मी मस्कत मधून येताना मायक्रोमांईड डायरेक्टर, गो लाईव्ह व लाईव्ह मोशन हे मूळ कंपनीचे ऍप्लीकेशन पॅक ऍपल मॅक वर चालाणारे आणले होते. पुण्यात एका कंपनीला मायक्रोमांईड डायरेक्टरचा पॅक हवा होता. मला त्या कंपनीत एका हितचिंतक नातेवाईकाने नेले होते. त्याच कंपनीला माझ्या मोठ्या मुलाकडून सॉफ्टवेअरची बरीच काही कामे करून हवी होती, त्याचा भरपूर मोबदला आम्हाला मीळणार होता त्यातूनच त्या नातेवाईकाला त्याने काम मीळवून दिल्या बद्दल कमीशन आम्ही देणार होतो. मी आणलेला ७५० डॉलर किमतीचा मायक्रोमांईड डायरेक्टरचा पॅक त्या कंपनी मालकाला आवडला होता. किमतीची बोलणी चालू असताना मी ७५० डॉलर भरल्याची मुळ कंपनीची पावती दाखवली होती तरीही हा हितचिंतक नातेवाई मध्ये पचकला "अहो हे ऍपलीकेशन पॅक ह्यांना मोफत मिळालेले आहे. ते योग्य किंमत तुम्हाला सांगतील". त्या कंपनी मालकाने पुढचे सगळे बोलणे बंद केले. देवा कडे माझी प्राथना आहे असले हितचिंतक नातेवाईक / मीत्र मला स्वपनात देखील दिसू नयेत. छे! सगळे गमावले असे वाटले होते, नशीब माझे अजून काय?
पण सावरण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. एका राजकारणी माणसाला भेटलो. त्याला मी आणलेली नवीन साधने दाखवली व तंत्रज्ञान प्रशिक्षणाची तसेच कंत्राट व्यावसायाची कल्पना दिली होती. माझ्या तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे वर्ग चालवून प्रशिक्षीतांचा गट कारायचा व त्या त्या सेवा देण्याचे काम त्यांना मीळवून द्यायचे. त्याचे उत्तर चक्रावून टाकणारे होते. "मी ५ कोटी देतो एका वर्षात १० कोटी देउ शकत असाल तर पुढचे बोला! माझे नाव कुठेही नसणार, माझा माणूस ठरल्या वेळेला पैसे घ्यायला नुमच्याकडे येईल, तुम्ही माझ्याशी संबंध दाखवायचा नाही" माझी बोलतीच बंद, कारण असला व्यवहार फक्त पूर्ण न होणारे सरकारी कंत्राटच घडवु शकतात. अशा झोल व्यवहारातून पकडला गेलो तर त्रास मी सहन करायचा हे महोदय मात्र सुटून जाणार. त्यानंतर म्हाडाच्या एका अधीकार्याला कार्यालयातील त्याच्या मदतनीसांशी वायरलेस व्हिडिओ मिटींग करण्याची सोय हवी होती त्या करता त्याच्या नातेवाईकाच्या दवाखान्यात ही सिस्टीम लावून द्यायची (सगळा मोफत व्यवहार) तिथे चांगले काम झाले तर हे काम मिळेल. ते करायला मी तयार झालो. कार्यालयातील एका मदतनीसाने गौप्य स्फोट केला होता. माझ्या आधी दोन कंपन्यांची सिस्टिम कार्यालयातील कर्मचारी वर्गाने ठरवून नाकाम केल्या होत्या. सगळा खर्च वाया गेला होता. मला बकरा क्रमांक तीन व्हायचे नव्हते. मी त्या कार्यालयातून कसाबसा पाय काढण्यात यशस्वी झालो होतो.
