May 18, 2010

नशीब भाग - ५८

मी एप्रील १५, २०१०ला माझे भाड्याचे घर बदलले. नवीन घरात समानाची जुळवणी वगैरे कामाने मला खूप त्रास झाला त्यात ब्लॉग लिखाण वगैरे सगळे सोडून द्यावे असे झाले होते पण आज राहिलेले भाग पूर्ण करावे असे वाटले व हा भाग सुरु केला आहे. 


सोनीचा चांगला व्हीडीओ कॅमेरा मी शोधत असतांना फुट्बॉल वर्ल्ड कप फ्रान्स १९९८ ला DSR PD 1 P हा कॅमेरा खेळात वापरताना बघीतला होता. तेव्हा त्याची किंमत १३०० रियाल होती. मस्कत मधल्या सोनी विक्रेत्या मार्फत मी तो वीकत घेतला. DVCAM पध्दत वापरणारा मी पहीला ठरलो. त्या सोनी वीक्रेत्याने नवीन ग्राहकांना प्रात्यक्षिक दाखवण्या करता मला माझा कॅमेरा दाखवण्या करता बोलावले होते. त्या कार्यक्रमात सोनी यु.के.चा खास प्रतीनीधी आला होता. त्याने अजुन चांगली व्हिडिओ संपादनाची साधने मला व माझ्या मुलाला समजावून सांगितली. काही महीन्यातच मी पैसे जमवले व DSR 200 P, DSR 30 P ही साधने विकत घेतली. 
DSR PD 1P मीनी डिव्हि कॅमेरा.


DSR 200 P  डिव्हि कॅमेरा. १८० मीनीट डिव्हि कॅसेट करीता



DSR 30 P  स्डॅन्डर्ड व मीनी डिव्हि कॅसेट बसणारा एडिटर
ह्या नवीन साधनांचा उपयोग करून मी लग्नात वापरणार्‍या वस्तूंचे प्रदर्शन व फॅशन शो चा एक व्हिडिओ बनवून दिला होता. त्या व्हिडिओमुळे मला व्यावसायीक दर्जाचे काम जास्त मीळाले. तेव्हा मी जागतीक २४ तासाच्या गो कार्ट शर्यतीच्या मुद्रणाचे काम केले. त्याची ही एक झलक इथे जोडली आहे. तसेच जगातला उत्कृष्ठ पोलीस बॅन्ड म्हणून प्रसिध्दी मीळवलेला ओमान पोलीस बॅन्डची ही एक झलक.



वर्ष २०००, मि माझ्या नात्यातल्याच एकाच्या लग्नाला पुण्यात आलो होतो त्या भेटीत असे काही घडले की त्यामुळे मी मस्कत सोडून पुण्यात परतावे असे वाटू लागले. मस्कतला परतलो, बायको मुलांना परीस्थीती समजवून सांगितली त्यांना मस्कत सोडावे असे वाटू लागले. तेव्हा येरवडा भागात माझे ११०० स्के.फूटाचे घर होते. त्याच काळात झान्टे कलरस्क्रीन राईटर हा प्रीप्रेस प्रिंटर २४०० रियालला घेतला. 


 झान्टे कलरस्क्रीन राईटर, ए३+ ते ए५ कागद, फिल्म, ट्रान्स्फर मिडिया तसेच CMYK रंगांची पावडरचा वापर.
पूण्यात ह्या प्रिंटरने बरेच चांगले काम करता येईल अशी आखणी केली होती. बायको व दोन्ही मुले मला व्हिडिओ, फोटो व प्रिंटीग मध्ये हात भार लावतील वगैरे सगळे आम्ही ठरवले होते. 

