ज्या ज्या कामात मी व मुलाने हात घातला आम्हाला अपयश येत होते. मस्कत मधल्या एका मित्राने कोल्हापूर - रत्नागिरी रस्त्यावर असलेल्या मलकापूर गावा जवळच्या एका लहान गावाचा पत्ता मला दिला होता. तिथे एक जाणकार आम्हाला चांगले मार्गदर्शन करेल असे सांगितले होते म्हणून भेटायला गेलो. ते गृहस्थ सुखवस्तू होते. एकंदरीत ह्या मार्गदर्शन कामातून चांगली कमाई दिसत होती. बुवांनी डोळे बंद केले, आधी मला माझे नाव, जन्म कुठे झाला वगैरे विचारले व पुण्यात राहत होतो त्या जागेत राहायला कधी व कसे आलो हे विचारले. मग बायकोला पुन्हा तेच प्रश्न विचारले. बुवांनी डोळे उघडले. समोर असलेल्या देवी समोर एक उदबत्ती लावली नमस्कार केला व डोळे मिटून माझे घर चौथ्या मजल्यावर आहे. जीना फार अरुंद आहे. दार आत उघडणारे असून पश्चिम दिशेला आहे हे सांगितले.

मग १५ मिनिटे ते बोलत होते आम्ही फक्त हो नाही उत्तरे देत होतो. बुवा आमच्या घराची माहिती अगदी अचूक देत होते. "घरात शिरल्या वर दोन परदेशातून आणलेल्या फोटो प्रेम कोणत्या रंगाच्या आहेत ते सांगितले त्या त्रास दायक आहेत त्या तोडून फेका. त्यातील चित्र कोणालाही देऊन टाका. वर दिवे नसलेले झुंबर आहे ते फेका. दोन्ही चित्रांच्या भिंती मधून आत जायला दाराची फ्रेम नसलेली जागा आहे. आत गेल्यावर डाव्या बाजूला समोर संडास आहे तो घरातल्यांनी वापरणे बंद करा. त्याचे दार रंगीत पडद्याने झाका. त्यालाच लागून असलेल्या बाथरुमच्या वर माळा आहे त्यातले सामान बाहेर फेका. उजवी कडे पश्चिमेकडे तोंड करून असलेली स्वैपाकाची जागा बदला, विरुद्ध दिशेला पूर्वेकडे ठेवा. तुमच्या घरात पूजा झाली तेव्हा जे काही पूजेत ठेवले गेले ते सगळे दूर नदीत जाऊन बुडवा. दक्षिणेकडे असलेला पाण्याचा नळ व भांडी धुवायची जागा पूर्वेकडे बदला. पुढे गेल्यावर डावी कडे तुमची असलेली झोपायची जागा व उजवी कडे मुलांची जागा योग्य आहे फक्त झोपताना तुम्हा दोघांची डोकी पूर्वेकडे असतील व मुलांच्या खोलीत त्यांची डोकी उत्तरेला हवी. ह्याची काळजी घ्या."
आम्ही घरी परतलो. बुवांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सावध पणे एक एक करायला सुरू केले. परिणाम चांगले दिसू लागले. दर तासाल होणारी वादावादी कमी झाली होती. विशेष असे की मागच्या भागात वर्णन केलेले ध्वनी मुद्रणाचे काम त्या बुवांच्या भेटी नंतरचेच होते. त्या भजनाच्या संचातल्या एका गाण्यात आधी कुठेही ताल वाद्य नव्हते. बर्याच दिवसांनी एका पहाटे त्याच गाण्याला मी नुसताच डग्गा वाजवून एक ध्वनी पट्टी बनवून जोडले होते. अशी डग्ग्याची साथ ऐकून आमचे ते संगीतकार महाशय फार खूश झाले होते. प्रकाशक मालकाने हे ठेक्या सहित मुद्रण केलेले गाणे तबकडी करता वापरले आहे. त्याच गाण्याची ही ध्वनी पट्टी.