एका नातेवाईकाच्या ओळखीने एका वैद्यकीय प्रशिक्षण शिबीराचे व्हिडिओचे काम मिळाले. ज्या दवाखान्यात हे शिबीर झाले तिथे तळ मजल्यावर ३० ते ४० जणांचा प्रेक्षक वर्ग बसला होता. तिसर्या मजल्यावर गुढग्याची शल्यक्रिया चालू होती. त्या डॉक्टरांचे काम आवाजा सहीत तळमजल्याला असणारे प्रेक्षक मोठ्या स्क्रीनवर बघत होते. वर शल्यक्रिया करणारे डॉक्टर खालच्या प्रश्न विचारणार्या व्यक्तीला आवाजा सहीत बघू शकत होते. मी हे काम मोठ्या मुलाच्या मदतीने पुर्ण केले होते. आमच्या कामाचे खूप कौतूक झाले. त्यानंतर त्याच संस्थेत आम्ही बरीच कामे केली. त्यातले महत्वाचे काम पाठीच्या कण्याची १२ तासांची शल्यक्रीया. ह्या कामाचे पैसे मिळायला आम्हाला आठ महीने लागले. त्या रकमेचा चेक घ्यायला मालकाने फायनान्स मॅनेजरकडे पाठवले. तीथे त्या मॅनेजरने २० टक्के कमीशन मागीतले होते. कमीशन देणे मला नवीन नव्हते. परदेशात हा कमीशन वाटपाचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतो. तिथे मुळात बिल तयार करतांना ओव्हर इनव्हॉयसींग केलेले असते. पण ह्या संस्थेने मूळातच फंड्स कमी आहेत असे सांगून बीलात काटछाट केली होती, पैसे द्यायला उषीर केला होता, मला २५ चक्रा मारव्या लागल्या होत्या वरून हे भिक मागणे. अहो निर्लज्जपणाचा कळस म्हणजे असे कामीशन सगळेच व्यावसायीक आम्हाला देतात हे पण तो मॅनेजर बोलला होता. मी मालकाच्या कार्यालयात जाउन तोडफोडची भाषा केल्यावर मला पूर्ण २० हजाराचा चेक मिळाला होता. त्यानंतर मी त्या संस्थेकरता काम करणे बंद केले.
त्याकामाची ही एक झलक.
हा व्हिडिओ करताना मी ऑपरेशन कक्षात सर्जनच्या मागे होतो. डोक्या वरून सोनीचा DSR PD 1P हा कॅमेरा मी बूमला (एक लांब दांडा) लावला होता व वायर्ड रिमोटने नियंत्रण केले होते.
हा प्रकार घडत असतांना मी ह्या शल्यक्रियांचा जवळून शोध घेतला. सगळ्या संस्था रोख रक्कम घेतल्या शिवाय काम करत नाही. शल्यक्रियांचा खर्च फुगवून दाखवला जातो. रुग्णांच्या आप्त्तांना औषधांची नावे अशीच दिली जातात की ती फक्त त्या संस्थेच्याच दुकानात मिळतात. जमेल त्या माध्यामातून पैशांची लूट चालु असते. असे असतांना ह्या संस्था चालकांना इतर सेवा देणार्यांना वेळेवर पैसे न देण्यात काय तोटा असावा हे कळत नाही.
ह्या विचीत्र अनुभावातून मी सावरलो व एका डिस्टंट लर्नींग प्रकार नव्याने सुरु करणार्या नावाजलेल्या संस्थेच्या चालक वर्गाला भेटायला गेलो. त्यांना संस्थेत २००३ ला ऍपल मॅकच्या वायरलेस पध्द्तीने काम कसे सोपे होईल त्याचे प्रत्यक्षिक दाखवले. त्या चालक वर्गाने ही पध्द समजून न घेता हे भारतात चालाणार नाही व त्यांना ह्या पध्दतीत काही फायदा होणार नाही असे मत व्यक्त करून मोकळे झाले. एका विभाग प्रमुखाने त्याच्या अकलेचे प्रदर्शन करतांना विनोदच केला होता. त्याने चायनीज वायरलेस फोनशी तुलना करीत व त्यातील निकामी बॅटरी सेल बदलता येत नसल्याने ही वायरलेस पध्दत वापरणे म्हणजे वेडेपणा असल्याचे सांगितले होते. तरीही ह्या पध्दतीचा वापर काही वर्षात किती व कसा वाढणार आहे ते समजवण्याचा अयशस्वी प्रयत्न मी केला होता.
पण सहा महीन्यांनी त्याच संस्थेने मला फोटोग्राफी व व्हिडिओचा प्रशिक्षक म्हणून निवडकरण्या करता बोलावले होते. ही संस्था फोटोग्राफी व व्हिडिओ ह्या विषयाची पदवी देणारी होती. त्या संस्थेत अजून ह्या विषयाची संबंधीत साधने नव्हती, ती साधने माझ्या कडे होती व मी ती वापरून प्रशिक्षण द्यावे असा पर्याय विभाग प्रमुखाने मला दिला होता. परंतु महीन्यातुन १२ वर्ग घेतांना २०० रुपये प्रती एक वर्ग एवढे मानधन ते देऊ शकणार होते. आहो त्या काळात माझी ती दुर्मीळ साधने व त्याचा वापर वीमा खर्च त्या एका वर्गा करता १२०० रुपये येणार होता. ते २०० रुपये मानधन म्हणजे एक विनोदच होता. ती संस्था आवश्यक साधने नसतांना त्या पदवी करता अडीच लाख रुपये घेत होती. धन्य ह्या "शी-क्षण" संस्था, तिथे शिक्षण घेणार्या पाल्यांना व त्यांच्या पालकांना देव योग्य वेळेला अशा महत्वाच्या विषयावर विचार करण्याची बुध्दी देवो ही पार्थना.