनवताना आरमर्ड केबल कशी तयार होते, अपेक्षीत वीज रोधक (इन्श्युलेशन) दर्जाचे परीक्षण कसे होते ह्या सगळ्याचा अनुभव मी चित्रित केलेला होता. त्याचा अभ्यास मी केला होता. त्यामुळे कारणे शोध चर्चेत मी तोंड उघडताच सगळे गप्प झाले व माझे कौतुक झाले. केबल उत्पादन चालू असताना २२ हजार वीज दाबाच्या केबलचे परीक्षण ६० हजार वीज दाबाच्या फ्लॅश टेस्टने होते. स्पार्क आला तर तो मध्य भाग धरून १ मीटरचा भाग कापून टाकण्यात येतो. आता हा परीक्षणाचा प्रकार किती कंपन्या प्रत्यक्षात लक्षपूर्वक करतात हा विषय वादाचा आहे.
ह्या केबलचा ड्रम पावसा पाण्यात उघडा ठेवला असताना त्याची दोन्ही टोके व्यवस्थित बंद असतात की नाही हा पण वादाचा मुद्दा आहे कारण उघड्या भागातून हवेतील बाष्प आत शिरते व वीज रोधक दर्जा (इंशुलेशन) कमी होतो. हा दुवा वाचा - http://www.cirris.com/testing/guidelines/voltinsl.htm
केबल रस्त्याच्या बाजूने टाकताना त्याचे हाताळणे किती लक्षपूर्वक झाले हे पण महत्त्वाचे असते. पीळ बसायला नको, कोणताही भाग वाजवी पेक्षा जास्त वाकलेला नसावा. केबलचा गोलाकार दाबला गेलेला असल्यास त्या ठिकाणी वीज प्रवाह रोधक क्षमता कमी होऊन अपघात घडण्याची शक्यता जास्त असते.
असो, केबल दुरुस्ती गटाला ती केबल दुरुस्त करून जागेवर बसवायला एका मोठ्या केबलच्या खालून काढणे आवश्यक होते तसे करताना एका ठिकाणी खड्डा मोठा करताना पहारीच्या टोकाने वरचे कवच फाटले. ते मी ओरडून सांगत होतो तरी केबल त्याच जागेवर वाजवी पेक्षा जास्त वाकवली गेली. आतील लोखंडी सुरक्षा पट्ट्या तुटल्या त्या कडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले. तेव्हा २२ हजार दाबाची अपेक्षीत वीज रोधक क्षमता मापनाकरता दुरुस्ती गटाजवळ १००० व्होल्ट दाबाची क्षमता असणारा मेगर त्यांना देण्यात आला होता. (नगास नग दाखवण्याची व मान्य करुन घेण्याची सवय परंपरागत जोपासणारी भाबडी जनता हे सगळे खपवून घेते. नशीब आमचे....) देव तारी त्याला कोण मारी आशी भाबडी कल्पना बाळगणारी ही जनता नव्हे नव्हे जंतु असल्याचे सिध्द करणारी जंता.
असो, त्रीचे अकरा वाजले तरीही वीज प्रवाह अजून सुरू झालेला नव्हता. घरात अंधारामुळे जेवण तयार झाले नव्हते, करण्यात कोणाला उत्साह नव्हता. शेवटी मुलाच्या ऑफिसला जाऊन तिथल्या उपहार गृहात जेवण करण्याचे ठरले म्हणून बाहेर पडलो तर एका सेकंदा करता प्रवाह सुरू झाला व जोरात स्फोट होऊन पुन्हा वीज प्रवाह नाहीसा झाला. एक एक तार संच वेगळा करून बीघाड कोणत्या तार संचाचा आहे हा शोध सुरू झाला होता. बाहेर जाऊन जेवून रात्री एक वाजता घरी परतलो. वीज प्रवाह सुरू झालेला होता. इतर इमारतीच्या अधिकार्यांशी बोलताना कळले की प्रत्येक अधिकार्याला रस्ता दुरुस्ती, पाणी टॅंकर, वीज दुरुस्ती व विभागीय भाइगीरीला तोंड द्यावे लागते. ह्यात होणारा खर्च व मनस्ताप शेवटी ह्या इमारतीत राहणार्या रहिवाशांना सोसावा लागतो. ह्यालाच नशीब मी म्हणतो, तुम्हीच ठरवा. ह्यालाच रहिवाशांचे नशीब म्हणायचे की चलता है? पटत नसेल तर काय देश सोडून बाहेर जायचे?
नुकतेच टीव्ही वर तेल माफीया, वाळू माफीया वगैरे नाटकी चर्चा रंगलेल्या आहेत सोनावणे सारखी माणसे शहीद झाली वगैरे सांगुन मदतीची घोषणाबाजी होते. चुक कै. सोनावण्यांचीच असावी अशी विधाने केली जातात. आता नवीन नाटक काय तर ७ मुख्यमंत्र्यांना हे सगळे माहिती होते. सगळे एक नाटक आहे आसाच सगळा देखावा दिसतो आहे. संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या पिडीताना अजून मदती करता भटकावे लागते आहे. मला तरी हताश होऊन हेच मान्य करावे लागते आहे शेवटी नशिब/दैव/ वगैरेच सत्य आहे. . . . .

0 प्रतिसाद:
Post a Comment