त्याच काळात मी दोन खिडक्यांना व मोठ्या बाल्कनीला एक एक शेड बनवून घेतली होती. जिन्याच्या ५० पायर्या चढून बाहेरच्या गरम हवेतून घरात येणारे पाहुणे आमचे घर चौथ्या मजल्यावर असून सुद्धा थंड असल्याचे कौतुक करत होते तेव्हा माझी बायको विषय बदलून जास्त पैसे खर्च झाल्याची तक्रार करत असे. काही महाभागांनी त्या शेड पद्धतीला कोंबडीचे खुराडे म्हणून मला नावे ठेवण्याची संधी गमावली नव्हती. त्या शेड मुळे घरात येणारा त्रासदायक प्रकाश कमी झाला होता. त्यामुळे प्रखर प्रकाशने डोळ्याला होणारा त्रास कमी झाला होता. दिवाणखान्याच्या एका बाजूला असलेले दार व एक छोटी खिडकी उघड्या बाल्कनीत उघडत होते. मी ते दार/खिडकी काढून संपूर्ण बाल्कनी शेडने बंद केली होती तर विरुद्ध बाजूला लांब मोठ्या खिडकीला पूर्ण उघडून शेडने बंद केले होते. त्या दोन्ही शेडला मुद्दाम गडद तपकिरी रंग लावला होता. त्यामुळे उन्हाने ते तापायचे. दिवाणखाण्यातील दोन विरुद्ध बाजूच्या शेड पैकी एक शेड सावलीत असताना थंड राहतं असे त्यामुळे उन्हाने तापलेल्या शेड मधली हवा बाहेर फेकली जात असताना थंड शेडमधून थंड वारा आत येत असे. नायलॉनची जाळी लावल्याने डास व माश्या एखाद दोन नावाला दिसायचे. मुख्य दार उघड झाप होताना डास व माश्या आत शिरत होत्या त्यावर नियंत्रण शक्य होते.

ह्या शेड करता मी एका कारिगराला बोलावले होते त्याने त्याच्या पद्धतीने मला लोखंडी सामानाचा खर्च सांगितला त्या पेक्षा ७० टक्केच सामान वापरणे कसे शक्य आहे हे मी स्वत: संगणकावर आखणी करून दाखवून दिले. त्याचे त्याला आश्चर्य वाटले. असा हिशोब संगणकावर केल्याने त्याचे काम दोन दिवस आधीच संपले व त्याला कमी मेहनत करावी लागली होती.
पालिकेचे पाणी कधीच चौथ्या मजल्यावर येत नव्हते म्हणून जमिनीत एक टाकी होती व एक गच्चीवर होती तरीही प्रत्येकाच्या घरातून दोन मोठाली पिंप होतीच. ह्याचे कारण तळमजल्याला राहणारा एक हरलेला नगरसेवक. हा नग माणूस नळाचे पाणी वर जास्त पोहचू नये म्हणून पाणी लवकर बंद करायचा व पाणी वर चढवणार्या पंपाशी खेळ करायचा. शेवटी त्रासून मी माझ्या संडासाच्यावर (वरील चित्रात दाखवली आहे) असलेल्या गच्चीत एक ५०० लीटरची टाकी बसवली व त्यातून घरात पाणी घेतले होते. इमारतीतल्या बायकांनी व त्यांच्या माठ नवर्यांनी माझ्या विरुद्ध पोलिसांत तक्रार केली. पोलीस आले पाहणी केली, माझी टाकी लावण्याची पद्धत त्यांना आवडली व त्यांनी माझेच कौतुक केले होते.
त्या काळात माझ्या एका बहिणीने, ति चालवीत असलेल्या व्यायाम वर्गाचे चलचित्र (व्हिडिओ) मुद्रण करण्या करता बोलावले होते. तिथे एका ज्योतिषं सांगाणार्या बाईंची ओळख झाली. त्यांना भेटण्याची वेळ निश्चित केली. आमच्या पत्रिका असल्यास त्यांना हव्या होत्या. बायको व मी आम्ही दोघेच भेटायला गेलो होतो. या बसा झाले. माझ्या बायकोला बघून त्यांनी थोडे इंग्रजी, थोडे हिंदी बोलायला सुरू केले. "अहो मला मराठी समजतंय" असे बायकोने चक्क मराठीत सांगितल्याचे त्या बाईंना आश्चर्य वाटले. आम्ही आमच्या पत्रिका दाखवल्या पण त्यांना त्या पटल्या नही. मग आमची जन्म वेळ, अक्षांश, रेखांश जागा सगळे शोधून त्यांच्या संगणकाने आमच्या नवीन पत्रिका तयार केल्या. त्याचा परिणाम बघूया पुढच्या भागात.