पण..... आज कळतय ते मशीन विकत घेतले त्याच दिवशी बायकोने शाप दिल्यासारखे झाले. मी व मुलाने २४०० रियाल कचर्‍यात घातले असून त्याच्यातून एकही काम मीळाणार नाही, माझे शब्द लीहून ठेवा अशी भवीष्यवाणी तीने केली होती. सगळ्या प्रतीकूल परिस्थीतीशी झगडणे हेच माझ्या नशीबी होते हे पटू लागले. त्यात ओमानी स्पॉन्सरने मला त्रास देणे वाढवले होते. त्याला भेटायला म्हणून आम्ही चौघे ११०० कि.मी दुर सलाला शहरात त्याच्या घरी गेलो. दीवस भर बरेच भटकलो. शून्य गुरुत्वाकर्षणाची जागा बघायला गेलो होतो. तिथे आम्ही चौघे गाडीचे एंजीन बंदकरुन बसलो होतो. थोडीशी हालचाल होताच गाडी चढावावर २५ फूट वर जाउ शकली होती. एक आश्चर्य आम्ही अनुभवले होते. ओमानी स्पॉनसरने आम्हाला आमचे अडकवून ठेवलेले पासपोर्ट परत केले. पाच वर्ष आमच्या हक्काचे पगारचे राहीलेले पैसे देणे नाकारले होते. मला त्याचे आभार मानण्या पलीकडे काहीच शक्य नव्हते. 

मार्च २००२, मी सामानाची यादी करून ३० फूटाचा एक कंटेनर भरून माझे सामान पुण्याला रवाना केले. शेवटी एप्रील २००२ ला मी व माझा धाकटा मुलगा ओमानचा कायमचा नीरोप घेऊन पुण्याला आलो. बायको व मोठा मुलगा राहीलेली बाकीची कामे पूर्ण करण्या करता मस्कतला १५ दिवसा करता मागे राहीली होती. येरवड्याच्या त्या घरात बरीच घाण जमली होती ती साफ करून घेतली. त्या रात्री मी व मुलगा खूप थकलो होतो गाढ झोपलो. पहाटे जाग आली ती अंगाला भयनाक खाज सुटली म्हणून. कानाशी डासांचा गोंगाट चालू होता. सबंध घर हजारो डासांनी भरले होते. मुलाचे सगळे शरीर डासांनी चावून लाल झाले होते. माझे पण शरीर लाल झाले होते. माझ्या हितचिंतक बहीणीने मला डास चावतील ह्याची मुळीच कल्पना दिली नव्हती. सात वाजता उठून आम्ही दोघे सरळ तीच्या घरात जाउन उभा राहीलो. आमचा अवतार पाहून ती घाबरली होती. मुलगा डोक धरून रडत होता." बाबा मी काय केले होते की तुम्ही मला ह्या त्रासात पुण्यात घेउन आला आहात, मला परत मस्कतला आपल्या घरी जायचे आहे" त्याला परस्थीतीचे गांभिर्य समजणे शक्यच नव्हते. नायसील पावडरचा डबा आम्ही दोघांनी अर्धा केला त्रास थोडा कमी झाला होता. बहीण लगेच दुकानात गेली मोठी मच्छरदाणी घेऊन आली होती. 

आम्ही त्या रात्री सुखाने झोपू अशा वीचारात झोपलो. दोनच तासात जागे झालो. मच्छरदाणीचा एक भाग न शिवता पूर्ण उघडा होता अशीच वीकत का घेतली मला अजून समजले नाही. मच्छरदाणीच्या त्या उघड्या  भागातून घरातले सगळे डास आत शीरून आमच्या रक्ताची मेजवानी असल्यासारखे तुटून पडले होते फूगून टच झाले होते. डासांच्या हीट औषधाचे दोन मोठे डबे रिकामे करत डासांना मारण्याचा पराक्रम आम्ही केला होता. मच्छरदाणीचा तो उघडा भाग कसाबसा चादरीने बंद करण्यात यश आले. ह्या पुढे कोणते त्रास भोगावे लागणार ह्याचा वीचार करत आम्ही शांत झोपलो.